नवीन लेखन...

तुझे तुलाच अर्पण !

तुझेच घेऊनी तुलाच द्यावे,  भासते ही रीत आगळी  । उमजत नाही काय करावे,  तुझीच असतां सृष्टी सगळी  ।।१।। वाहणाऱ्या संथ नदीतील,  पाणी घेऊन अर्घ्य देतो । सुंदर फुले निसर्गातील,  गोळा करुन चरणी अर्पितो ।।२।। अन्न ग्रहण करण्यापूर्वी,  नैवेद्य तुजला दाखवितो । जगण्याचा तो मार्ग दोखवी,  ह्याचीच पोंच आम्ही देतो ।।३।। विचार ठेवूनी पदोपदीं,  साऱ्यांचा तूं असशी […]

ज्ञानाग्नि पेटवा

हातातील काडी    घासतां  पेटीवरी अग्नि त्याच्यातील   ज्वाला त्या धरी लपलेला अग्नि     घर्षणाने पेटतो अज्ञान झटकता    ज्ञानी उजाळतो चितांत असतो     प्रभू सदैव शांत ओळखण्या त्यासी   लागताती संत संत हाच गुरु        मार्गदर्शक असे चित्तातील प्रभूला     जागवित असे उजळण्या मन   घर्षण लागे संताचे पेटवा ज्ञानाग्नि     सार्थक होई जीवनाचे — डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

ध्यानाने काय साधले

ध्यानाने काय साधले ऐका सगळे लक्ष्य देऊनी हेच साधले ध्यान लावूनी   ।।धृ।। संसारांत रमलो    मोहांत गुंतलो सुख दुःखात अडकलो उकलोनी जीवन कोडे   समर्पित झालो प्रभू चरणीं   ।।१।। जाई पैशाच्या पाठीं   देह सुखासाठीं समाधानापोटीं धडपडीतील चुक दिली दाखवूनीं ।।२।। धानाची समज   उपदेशिला मज ऐक मनाचा आवाज तोड सर्व विचार चित्त एकाग्र करुनी ।।३।। एकाग्रतेची स्थिति    ही ध्यानाची […]

शारदेस विनंती

हे शारदे ! रूसलीस कां तू,  माझ्या वरती  । लोप पावली कोठे माझी,  काव्याची स्फूर्ती  ।। दिनरात्रीं तव सेवा केली,  मनोभावें  । कळले नाहीं आज शब्द ओठचे,  कोठे जावे  ।। दिसत होते भाव मजला,  साऱ्या वस्तूमध्यें  । उचंबळूनी जाई मन तेव्हां,  नाचत आनंदे  ।। तेच चांदणे तारे गगनी,  आणिक लता वेली  । पकड येईना टिपण्या सौंदर्य, […]

यशासाठी प्रयत्नाची दिशा

प्रयत्न करितां जीव तोडून,  जेव्हां यश तुम्हा न येई सोडून देता त्याला तुम्हीं,  नशिबास दोष देच राही..१ दोष नका देवू नशिबाला,  मार्ग निवडले तुम्ही चुकीचे का न मिळाले यश तुम्हां,   मूल्यमापन करा प्रयत्नाचे…२ चूक दिशेने प्रयत्न होतां,  वाहून जातो सदा आपण यश जेव्हा मिळत नसते,  निराश होवून जाते मन…३ पुनः पुन्हा प्रयत्न करूनी,  यश न आले […]

तन मनातील तफावत

देह मनाच्या वया मधील,  तफावत ती दिसून येते चंचल असूनी मन सदैव,  शरिर परि बदलत राहते…१, चैतन्ययुक्त ते मन सदा,  स्थिर न राहते केव्हांही जन्मापासूनी मृत्यूपर्यंत भाग दौड ती चालत राही…२, परिस्थितीच्या चौकटीमध्यें,   विचारांचा दबाव राहतो शरिराच्या सुदृढपणाचा,  मनावरती परिणाम होतो…३, दिसून येते केव्हां केव्हां,  मन अतिशय उत्साही परि शरिराचा दुबळेपणा,  मनास त्याक्षणी साथ न देई….४ […]

आठवावे गजानना

आठवावे तव नाम हे गुरुराया शीणवटा  मनाचा घालवाया …।। धृ ।। रहाटगाडगे हे रोजचे चाले रेटूनी रेटूनी मन हे थकले एकचित्त होऊनी आता बसलो स्मरण करी तुमचे गजानना   ।।१।। उपदेशपर तुम्ही जे सांगितले मनात हो साठवुनी  ठेवियले विपरीत वर्तमानात आजच्या वागण्या बल द्यावे गजानना …..।।२ ।। किंमत हरवुनी बसली माणसे हरवून बसले  बोलते शब्दही बदलणे बरे […]

त्यांची शाळा

आंस लागली मजला बघून याव्या त्या शाळा देहू, आळंदी, परिसर जाऊनी तो धुंडाळला कोठे शिकले तुकोबा ज्ञानोबांना ज्ञान मिळे साधन दिसले नाहीं परि तेज भासे आगळे विचार झेंप बघतां आचंबा आम्हां वाटतो कोठून शिकले सारे मनी हा प्रश्न पडतो त्यांची शाळा अतर्मनीं गंगोत्री ज्ञानाची ती वाहात होती बाहेरी पावन करी धरती डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

गीता – जीवनाची एक उकल

रणभूमीवर समर प्रसंगी      मृत्यु असता सामोरी जीवनांची तत्वे सांगती       गीते द्वारे श्रीहरी //धृ// अर्जुन असूनी महारथी         द्विधा झाली मनःस्थिती सगे सोयरे तेथे बघूनी          खालती बसला निराशूनी कसे मारुं मी माझेच सारे        भगवंताला प्रश्न विचारी //१// जीवनाची तत्वे सांगती गीते द्वारे श्रीहरी कुणीही नाही कुणाचे येथे        नाते गोते क्षणिक भासते सत्ता येथे चालते प्रभुची          खेळणी सारी ठरते […]

ज्ञानेश्वराची चेतना

जीवंतपणी घेई समाधी,  ज्ञानेश्वर राजा  । दु:खी होऊनी हळहळली,  विश्वामधली प्रजा  ।। सम्राट होता बालक असूनी,  राज्य मनावरी  । हृदय जिंकले सर्व जणांचे,  लिहून ज्ञानेश्वरी  ।। आसनीं बसत ध्यान लावता,  समाधिस्त झाले  । बाह्य जगाचे तोडून बंधन,  प्राण आंत रोकले  ।। निश्चिष्ठ झाला देह जरी ,  बाह्यांगी दर्शनी  । जागृत आसती प्राण तयांचे,   आजच्याही क्षणी  ।। […]

1 237 238 239 240 241 437
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..