कृतज्ञता
आज मागे वळून पाहताना मला उमगतेय की मला माझं अस्तित्व नाही… किंबहुना नव्हतेच कधीही कारण मी अंश आहे- तुमचाच वंश आहे तुमचाच मी भाग आहे- थोडा आईचा थोडा माझ्या पप्पांचा मग इतक्या उशिरा का या जाणीवांची जाण यावी अर्ध आयुष्य उलटल्यावर- स्पंदने का तीव्र व्हावी शक्तींच्या माझ्या उगम तुम्ही नि स्त्रोतही माझ्या न्यूनत्वाला निर्मीती तुमचीच मी; […]