कधी असेही घडावे
कधी असेही घडावे, सुखाला परिमाण नसावे, भरभरून ओंजळीत त्यांस, घेऊन छान मिरवावे,–!!! कधी असेही घडावे, आपुले सगळे आपुलेच राहावे, परकेपणा सोडून देत, जिवां-शिवांचे नाते जपावे,–!!! कधी असेही घडावे, सुंदरतेला सुगंध यावे, त्यांना एकदा कडेखांदी, दिमाखात घेऊन हिंडावे,–!!! कधी असेही घडावे, अपेक्षांचे ओझे नसावे, मुक्त स्वैर आनंदाने, खुशीचे विशाल पंख ल्यावे,–!!! कधी असेही घडावे, ताण-तणावांना निरोप द्यावे, […]