नवीन लेखन...

पूजा भाव

पूजा पाठ करीत असतां    पूजा गेलो विसरुनी प्रभुचरणी ध्यान लागतां   भान गेले हरपूनी पूजेमधल्या विधीमध्यें   बहूत तास घालविले मनी घेऊनी आनंदे   पूजा कर्म केले पूजेमधली सर्व कृतिं   कटाक्षाने पाळली नेटकेपणासाठी   योग्य साधने जमविली वर्षामागून वर्षे गेली   पूजाअर्चा करुनी खंत मनी राहून गेली   झालो नसे समाधानी मूर्ती समोर बसूनी    एक चित्त झालो ध्यान अचानक लागूनी    स्वतःसी विसरलो […]

या कातरल्या क्षणांना

या कातरल्या क्षणांना, सय तुझी येते,– उन्हाची तप्त काहिली, चटकन् दूर होते, वारा धुंद वाही, ढग जाती प्रवासी, अधूनमधून बिजलीही, उगा आपुले दर्शन देई, अशा वेळी आठवे मज, सोनेरी प्रभेची सांज, याच समुद्रकिनारी, वाजली मिलनाची गाज, नभ सुंदर सोनबावरे, होते भेटीस साक्षी, कूजन करीत बागडती, पक्षी आनंदें वृक्षी, किनारा दूरवर तटस्थ, उभ्याने राखी सागराला, मिलनाची किती […]

दुधामधील चंद्र

कोजागिरीची पौर्णिमा परि,  आकाश होते ढगाळलेले शोधूं लागले नयन आमचे,  चंद्र चांदणे कोठे लपले गाणी गावून नाचत होती,  गच्चीवरली मंडळी सारी आनंदाची नशा चढून मग,  तल्लीन झाली आपल्याच परी मध्यरात्र ती होवून गेली,  चंद्र न दिसे अजूनी कुणा, वायु नव्हता फिरत नभी तो,  मेघ राहती त्याच ठिकाणा दूध आटवूनी प्रसाद घेण्या,  उत्सुक होतो आम्ही सारे ढगात […]

दु:खे आणि वेदना

दु:खे आणि वेदना, जीवना,तुझे दुसरे नाव, माणूस हरून जातो, जेव्हा घेतसे तुझा ठांव, आपुले परके होती, परके म्हणती आपुले, या सगळ्यात सारखे, भरडत जातो चांगले,–!!! जीव किती जखमी होतो, प्रेमाचा नसता लवलेश, मानसिक यातना भोगतो, अगणित असती क्लेश,–!!! दात आहेत, चणे नसती, चणे असती, दात नाहीत, अशांत कोण घांस घेई, कोण फडशा जातो पाडीत,–!!! विचारताना साधे […]

सुखाची मोहमाया

तप्त लोखंडात,  लपली ती आग दिसे लाल लाल,  जाळी सर्व भाग…१, सुंदर फूलात,  सुंगध तो छान अवती भवती काटे,  ते कठीण…२, विजेची ती तार,  प्रकाशी दिव्याला, झटका तो देई,  स्पर्श होता तिला..३, सुखाच्या पाठीशी, असे दुःख छाया न दिसे ती आम्हा,  असे मोह माया…४ डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

इंद्रियें सेवकासम

खिडकीमधूनी टिपत होतो बाह्य जगाचे द्दष्य आगळे लोभसवाणें चित्र बघण्या आतूर होऊन गेले डोळे नयन नव्हते बघत ते बघत होतो मीच खरा खिडकीसम नयनातूनी द्दष्य उमटते आंत जरा संगीताचे सूर निनादूनी लहरी त्यांच्या उठताती कर्णा मधल्या पडद्यायोगे आनंद मजला देवून जाती मालक असूनी मी देहाचा इंद्रिये सारी असती सेवक ती केवळ साधने असूनी आंतील ‘मीच’ असे […]

विश्रांती

धावपळीचे जीवन सारे,  मिळे न कुणा थोडी उसंत विश्रांतीच्या मागे जाता,  दिसून येतो त्यातील अंत…..१ चैतन्यमयी जीवन असूनी,  चक्रापरी ते गतीत राही चक्र थांबता क्षणभर देखील,  मृत्यूची ते चाहूल पाही….२ थांबत नसते कधीही जीवन,  अंत ना होई केंव्हां त्याचा निद्रा असो वा चिर निद्रा,  विश्रांती ही भास मनीचा….३ थकून जाई शरिर जेंव्हां,  प्रयत्न करि ते विश्रांतीचा […]

लज्जा

साडी चोळी सुंदर नेसूनी    आभूषणें ती अंगावरती लज्जा सारी झांकुनी टाकतां   तेज दिसे चेहऱ्यावरती   ।।१।। आत्म्यासम ती लज्जा भासे    सौंदर्य जिवंत त्याच मुळें लोप पावतां लज्जा माग ती    जिवंतपणा तो कसा कळे   ।।२।। लपले असते सौंदर्य सारे    एक बिंदुच्या केंद्रस्थानीं शोध घेण्या त्याच बिंदूचा   लक्ष्य घालतां उघडे करुनी   ।।३।। विकृत ती मनाची वृत्ति    स्वच्छंदीपणात ती असते […]

नजरेचा बलात्कार

कुठुन कुठुन नजरा जातात शिरत राहतात अंग बघायला बायांनीही फँशन म्हणून ठेवलेले असतात पाठीवर हातावर कधी छातीवरही काही झरोके ब्लाॅउज अन साडीच्या मधला भागही शोधत राहते अन मोठाच बलात्कार करत असते नजर एकही अंग उघडं नसलेल्या अंगभर कपडे घातलेल्या बाईवर ब्रा वा इतर अंतर्वस्त्राचे किनार वा  काठ ठळक दिसत राहतात त्याला वरुन कपड्यावरुन…. तेव्हा ! — श्रीकांत पेटकर 

किर्तनी झोप

नियमित जाऊनी मंदिरी,  श्रवण करी तो किर्तन तन्मयतेनें ऐकत असतां,  जाई सदैव तेथे झोपून…१, एकाग्र करिता चित्त प्रभूसी,  निद्रेच्या तो आहारी जाई निघूनी जाती सर्व मंडळी,  एकटाच तो तेथे राही….२, पवित्रतेच्या वातावरणीं,  प्रभू नामाच्या लहरी फिरती झोपीं गेला कोपऱ्यांत तो,  परिणाम त्या त्यावरी करती….३, शांत असूनी निद्रीस्त इंद्रीये,  शोषूनी घेती त्या लहरी आनंदाचे वलय भोवती,  समाधान […]

1 225 226 227 228 229 437
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..