भास
चमचम चमकते नाणें दूरी वरुनी दिसले । चांदीचे समजूनी मन तयावर झेपावले ।।१।। निराशा आली पदरीं जाणतां तुकडा पत्र्याचा । खोटी चमक बाळगुनी फसविणे गुणधर्म तयाचा ।।२।। भास ही चेतना ती तर्क वाढीवी कसा । दिसून येई सदैव मनावर जो उमटे ठसा ।।३।। ठसे उमटती संस्कारांनीं बघतां भोवती सारे । मनावर बिंबून जाते आणि भासते तेच […]