नवीन लेखन...

मुक्तीसाठीं

रुजला पाहीजे    विचार मनांत सारेच प्रभुचे    असे ह्या जगांत जो वरी आहे मी   माझे येथे असे त्या क्षणापर्यंत  स्वार्थ मनीं वसे स्वार्थयुक्त मन   मुक्त होत नसे मुक्ती येई पर्यंत   पुनर्जन्म असे बिंबता मनांत   माझे नाहीं कांहीं प्रभूचे समजता   आत्मा मुक्त होई डॉ. भगवान नागापूरकर 9004079850 bknagapurkar@gmail.com  

ऊन पडले कोवळे

ऊन पडले कोवळे, धरणीवर तरंगत आले, प्रकाशाचे खेळ सारे, किरण हवे तसे रमले,–!!! आकाशाचा गोल घुमट, कसा तापून गेला, किमया कशी तेजाची, धरतीवर जमली पसरट,–!!! दुपारचे ऊन,मध्यान्हाचे, उष्ण उष्ण निखार, मित्रराज” तळपता उभा, रोपट्यांना फुटले धुमार,–!!! वाढत गेला किरणांचा गरिमा, झाडे सारी शोषती प्रकाश, जीवन कसे तरारले, हा निसर्गाचाच महिमा,–!!! वाढे दुपारचे ऊन, हळूहळू कलंडू लागे, […]

मुलीच्या कविता

बालपणात एकत्र खेळतात सगळे मुलंमुली वय वाढत जाते भवतालचं मुलीचं वय जरा लवकरच वाढत असते . ‘आता तू मोठी झालीस ‘ ऐकू येते वेळीच एकत्र खेळणं थांबवावं …….असं वाटणं अनुभवाचं . कसं सांगावं वेगळे असतात आतून सगळे वेगळे असतात स्पर्श वेगळे असतात खेळ वेगळ्या असतात नजरा आणि मुलात माणूस अन माणसात नरपण , पशूपण वाढत असते […]

उतावीळ

अनुत्तरीत असंख्य प्रश्नांनी पोकळ मनाच्या भरगच्च ज्ञानानी उतावीळ उतावीळ मिळालेल्या अनुभवांनी … संघर्षाची नकोय शक्ती नाही गाठलेली कुणाची भक्ती उतावीळ उतावीळ तरीही येथे प्रत्येक व्यक्ती विलंबाकडे करुनी पाठ उद्द्येशाची लावूनी वाट उतावीळ उतावीळ त्रिशंकुंचा हा सारीपाट चाले तंद्री झपाझप बहिरा असावा जणू प्रत्येक हेरून संकटांची पोटली पुन्हा रस्ता त्याच चौकात… — सौ. देवयानी खरे 

विचार आतला

विचार आतला, काळोख दाटला, घर उजळता, दिसे आत्मा,–!! चिंता, दु:खे, बोचरी सुखे , हृदयाला भिडती, विलक्षण खंता,–!!! मी– तू पणा गळतो, अंतरात्मा छळतो, मोक्ष मागतो, प्राणांतील परमात्मा,–!!! जीव सुटेना, कर्मात, भोगात, अडकून राहिला, दार उघडेना, मुक्काम बदलेना,–!!! नसते हातात, व्यथा हृदयात, जिवा छळतात, काळज्या बऱ्याचशा,–!!! स्वर्ग नरक, कल्पना नुसत्या, माणसांच्या वस्त्या, नकोशा, नकोशा,–!!!! हिमगौरी कर्वे

आकाशातील कापूस

कपाशीचे  ढिग अगणित    विखुरले  दिसती आकाशीं मानव येथें उघडा  असूनी    वस्त्र  अपुरें दिसे अंगाशी   ।।१।। कोठे आहे कापड गिरणी     वस्त्र जेथें बनत असें दयावान तूं मालक असतां    त्रोटक कापड निघे कसे   ।।२।। पाठव तूं तो वस्त्रांचा कोठा    लाज  राखण्या मानवाची गरिब बिचारा विवस्त्र तो    किव करावी वाटे त्याची   ।।३।। डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

वस्तूतील आनंद

आनंद दडला वस्तूमध्यें,  सुप्त अशा त्या स्थितीत असे सहवासाने आकर्षण ते,  होऊन बाहेरी येत दिसे….१, प्रेम वाटते हर वस्तूचे,  केवळ त्यातील आनंदाने बाहेर येता नाते जमते, आपुलकीचे पडून बंधने…२, तोच लूटावा आनंद सदैव,  अंवती भंवती वस्तूतला दूर न जाता दिसले तुम्हां, आनंदच भोवती जमला…३, जेव्हा कुणीतरी म्हणती,  ईश्वर आहे अणू रेणूत वस्तूमधील आनंद बघतां  हेच तत्त्व […]

तो माझा कृष्णसखा

निळ्या जळी, काष्ठी, पाषाणी, मज मेघ:श्याम दिसे, ऐहिक जीवनी वावरताना, रंग निळसर भासत असे,–!! निळा काळा शाम तो, वाजवी मधुर बासरी, जिथे असेन तिथे मी, हरवून बसते परोपरी,–!!! राधिका मी त्याची, तो माझा कृष्णसखा, जिथे जाईन तिथे तो, बनत असे पाठीराखा,–!!! नावेत बसुनी चालले , या तीरावरून त्या तीरी, यमुनाही डचमळे सारखी, माझ्यासारखी उलघाल उरी,–!! मधुसूदनाचे […]

प्रभू नामस्मरण

नामघ्या हो तुम्ही, प्रभूचे सतत । नामस्मरण ते, अशू द्या मुखांत ।।१।। काय सांगावी मी, नामाची थोरवी । दगडही जेथे, तरंगून जाई ।।२।। राम नामामध्ये, प्रभुचा संचार । बनून कवच, रक्षती शरिर ।।३।। नामाची लयता, मन गुंतवून । एकहोता चित्त, जाई आनंदून ।।४।। अंतीम ते ध्येय, ईश समर्पण । नामानी साधती, प्रभू सर्वजण ।।५।। डॉ. भगवान […]

रविवार आणि नवरा… महिला दिनाबद्दल

रविवारला नवरा स्वयंपाकखोलीत घुसला चल …आजतरी तुला मदत करतोच म्हणाला मी म्हणाले ,मला आधी दिवाणखान्यात जावू द्या पेपर वाचता वाचता तुमच्यासारख्या बातम्याही बघू द्या.. अगं, तुला मदत करायला आलो तर तुच बाहेर जाते! भाजी पोळी करायला मला एकट्याला कुठे येते? रोज कसं तुम्ही आँर्डर सोडता तशा आॅर्डरी मला करु द्या कसं वाटतं मनामधी तुम्हालाही.. जरा अनुभव […]

1 227 228 229 230 231 437
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..