नवीन लेखन...

ऋतूचे चक्र आणि मन

कडाक्याची थंडी, दात कुडकडुती, हात-पाय गार, काटे अंगी येती नकोसा वाटतो,  मजला हिवाळा, वाट मी बघतो,  येण्या तो उन्हाळा सुकूनची जाते,  हिरवे ते रान शरिर राहते,  घाम निथळून लाही लाही होता,  त्रस्त होई जीव, शोधण्या ते ढग,  मन घेई धाव थांबवितो कामे,  वादळी तो वारा, पर्जन्याचा मारा,  पडताती गारा पाणी चहूकडे,  वाटते सुकावे, वर्षा ती जावूनी, […]

देशासाठी वीरमरण ते

देशासाठी वीरमरण ते, भाग्यवान” किती तुम्ही, कितीदा मागावे मरण असे, मिळत नाही “जन्मोजन्मी,” –!!! भारत मातेची सेवा” करता, देह तुम्ही हो ठेवला, — देशसेवा करता करता, पाईकांनी कसा बळी दिला,–!!! अगदी पुण्यकर्म हे ठरे, असा मृत्यू तुमच्या नशिबी, नेताना तुम्हाला तोही घाबरे, पडलात ना देशाकारणी,–!!! ज्या मातीत खेळलो,वाढलो, तिचे केले रक्षण तुम्ही,– आईला पूजताना शेवट, कुडी […]

समत्व बुद्धी

एका टोंकावरती जातां,  शांत न राही झोका तेथें विलंब न करता क्षणाचा,  जायी दुजा टोका वरती, जीवनांतील झोके देखील,  असेच सदैव फिरताती बऱ्या वाईटातील अंतर,  नेहमी चालत असती समाधान ते मिळत नसे,  जेव्हां बघता तुम्हीं भोग त्यांत देखील निराशा येते,  मनीं ठरविता जेव्हां योग जवळपणाच्या नात्यामध्यें   दुरत्वाचे अंकूर फूटते दूर असता कुणी तरी,  जवळ करावे वाटते, […]

ओंजळभर मोती

ओंजळभर मोती, आई तुझ्यासाठी, कष्टलीस ग बाई, सारखी संसारासाठी,–!!! ओंजळभर सोनचाफा, आई तुझ्यासाठी, पोळल्या जिवाला गारवा, मिळेल तुझ्यापाशी,–!!! ओंजळभर मोगरा, आई तुझ्यासाठी, सौंदर्यातील सुगंधाने, आत्मिक दुवा साधण्यासाठी,-!! ओंजळभर चंदन, आई तुझ्यासाठी, उगाळून झिजलीस, आमुच्या भल्यासाठी,–!!! ओंजळभर मरवा, आई तुझ्यासाठी, सारखी फुलत राहशी, तूच आमुच्यासाठी,–!!! ओंजळभर अश्रू, आई तुझ्यासाठी, किती झालीस रिक्ती, देणीघेणीअजून चालती,–!!! हिमगौरी कर्वे.©

निळ्या मखमली ढगांवरती

निळ्या मखमली ढगांवरती, चला स्वार होऊ,— डोळे भरून ही दुनिया, पहात पाहत पुढे जाऊ,— थंडगार हवेत त्या, मेघांचे ओढून शेले, हळूच दबकत, लपतछपत, सूर्यापासून दूर होऊ,— उबदार त्या वातावरणी, अलगद खेळत राहू, मस्तमौला जगत जगत, वरून डोकावून पाहू,— खाली दिसती पर्वतरांगा, नद्या कशा वाहती, पर्वताच्या कुशीत कसे, धबधबे खाली ओसंडती,— थेंबांची नाजूक नक्षी, कोसळते वरून खाली, […]

मुक्त अनुवाद

मागेन हिशोब तुझ्याकडे, कधीतरी माझ्या एकटेपणाचा, सुरकुतलेली पुस्तकातली फुले, देतील साक्ष; नि सांगतील तुलाच , आपल्या ओठांवर, बघ ते गुलाब ठेवून, सुगंधित निघेल ग अत्तर, सुरकुतलेल्या पाकळ्यांमधून , आपल्या प्रेमाचं, त्या विफल प्रेमाचा, करून टाक सौदा, प्रेमातल्या आणाभाकांचाच व्यवहार*,—!!! हिमगौरी कर्वे.©

सून येता घरा

मुलाचे लग्न ठरले मन खूप अस्वस्थ झाले आनंद तर झालाच पण काळजीने घेरले सुनेचे आगमन होणार घरात बदल होणार माझा मुलगा अन संसारही तिचा होणार आजवर ह्या संसारावर हक्क फक्त माझा भांडीकुंडी अन घरभर पसारही माझा आता मात्र माझ्या संसारात तिची लुडबुड मनाच्या ताणाने सुरु झाली भांड्यांची खुडबुड भांड्यावर हात फिरवून त्यांना समजावले पण मनाचे भांडे […]

नाते प्रेममयी , विश्वासदायी, नाते जिवीच्या जिवलगी

नाते प्रेममयी , विश्वासदायी, नाते जिवीच्या जिवलगी, दाखवी आपुलकी, नुरणे सलगी,–!!! धागे मैत्रीचे, धागे जिव्हाळ्याचे, धागे आपुल्या सुसंवादाचे, धागे सहकार्याचे,धागे अंतराचे घट्ट विणी,–!!! बंध रेशमी, नसावे तू अन् मी, द्वैतातून अद्वैत इतुकी एकी, असे आत्मिक एकजिवी, ठाम गोडी ,–!!! परस्परा संकटी, एकमेका सहकारी, नसावी बिलकूल दुरी, आपुल्या जीवनी, अशी दोस्ती,–!!! माझ्यात तू अन तुझ्यात मी, प्रेमभरली […]

त्यांचे नाते

कोण लागतात माझे, नाते ते ठावूक नाहीं देऊनी जातात मात्र, बरेच मजला काहीं….१, विठ्ठल- रामाचा नाद,  गुंजन करितो येथें पवित्र वातावरण,  येण्यानी होवून जाते….२, देवण घेवण आत्म्याची,  आपसामध्यें चालती शब्द फुलांची गुंफण,  त्वरीत होऊन जाती….३, फूले देऊनी मजला,  हार गुफूंन घेतात दोघे मिळूनी तो हार,  प्रभूस अर्पूं सांगतात….४ अदृश्य असले नाते,  असावे दोघांमध्ये भाषा आत्म्याची जाणतां, […]

शान्त समईत जशी वात

शान्त समईत जशी वात,तशी समाजात स्त्री जात, जळून जळून प्रकाश देत, क्षणिक फक्त मोठ्या होत,–!!! पणतीची ज्योत तशी, आमुची ही असे जात,– जगच छोटे भोवतालचे,– स्वयंप्रकाशी मोठे करत, लामणदिव्यात उर्जास्त्रोत, रात्रंदिनी सारखे *अविरत, मंद असूनही सतत, कार्यरत, भोवताली प्रकाश पसरवत,–!!! नंदादीपातील जशी ज्योत, स्त्री तशी तिच्या संसारात, हळूहळू अगदी तेवत,–!!! दुसऱ्याला प्रकाशमान करत,–! निरांजनातील छोटीवात, संसारासाठी […]

1 234 235 236 237 238 437
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..