नवीन लेखन...

बाळ चिमुकले… गोड हासले

बाळ चिमुकले,गोड हासले, रांगत आले , पायाला धरुनी, उभे राहिले, बाळकृष्ण ते, मला भासले, — वदनांतून कोवळे, ध्वनि उमटले, बोबड्या स्वरांनी, मज जिंकीयले, उचलून घेता , कसे आनंदले, हात हलवून , मज कुरवाळले, कोण लहान, मग वाटले, कुशीत त्याच्या, मीच शिरले , हलके हलके, त्याने थोपटले, गा,—गा कर , मज म्हणाले, निश्चिंत जीव,—!!! निश्चिंत मन ,—–!!! […]

हे टिपूर चांदणे

हे टिपूर चांदणे,सख्या तुला बोलावे, आकाशातील घनमाला, घराची तुला वाट दाखवे, –||१|| डोईवरचा चंद्रमा, माझिया प्रियाला स्मरण देई, एक चंद्र घरी वाट पाहे, सारखा सूचित करत राही,–||2|| शांत नीरव वातावरणी, बघ सजणा बोल घुमती, विरहव्याकूळ तुझ्या प्रियेचे, कानात कसे गुपित सांगती,||3|| भवतीचा काळोखही, येण्याची तुझ्या वाट पाहे, मिलन कल्पून मनाशी, दोन जिवांची संगत देई, –||4|| सुगंधित […]

विस्तीर्ण समुद्र किनारी

विस्तीर्ण समुद्र किनारी, फिरत फिरत निघाले, वाळूत चालताना ठसे, पावलांचे उमटलेले, –!!! दूर क्षितिजी सूर्यबिंब, घाईत होते चालले, रंगांची आरास पाहून, अचंबित की झाले,–!!! ढगांमागून निघाला, संधिप्रकाश आता, दिसू लागला धरणीवर, पखरुन घातलेला, –!!! याच ढगांवर स्वार होऊन, निघाला सोन्याचा गोळा, आभाळाला सप्तरंगी, आज साज चढवलेला,–!!! किती रंगांची रासक्रीडा, गगनी होती चाललेली, चकित होऊनी धरा, कशी […]

श्रीरामा, घन:श्यामा….

श्रीरामा, घन:श्यामा,sssss—घनघोर या काननी, किती पुकारु तुमच्या नावा,ssss- लक्ष्मण भावजी गेले सोडुनी,–!!! ‌. अयोध्येस परतल्यावरी, बसले मी राणीपदी, आदर्श जोडप्याचा मान देऊनी जनतेने केले धन्य जीवनी,– त्यातच आणखी गोड बातमी, स्वर्गच दोन बोटे राहिला,–!!! कुणाची नजर लागली, ग्रहस्थिती विपरीत फिरली, तुम्ही का सोडले मज रानी, जावे कुठे एकाकी मी आता,–!!! मनोरथे सगळी संपली तुमची सेवा मनी […]

बहिरा ऐके कीर्तन

गम्मत वाटली प्रथम मजला       बहिरा ऐके कीर्तन अश्रू वाहू लागले माझे नयनी      भाव त्याचे जाणून नियमित येई प्रभूचे मंदिरी         श्रवण करी कीर्तन केवळ बघुनि वातावरण ते          तल्लीनच होई मन सतत टिपत होते मन त्याचे        इतर मनांचे भाव केवळ जाणण्या भगवंताला           डोळे आतुर सदैव रोम रोमातून शिरत होत्या           प्रभू निनाद लहरी संदेश प्रभूचा पोह्चूनी                  आत्म्यास जागृत करी होऊन गेला प्रभूमय बहिरा            धुंद त्या वातावरणी ऐकत […]

बघता तुला प्रिया रे

बघता तुला प्रिया रे ,–जिवा बेचैनी येते, कासाविशी होता हृदयी, आत मोरपीस हलते,–!!! विलक्षण ओढ तुझी, काळजाला किती छळते, मूर्त माझ्या अंतरीची, अढळ अढळ होतं जाते,–!!! स्पर्श होता तुझा सख्या, माझी न मी असते, बाहूंत तुझ्या विसावण्या, किती काळ मी तरसते,–!!! तुझ्यातच सारे विश्व माझे, जगही तोकडे भासे, तुझ्याचसाठी राजसा, मन्मनीचा चकोर तरसे,–!!! उषा आणि संध्या, […]

दयेची दिशा

निसर्ग नियमें दया प्रभूची,  सदैव बरसत असते  । दयेचा तो सागर असता,  कमतरता ही पडत नसते  ।। अज्ञानी ठरतो आम्हींच सारे,  झेलून घेण्या तीच दया  । लक्ष्य आमचे विचलित होते,  बघून भोवती फसवी माया  ।। उपडे धरता पात्र अंगणीं,  कसे जमवाल वर्षा जल  । प्रयत्न सारे व्यर्थ जाऊनी,   निघून जाईल वेळ  ।। भरेल भांडे काठोकाठ , […]

स्वप्नातली अपूरी इच्छा

दुपारचे ते भोजन करूनी, आडवा झालो थोडासा झोप लागूनी त्याच क्षणी, थंडावल्या साऱ्या नसा….१, वाम कुक्षीच्या आधीन जाता, जग विसरलो सारे स्वप्न पडूनी सुंदर मनी, वाटे आनंद देणारे…..२, पाटी-पुस्तक हाती घेवूनी, पोषाख घाली शाळेचा घेवूनी गेलो कन्येस माझ्या, नाद जिला शिकण्याचा….३, खूप शिकूनी मोठी होईन, बाबा तुमच्या एवढी खावू पुस्तक खेळणी आणा, बडबडीत तिच्या गोडी….४, आई […]

रे पर्वता…

निळसर रंगाच्या दुलईत लपला अजून झोप सरली नाही पहाटेने हाक देऊनही जाग त्याला आलीच नाही! कोंबड्यांचा आरव पक्ष्यांचे कूजन त्याच्याच कुशीतल्या मधमाश्यांचं गुंजन उगवतीचा सूर्य माध्यावर आला अंगावरच्या कणखर घड्यांनी आळस दिला थकलो आहे आता ऊन पाऊस झेलून श्रांतावंसं वाटतं आता दिगंताकडे पाहून..

पावन हो तू आई

पावन हो तू आई पावन हो तू आई तव चरण शरण येई   ।।धृ।। संसाराचा खेळ मांडला खेळविसी तूं मजला थकूनी मी जाई   ।।१।। पावन हो तू आई तव चरण शरण येई रात्रंदिनीं ध्यास लागला जीव माझा तगमगला झोप तर येतच नाही   ।।२।। पावन हो तू आई तव चरण शरण येई आळवितो मी तुजला विसरुनी देहभानाला नयनी […]

1 218 219 220 221 222 437
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..