नवीन लेखन...

सांग ना प्रिये सखे, माझी होशील ना?

बघ ना सखे, कसं आभाळ गच्च दाटलंय मनात तुझ्या आठवणींचं काहूर माजलंय… चिंब भिजून या पावसात, कवेत मला घेशील ना? सांग ना प्रिये सखे, माझी होशील ना? अंगी झोंबे हा गार गार वारा मोहरून तुझ्या आठवणीने, येई देही गोड शहारा उबदार घट्ट मिठीत घेऊन, मला बिलगशील ना? सांग ना प्रिये सखे, माझी होशील ना? सखे सुरू […]

कसे जगावे

आता न कुणीच उरले असे जीवाचे ज्याच्या आठवणीत अजुनी जगावे गाभाऱ्यातील प्रकाशज्योत निमाली अंधारल्या, आठवातुनी कसे जगावे एकांती छळतो भावप्रीतीचा गारवा गोठविणाऱ्या वेदनेतुनी कसे जगावे दाटला सभोवार निर्विकार काळोख आता उगा, कुणाला शोधित जगावे आता न कुणीच उरले असे जीवाचे ज्याच्या आठवणीत अजुनी जगावे — वि.ग.सातपुते (भावकवी) 9766544908  रचना क्र.२९१ ८/११/२०२२

मर्म जीवनाचे

सत्यशाश्वत आणि अशाश्वत अनुभवल्याविना कळत नाही सत्यप्रेम म्हणजे काय असतं ? केल्याविना कधी कळत नाही… विरह देखील काय असतो ? भोगल्या शिवाय कळत नाही सुख, दुःख, वेदना देखील जगल्या शिवाय कळत नाही… फक्त मीच, हा व्यर्थ अहंभाव कधीच, कुणाचा टिकत नाही परदुःख नेहमी शीतल असते स्वदुःखाचा दाह साहवत नाही… जीवन पुर्वकर्माचा हिशेब सारा चुकविण्या शिवाय पर्याय […]

ध्यास

अंतरी स्नेहलभाव असावा मनी नसावी असुया कटुता निर्मल मैत्रसहवास घडावा भक्ती प्रीतीचा छंद जडावा…. संस्कारी अमृतात भिजावे हॄदयी सत्यप्रकाश पडावा संतत्वाच्या जळात डूंबता जीवनाचा सत्यार्थ कळावा…. जन्म मानवी संचित युगांचे सत्कर्मी सदा जगत रहावा चैतन्याचा आत्माच हरिहर ध्यास जीवा त्याचा असावा…. — वि.ग.सातपुते (भावकवी) 9766544908  रचना क्र.२८९ ७ /११ /२०२२

विठु वाळवंटी

आली माऊली विट्ठलाचे भेटी नाचे परब्रह्म आनंदे वाळवंटी..।।धृ।। आषाढ़ी कार्तिकी चाले दिंडी धावते मोदे संतांची पालखी हरिदास टाळमृदंगे नाचनाचती…।।१।। तुळसीमाळ गळा गंध कपाळी मुखे हरीनाम गरजे आसमंती नेत्री राणा पंढरिचा लागे भेटी…।।२।। सोहळा सुखाचा चंद्रभागेतीरी जीवाजीवासंगे गुंतला विठ्ठल अंतरी उरला केवळ जगजेठी…।।३।। गाभारी, साक्ष द्वैत अद्वैताची निष्पाप, गळाभेट वैष्णवांची रूपडे सावळे नाचते वाळवंटी…।।४।। — वि.ग.सातपुते (भावकवी) […]

लळा जिव्हाळा

लळा जिव्हाळा आता तोंडदेखला बेगडीच प्रेमास्था हीच खंत मनाला…. दुभंगलेली नाती हा शाप जीवाला निष्प्राण संवेदनां प्रीतभाव आटलेला…. प्रश्न कोण कुणाचे मनामनास पडला…. जीणेच केविलवाणे काय सांगावे कुणाला…. मन:शांतीवीना दूजे ? कां? स्वास्थ्य जीवाला अंतर्मुख होवूनी जगावे आळवित दयाघनाला…. — वि.ग.सातपुते (भावकवी) 9766544908  रचना क्र. २८६ ५/११/२०२२

चांदणं

उन्हाळ्यातल्या निवांत रात्री मंद मंदसा वाहे वारा चांदण्यांच्या स्वप्निल नेत्री निरवतेचा शुभ्र किनारा शब्दांचे विणता धागे आठवणींचे घेऊन मोती हृदयाचे आर्जव विरते उन्हाळ्यातल्या चांदण राती… — आनंद

भावशब्द

शब्दातुनी उमललो शब्दासंगे रांगलो खेळलो बागडलो शब्दातुनी नाहलो… स्पर्शता शब्दभावनां अंतरातुनी दंगदंगलो शब्दाशब्दांचा अर्थ उलगडित राहिलो.. शब्दांचेच ब्रह्मांड मी वेचित राहिलो गुच्छय संवेदनांचे मी माळीत राहिलो… शब्दशब्द संजीवनी प्रीतवात्सल्य प्राशिलो भावशब्दात पावित्र्य निष्पाप व्यक्त जाहलो… जाणुनी शब्दार्थ सारे अंतर्मुख होत राहिलो शब्द कृतार्थी, सांत्वनी गीतात गुंफित राहिलो… — वि.ग.सातपुते (भावकवी) 9766544908  रचना क्र. २८५ ४/११/२०२२

न उलगडणारी कोडी

( एका चित्रकाराच्या सरस्वतीच्या नग्नाविष्कारावरील तीव्र प्रतिक्रियेवर त्याचे व्यक्तिस्वातंत्र्य भोक्ते सखे तुटून पडले . सरस्वती चितारताना अभिव्यक्तिस्वातंत्र्य असतं , मग सटॅनिक व्हर्सेसवर बंदी घालताना हे व्यक्तिस्वातंत्र्य कसं आड येत नाही ; आपल्या सामान्य बुद्धीला हे भेदभावाचं कोडं कधी सुटलंच नाही . ) तुमच्या नग्नतेला त्या संवेदना ; कुरवाळा सतत ‘ दुखणाऱ्या ‘ भावनांना रे आमच्या वेदना […]

सत्य

सांगा कुणी पाहिला देव तो त्राता जो तारतो, सकल जीव सृष्टीला सत्य अटळ भोग भोगणे प्रारब्धाचे कधीतरी चुकले कां सांगा कुणाला सातत्याने नीजकर्म करीतची रहावे त्याविण दूजा आनंद नसे जीवाला यत्न प्रामाणिक साक्षात रूप देवत्वी स्मरावे क्षणाक्षणाला अनामिकाला सत्कर्मी संकल्पाचीच कांस धरूनी निर्मोही जावे सामोरे या प्रारब्धाला मनामनातील भाव निर्मल निरागस मोक्षानंदी घेवुनी जाती पैलतीराला — […]

1 21 22 23 24 25 437
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..