नवीन लेखन...

जन्म स्वभाव

गोड शब्द बोबडे, लकब त्याची मनास आवडे, शब्दांची भासली जाण,  नव्हते भाषेचे अजुनी ज्ञान, भावनांचा उगम दिसला,  मनी व्यक्त होई हालचालीतूनी रागलोभ अहंकारादी गुण,  दिसून येती जन्मापासून देश-वेष वा जातही कुठली,  सर्व गुणांची बिजे दिसली हळूहळू बदले बाह्यांग जरी, उपजत गुण राही अंतरी प्रसंग घडता अवचित ,  बाह्य जगाला विसरतो उफाळून येती सुप्त भावना, मानवी धर्माच्या […]

सोडून आले आहे मी सगळे

एका हिंदी कवितेचा अनुवाद,थोडे काही शब्द घालून माझे,–!!! सोडून आले आहे मी सगळे, आपल्यात घडलेले सारे, माझे तुझे सारे किस्से, खरंच मी सोडून आले, रडले डोळे माझे, अगदी हमसाहमशी, तुझ्याच फक्त घरापाशी, सोडून आले सगळे, रुसणं, रागावणं, मनवणं मुद्दाम जिद्दीने भेटणं, अशा कित्येक स्मृती, सोडून आले तुझ्या दाराशी,-!!! एकत्र घालवलेले रम्य क्षण, डोळ्यात साठवलेले, अशा सगळ्या […]

जखम

खरंच रे वेड्या,तुला कळला नाही, माझ्या मनीचा भाव, नकळत कोरून गेलास,न भरलेल्या जखमेचा घाव… गळून पडेल का ही जखम? की जाईल ती पण सुखून, की चीघळून जाईल पुन्हा,सोसेल का हे तळपतं ऊन? तू दिली आहेस म्हणून खरंच का हिला जपून ठेवू? सांगना,सजवून धजवून अंगावरचं टपोरं गोंदण मानून घेवू ? मलम नाही रे हिला,असा कसा रे केलास […]

चल सये ग झणीं

चल सये ग झणीं, मांडू या खेळ अंगणी, लहान वयातली भातुकली, धांदल बाहुलीच्या लग्नाची,–!!! लग्न करण्या त्यांचे, घालत होतो घाट, धावपळ करत सगळी, मांडायचा सर्व थाट,—-!!!! इवले इवले बाहुला बाहुली, सुंदर गोंडस खूप छोटुकली, मुंडावळ्या बांधून त्यांना, उभे सगे घेऊनी हाती,–!!! सासर माहेर सगळे मिळुनी, अंगण जायचे गजबजुनी, ठुमकत येई वरमाई, नाकात झोकात नथ घालुनी,–!!! देण्याघेण्यावरून […]

पूजा तयारी

रोज सकाळीं प्रात: समयीं,  पूजा करी देवाची  । पूजे मधल्या विधीत,  चूक न होई कधी त्याची  ।। स्नान करोनी नेसूनी सोंवळे,  देव घरांत जाई । भाळी लावूनी गंध टिळा,  मंत्रपाठ गाई  ।। सहयोग देई पत्नी,  पूजा कर्मामध्ये त्याला  । आधींच उठोनी झाडूनी घेई,  स्वच्छ करी देव घराला  ।। करूनी सडा संमार्जन तेथें,  सारवोनी घेई जागा  । देवापुढती […]

आमची राजहंसी जोडी

आमची *राजहंसी जोडी, फिरते मस्त या तलावी, डौलदार माझा राजा, लोक आम्हा पाहत राहती,–!! सौंदर्य आमुचे राजसबाळे, मुखडे तर किती देखणे, आम्हा पाहण्या होड चाले, नेहमीच या तलावाकाठी,–!!! डुबुक डुबुक पाण्यामध्ये, आम्ही विहरतो शानदार, रंग शुभ्र लोभसवाणे आकर्षित लोक इथे फार,–!!! पर’ फैलावीत, सूर मारत, सुळकन् पाण्यात जातो दिमाखदार जोड पाहुनी, कुणी प्रवासी थक्क होतो,–!!! लाटांच्या […]

तेजोनिधीच्या आगमनाने

तेजोनिधीच्या आगमनाने, निळ्या आभाळां सोनझळाळी, जलद अवतरती सोनेरी किती,—- डोकावती विस्तीर्णजलाशयी,— आपुला रंग लेऊनी पाणी,—– कसे खळाळते समुद्री,खाली, अस्तित्व” अमुचे दाखवतो त्यांना, प्रतिबिंबित होऊनी समुद्रकिनारी,– निळा जलाशय तो हसे गाली, कुठून आली माझ्यावर “निळाई”, वर्षा ऋतूत जेव्हा ‘बरसला’ तुम्ही, तुमच्यातील पाणीच आले खाली, निळे–शाssर रंगले माझे पाणी, किनार्‍यावर लोक हिंडून बघती, जलभरले’ “मेघ” कुठे असती,– उत्सुकताही […]

जगावे अगदी बिनधास्त

जगावे अगदी बिनधास्त, निर्भय आणि निडर, कशाला पर्वा कुणाची, जगणे असावे कलंदर , असे जगावे जबरदस्त, पत्थरांशी टक्करावे, निधड्या छातीने अगदी, संकटांना दूर सारावे, मार्गी जेवढ्या अडचणी, तेवढी घ्यावी आव्हाने , तू मोठा का मी म्हणत, सरळ त्याच्याशी झुंजावे, सामना करणे अटळ मग, कशासाठी ते भ्यायचे, सिंहाचे काळीज करून, का नाही लढायाचे,—? आत्मविश्वासाने जग जिंका, भल्याभल्यांनी […]

प्रेम-स्वभाव

प्रेम-स्वभाव    असे ईश्वरी गुण मनीं ठसला हा    आत्म्यांत राहून प्रेम करावे वाटे    आंतरिक ही ओढ ज्याची मुळे खोल   पडने अवघड आपसांतील प्रेम    आत्म्यातील नाते न दिसता देखील    बांधलेले असते सर्व जीवाविषयीं    सहानुभूती भासे ह्रदयामध्ये ती     सुप्तावस्थेत दिसे आमचे राग लोभ    बाह्य संबंधामुळें षडरिपू विकार    शारीरिक सगळे वाईट गुणधर्म   देहाशीं निगडीत चांगले जे कर्म    आंतरीक इच्छेत राग […]

आनंदाने नाचत गात

आनंदाने नाचत गात,घेत हृदयाचे ठाव , चाललो मी पुढे पुढे , झरा माझे नाव,–!!! कपारीत डोंगराच्या, जन्म होई माझा, झुळझुळ वाहत जाता, होत असे मी मोठा,–!! शांत निर्मळ पाणी, हळूहळू पुढे जातसे , पारदर्शक थेंब लोलक, नजरेत ना भरती कसे,–!! असे धवल थेंब धावती, त्यांची बनते सुरेख नक्षी, ती बघण्यास उत्सुक हा, सारखे येती माझ्यापाशी,–!! अशांत, […]

1 216 217 218 219 220 437
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..