अंतर्मनातील आवाज
ध्यान लागतां डूबूनी जाई अंतर्यामीं बाह्य जगाला त्याच क्षणीं विसरतो मी चित्त सारे केंद्रित होई आत्म्याकडे दुर्लक्ष्य होऊनी देहाचा विसर पडे संवाद होता आत्म्याशी विचारा सारे आतून कांहीं आंतल्या आवाजांत सत्याचा भाव भविष्यातील घटणाचा त्यासी ठाव नियमीत ध्यान साधना करती इतर जीवांचे प्रश्न समजती ऋषीमुनीना ध्यान शक्ती अवगत राजाश्रय मिळूनी राज गुरु ठरत प्रश्न सोडवी ध्यान […]