नवीन लेखन...

हे कराल का ?

कशासाठी जगतो आपण, विचार तुम्हीं करतां कां ? मृत्यू येई तो जगावयाचे,  हेच धोरण समजतां कां ? खाणे – पिणें वंश वाढविणे, हेच जीवन असते कां ? ऐष आरामी राहूनी तुम्ही, देहासाठी सारे, हे मानता का ? पाठीं लागूनी धनाच्या त्या, बरोबर संपत्ती न्याल कां ? पैसा मुलांसाठी ठेवून ही, शिव्या त्यांच्या चुकवाल कां ? सारे […]

चिठ्ठीवरला मजकूर

टेबलावर ठेवले होते बॉसने काहीतरी लिहून हाताखालच्या लोकांनी निरनिराळे अर्थ काढले त्यातून कुणास काहीच समजेना, म्हणून असिस्टटने केली विचारणा चिठ्ठी वाचून बॉस म्हणाले मला काय म्हणावयाच होत तेव्हा, समजत नाही आता, ती आहे एक नवकविता — डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

जीवन परिघ

एक परिघ ते आंखले आहे विधात्याने विश्वाभोवतीं जीवन सारे फिरत असते एक दिशेनें त्याचे वरती   १ वाहण्याची ती क्रिया चालली युगानुयुगें ह्या जगतीं कुणी ना सोडी लक्ष्मण रेखा एकांच परिघात सारे फिरती   २ जेंव्हां कुणीतरी थकून जाई दुजा उठोनी मदत करी जीवन मरणाची शर्यत जिंकण्यासाठीं तो लक्ष्य धरी   ३ मध्य बिंदूच्या स्थानीं बसूनी नियंत्रित कुणी करी […]

रावण वृति

रावण नव्हता कुणी राजा,  ती होती व्यक्ति व्यक्तीचा तो इतिहास नव्हता,  ती होती प्रवृत्ति….१, आजही दिसती कित्येक आम्हा,  रावण या जीवनीं कशी रंगेल जीवन कथा,  रावणा वांचूनी…२, विरोधात्मक बुद्धी तुमची,  अडथळे आणते क्रोध, लोभ, अहंकार गुणांनी, प्रवाहाला रोकते…३, सद्‌गुणांचा पाया खोलवर,  जेवढा तो गेलेला रावण वृत्ति हार जाईल,  त्याच मग वेळेला….४ डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com […]

असंबधता

त्याला तपासण्यासाठी,  नेले मेंटल हॉस्पीटलला की तो आजकाल असंबद्ध बोलू लागला पण डॉक्टर संतापून म्हणाले तुम्हाला त्याची समज असावी, की तो आहे एक ‘नवकवी’ — डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

योग्यतेनुसार यश

उंचावून झेप, नको घेवू उडी खोल आहे दरी, पाय तुझा मोडी…१ अंदाज घे तूं,  खोलीचा प्रथम यश येई तुला,  तया मध्यें ठाम…२ अनुमान काढ,  आपल्या शक्तीचे झेपेल का तें,  विचार युक्तीचे…३ निर्णय घ्यावेस,  सदा विचारांनी निराश न होई,  त्यामध्ये कुणी….४ जाणून घे तूं, स्वत:ची पात्रता यश असे पाठी,  ज्याची जी योग्यता…५ डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com […]

सिनेमाला चला

नको जाणे सिनेमाला, गर्दीचा आहे पहिलाच दिवस याच विचाराने थिएटर पडले ओस चला जावू सिनेमाला, आजच्या दिवशी शेवटी. निराशली मंडळी,  बघूनी हाऊस फूल पाटी — डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

वर्षाचे भगिनी प्रेम

तप्त होतां धरणी माता, शांत करी वर्षा तिजला प्रफुल्लतेचे झरे फुटती,   आंतूनी त्या मातीला…..१, जलमय होती नदी नाले,  दुथडी भरूनी वाहती धबधब्यातील खरी शोभा,  वर्षामुळेंच दिसती…२, हिरव्या रंगीं शाल पसरते,  धरणी माते वरी ऊब यावी म्हणून मेघांचे,  आच्छादन ती करी….३, वर्षा धरती बहिणी असूनी,  प्रभूची भावंडे उचंबळूनी प्रेम येतां,  धावून येते तिजकडे….७ डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० […]

गर्दी पांगविण्याची कला

गर्दी गर्दी गर्दी, सर्वत्र त्रस्त करून टाकणारी गर्दी. गर्दीला पांगविण्याची, कला मला सापडली वही घेवून संग्रहातील कविता मी वाचली — डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

अर्पण

आशिर्वाद श्री जगदंबेचा,  सहवास तुझ्या स्फूर्तीचा रचिली ओवीबद्ध कथामाला, ती अर्पितो मी तुजला II १II विचारांच्या उठल्या लहरी,  शब्द जुळता काव्या परी कविता रूप धारण करी,  ती अर्पितो मी तुजला II२ II प्रभूचा असावा सहवास,  हीच अंतर्मनातील आंस विचारांची घालूनी शब्दरास ती अर्पितो मी तुजला II३ II प्रभू नसे जन्ममरण व्यथा,  अवतारास संबोधूनी जन्मकथा भावनेस व्यक्त […]

1 239 240 241 242 243 437
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..