नवीन लेखन...

भक्तांसाठी कष्ट भोगतो श्रीहरी

युगानू युगें उभा राही,   एका विटेवरी कष्ट भोगतो भक्तांसाठी   पांडुरंग श्रीहरी   ।।धृ।।   आई वडिलांची सेवा पुंडलीक भक्तीचा ठेवा भक्तित होई तल्लीन जगास गेला विसरुन उभा करुनी तुजला,    गेला निघूनी चंद्रभागेतीरी   ।।१।। कष्ट भोगतो भक्तांसाठी    पांडुरंग श्रीहरी   विषाचा तो पेला मीरेनें प्राशन केला भजनांत गेली दंग होऊनी पचविलेस विष तूं घेऊनी दुधामधले विष शोषूनी,   दाह […]

धन्य ती महाराष्ट्र माऊली !

धन्य ती महाराष्ट्र माऊली अनेक थोरा जन्म देऊनी पावन तू झाली     //धृ//   ज्ञानाचा तो मुकूटमणी, ग्रंथ रचिला ज्ञानेश्वरी ओवीबद्ध साज प्राकृतीं चढविला, भगवतगीतेवरी तेज चमकूनी सुर्यासम, दाही दिशा उजळली    //१// अनेक थोरा जन्म देऊनी पावन तू झाली   तुकाराम तो संत महान, अभंगाचा राजा हासंत खेळत शिकवली, जीवनातील मजा अभंगाची मधूर सुमने, सर्वत्र तुक्याने ऊधळली     […]

चित्त मंदीरी हवे

लोटांगण घालूनी शरण गेला, देव मंदिरीं तो आदर दाखविण्या प्रभूचे ठायीं, प्रयत्न करितो समर्पणाचे भाव दाखविण्या,  देहाला वाकवी मन जोपर्यंत विनम्र नसे,  प्रयत्न व्यर्थ जाई मंदिरी तुमचे शरिर असूनी, मन असे इतरीं श्रम तुमचे निरर्थक बनूनी,  मिळेल कसा श्रीहरी इतरत्र राहूनी चित्त तुमचे,  असतां मंदिराकडे खरे पुण्य ते पदरीं पडते, हेंच जाणा कोडे — डॉ. भगवान […]

पयोधी

मनातल्या कोलाहलाला मार्गस्थ करतोय मी, नेणीवेच्या जाणिवांना ही … प्रकांड तांडवाचा अभिशाप भोगतोय.. उसळणाऱ्या माझ्यातल्या उर्मींना शमवतोय ही मीच… सोनेरी वर्खाचा देखणा गालीचा, अवकाशाचे मखमली पांघरुण आच्छादून, निद्रीस्त होणारा, सृष्टीच्यावरच्या प्रत्येक घटनांचा साक्षीदार ही मीच… क्षितिजाचा अनादी अनंत रक्षक मी … निर्झरणि , तरंगिणी चे समर्पण स्विकारणारा , व्योमात व्यापून राहीलेल्या शशांक,भास्कराची धूनी शांत करणारा ही […]

गुणांची परंपरा

गादी चालविते माझी आई, माझ्याच आजीची मला वाटते परंपरा,  ती चाले घराण्याची….१, रात्रंदिनीचे कष्ट करणे, हा तिचा स्वभाव प्रेमळपणे खावू घालणें,  मनी तिच्या भाव….२, अधिकाराची नशा तिजला, शब्द तिचा कायदा जुमानत नाही कुणाचाही,  शाब्दीक तो वायदा….३, प्रेमळपणा असूनी अंगी,  अहंकार युक्त ती गुणदोषांनी भरले व्यक्तीत्व,  तसेच पुढे चालती……४ सोडून घ्या तो अहंकारी भाव, टिकवा प्रेमळपणा चक्रामधल्या […]

बंधनातील चिमणी

उड्या मारित चिवचिवत,  एक चिमणी आली दर्पणाच्या चौकटीवरती,  येवून ती बसली बघूनी दूजी चिमणी दर्पणी,  चकीत झाली होती वाटूं लागले ह्या चिमणीला,  आंत अडकली ती उत्सुकता नि तगमग दिसे,  ह्या चेहऱ्यावरी चारी दिशेने बघत होती,  आंतल्या चिमणी परी औत्सुक्याचे भाव सारे दिसती,  आतील चिमणीतही कशी करूं तिची बंधन मुक्ती,  काळजी लागून राही चोंच मारीते आवाज करिते,  […]

निर्णय

मर्यादेच्या कुंपणात राहूनच करायचंय सगळं संस्कार माझे हतबल होतीलच कसे..? अविश्वासाचं मोहोळ ही उठवू नकोस… माझ्या भोवती…. बहकतांना तुझ्या भूल थापांना त्यांनीच तर गर्तेच्या विळख्यातून सोडवलंय….मला प्रत्येक वेळी… बहरले जरी आता , रातराणीचा बेधुंद पणा लेवून… स्वैर वागण्याची शिक्षा ही देवू नकोस…. माझं स्ञीत्व जपणं सोपं नाही… पण अगतिकता ही एवढी नाही…. उन्मळून पडण्या पेक्षा… घट्ट […]

आर्जव

तुझ्या अश्रुंच्या चांदण्यांना आवर…. माझ्या ओंजळीतल्या उन्हात पाघळतील… तुझ्या अवखळ बटांना सावर… माझा हलकेच घात करतील… करू नकोस विषयांच्या शरांचा भडीमार… सावरता येणार नाही स्वतःला… मोहोर यौवनाचा सांभाळ भ्रमिष्ट व्हायचं नाहीये मला…. स्ञीत्वाचा अंगार जपून ठेव थोडासा… आहुती होण्याचं भान राहील मला…. मंञमुग्धतेची मशाल थोडीशीच पाजळ… भोवतालचा तुझ्याच नुसता आसमंत व्हायचं नाहीये मला… बेगडी सौंदर्या च्या […]

सह्याद्री पुन्हा गहिवरणार

स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज झी मराठी वाहिनीवरील २२ नोव्हेंबरचा भाग अख्या महाराष्ट्रासाठी काळजात हात घालून मनी हंबरडा फोडणारा होता. आज खूप दु: ख झाले एका युग पुरषाचा अंत पहिल्यादा मी अनुभवला… आशा महान युग पुरुषास माझ्या जाणता राज्यास विनम्र अभिवादन.. माझे शब्द रूपी काव्यपुष्प अर्पण करतो… काही चुकल्यास माफी मागतो ..एक शिवप्रेमी मावळा…. चिरून तो […]

उत्सव माझ्या कवितेचा

हे असेच मी बनावे..  नी असेच मी घडावे.. शब्दांनी ही रे माझ्या, माणसासाठीच लढावे. विष प्यावे अन शंकर व्हावे, शब्द माझे पैगंबर व्हावे.. फकिरा लिहावी इथे साठे नी शब्दांनीच आंबेडकर व्हावे.. आगरकर सुधारक हे दिवाने यावे, खरा धर्म सांगण्या गुरुजी साने यावे.. जोतिबा होऊन समाजाचे सृजन करावे, कवितेत मिराने प्रेमाचे भजन करावे.. पाजावे नाथाने गाढवास काशीचे […]

1 246 247 248 249 250 437
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..