नवीन लेखन...

जीवन…..एक हुरहूर.

जीवन झेप कुठे घेईल,  याची मला हुरहूर आहे…… चार पैशाच्या कर्जापायी,  गाव रान्हं सोडलं आहे….. गावात शेत छान माझ्या, पण पैशाची कमी आहे…..  चार पैशाच्या कर्जानं ,  जीवन ओझं झालं आहे…..  स्वार्थाच्या मोही जगात,  सर्वच मला अनोळखी आहे…..  मी फक्त – स्तब्ध,  जग पुढं चाललं आहे…..  पैशाच्या आतुरतेचा,  माणूस गुलाम बनला आहे…..  गरीबाच्या शब्दांना – – […]

मुंबई लोकलचा प्रवास

प्रवास लोकलचा… खिडकी जवळचे सीट दोन सीट च्या मधली उभे राहण्याची जागा फॅन खालचे सीट दरवाज्यात उभे राहून हवा खाणे सामान वर ठेवणारा स्वयंसेवक गरजूना जागा देणारे दयाळू कुठे उतरायचे ते सांगणारे गाईड स्पेशल डब्बा आहे याची जाणीव असणारे आणि करून देणारे चौथे सीट मसाज घेत उभे राहण्याची धडपड हाडे मोडतील ही भीती मोबाईल, पाकीट मारले […]

आत्ता खरंच….

आत्ता चं दिवस हे दिवसासारखं, खरंच मला वाटत नाही…. आत्ता माझ्या चेहऱ्यावर, खरंच हसू येत नाही…. आत्ता तुझ्या आठवणी विना , मला काही आठवत नाही…. आत्ता वाटतं तुझ्या विना, काहीही जीवनात नाही…. आत्ता प्रिये तुझ्या सारखं, कुणी गोड बोलत नाही…. एकाकी एकटा असतो, कुणीही विचारत नाही…. आत्ता प्रिये पूर्वीसारखं, नवं काय स्वप्नात नाही…. एकटेपणा आहे फक्त, […]

प्रवाही जीवन

वाहत असते जीवन सारे,  वाहने जीवनाचा गुणधर्म स्तब्ध राहता जीवन आपले,  कसे घडेल हातून कर्म वाहात होते, वाहात आहे, भविष्याते वहात जाईल सतत चाले ही प्रक्रिया,  जीवन करण्यास सफल आजही शास्त्रज्ञ हेच सांगतो,  निर्जिव वस्तूसुद्धा प्रवाही अणूची ती बनली असूनी,  प्रचंड हालचाल आत होई अणूत असूनी तीन भाग,  अतिशय वेगाने फिरती केवळ त्यातील वेगामुळे,  स्थिर साऱ्या […]

एका मनाचे हे भाग

एक विशाल मन,  भाग त्याचे अनेक विखूरले जावूनी, स्वतंत्र वाटे प्रत्येक…१, छोट्या त्या भागावरी,  वेष्टण शरिराचे अस्तित्व वेगळेच, भासते त्या मनाचे…२, मनाचे ते स्वभाव,  सारखेच असती फरक वृत्तीमध्ये,  कुणाच्याही नसती…३, अगणीत ती मनें, कोठे नसे फरक अनेक ती बनली, जनक तिचा एक….४ डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com    

आधार

वेलींना तो आधार होता,  वृक्ष वाटला दणकट परि बुंधा ज्याचा किडूनी गेला,  कोसळणार मग कधीतरी नष्ट करिल तो तरूवेलींना,  धरणीवरती आडवा होता सौंदर्य दिले लताफूलांनी,  सारे कांहीं विसरूनी जाता वेलींनो आणि झुडपानों,   सोडूनी घ्या तो आधार पोकळ स्वतंत्रपणे तुम्ही जगण्या ,  स्वावलंबनाचे टाका पाऊल डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com    

डोळ्यांआड

सांगते जरा ऐका, नका दाखवू हे रूप, माणूसच खातो चाखून माखून, मेल्या मड्यावरचं तूप !! हाड् म्हटलं की, कुत्रा तरी निघून जातो, माणूस मात्र कुत्रं बनून, शेपूट हलवित राहतो!!१!! सांगते जरा ऐका, नका……!! तुझं तू माझं मी, असं फक्तं मुखाने बोलतो, डोळ्यांआड दुसऱ्या ताटात जिभाळ गाळीत डोकावतो!!२!! सांगते जरा ऐका, नका……!! परके आले पुढ्यात, तत्त्व प्रदर्शन […]

ती आल्यावर

ती आल्यावर बाग बहरली ,घेत उखाणे ती आल्यावर सुरू जाहले ,नवे तराणे ती आल्यावर मीच टाळतो,पितही नाही,पाजत नाही सरले सारे ,जुने बहाणे ती आल्यावर मुलगा गेला हातामधुनी माय सांगते चालू झाले हे गाऱ्हाणे ती आल्यावर पदरी पडले रत्न देखणे तिच्या सारखे घरही झाले असे शहाणे,ती आल्यावर किती जाळले सूर्याने मज ती नसताना नभात जमले मेघ दिवाणे […]

सकाळ

कुणी उधळला क्षीतिजावरती रंग केशरी हा सांगा मळवट भरल्या उंच टेकडया कुठे निघाल्या पर्वत रांगा भिरभिरणारे पंख चिमुकले का उधळले चौखूर कुशीत घेऊन आभाळ सारे पक्षी उडाले दूर दूर झाडे वेली होऊनी जागी फुले कुणाला वाहतात हिरवी हिरवी तृणपाती अजूनी दवाने नाहतात उंचावूनी मान आपुली माड शोधतो कोणाला सोवळे नेसून पळस वेचतो पाने आपुली द्रोणाला कुणी […]

संस्कारमय मन

प्रयत्न मनाचा सदैव असे, भरारी घेण्याचा उंच आकाशी तारांगणांना, भेट देण्याचा….१, मनी आस ती राहत असते,  उचलून त्यास घ्यावे शिखरावरती जाता क्षणी,  स्थितीरूप घ्यावे…२, प्रयत्नात त्या साथ न मिळता,  खालती कोसळते विचार दबावापुढती त्याचे, काही न चालते…३, विचार संस्काराचे वलय, मनाभोवती फिरे निर्मळ पवित्र मन ते,  अवलंबूनी विचारे…४ डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

1 243 244 245 246 247 437
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..