निरोप देताना
कविता […]
कविता […]
संपलेल्या दिवाळीचे कवित्व अजून बाकी आहे आहे पणती अजुनी वात तिची विझली आहे दारातील आकाशदिवा अजूनही तसाच आहे दिवा त्यात कोण लावील आता तो बेकार आहे । पाडवा आणी भाऊबीजेचे कोणास कौतुक आहे कसले ऊटणे कसले तेल मोतीसाबण व्यर्थ आहे आता आपला नेहमीचा हमाम साबण खरा आहे गरम पाणी मिळणे आता नशीबाचा भाग आहे । दिवाळी […]
रस्त्यावरुन चालताना रुतले पायात माझ्या काटे कितीक चालत होतो अनवाणी मी त्यात काट्यांचा काय दोष । दोष होता माझा खरा अनवाणी मीच चाललो दोष काट्याच्या मारुन माथी चूक माझीच मी लपवितो । येथे दुबळ्यांचे जगणे असेच नियम आहे या जगाचा तुडऊन जातील ते तुम्हास बघतील फक्त स्वार्थ स्वताचा । होऊ नका दुबळे तुम्ही कधी झुकू नका […]
सुचले होते सारे कांहीं परि, ढळत्या आयुष्यीं संधिप्रकाश तो दिसत होता, सूर्य अस्ताशीं…१, काळोखाची भिती उराशीं, लांब आहे जाणे कळले नाहीं यौवनांत, कशास म्हणावे जगणे…२, समजून आले जीवन ध्येय, चाळीशीच्या पुढें खंत वाटली जाणता, आयुष्य उरले केवढे…३, ज्ञानविषय अथांग होते, अवती भवती कसा पोहू ह्या ज्ञान सागरीं, विवंचना होती…४, निराश होऊं नकोस वेड्या, कर्तृत्वाला काळ न […]
आभाळ दाटून आले चहूकडे अंधार झाला तोडण्यास लचके कुणाचे लांडगा सिंह झाला फुंकली हवा शिडात विषारी जातीयतेची भिडवतात धर्मांधांना भरण्या तुंबडी स्वतःची। भासवती निधर्मी स्वताला येथे तुम्हा आम्हास ऊचलता तळी ऊपऱ्यांची यांचा जातो जन्म लयास बहुसंख्य जातोय बळी ना अंत लांगुलचालनास भावना पायदळी तुडवतात ना खंत कधी कुणास । टपलेत मदारी येथे रोज दाखवती नवीन खेळ […]
सोडूनी मज गेलीस तू आता मी कसे जगावे वाटते तव आठवणीत जीवन हे संपवावे । एक एक क्षण प्रेमाचा का आठवणीत रहावा ह्रदयातील त्या आठवणींना अश्रुंत संपवावे । ठेवले जपून ह्रदयात मी त्या मधूर क्षणांना का त्या मधूर क्षणांना पुन्हा पुन्हा मी आठवावे । आसमंत चांदण्यांनी झगमगून गेलाय येथे एका चांदणीसाठी मग मी का रुसून बसावे […]
मला वाटते आज नव्याने जगावे तुझ्या धुंद डोळ्यात मिसळुनी जावे पुन्हा एकदा ती मधूर रात्र यावी मिठीत तुझ्यासवे विसावून जावी । पुन्हा आठवे मज ती रात्र मिलनाची थंडगार वारा अन ती रात्र चांदण्यांची तशी रात्र मिलनाची पुन्हा जागवावी रात्र सरली तरी ना कुणा जाग यावी । विसरावे सर्व जग हे तु मज जवळी येता ना कुठल्याही […]
खळी पडून गालावरी सुंदर तूं दिसते आनंदाचे भाव दर्शनी मधूर तूं हांसते इवले इवले ओठ फूलपाकळ्यांपरि लांब लांब केस काळे भुर भुर उडती मानेवरी मोत्यासारखे दांत भासे कुंदकळ्या बदामाचा आकार मिळे तुझ्या डोळ्या इंद्रधनुष्याचा बाक दिसे भुवयाला चाफेकळीची शोभा मिळाली नाकाला चमकते अंगकांती फाटलेल्या झग्यातूनी दिसते निसर्गाची देणगी तुझ्या गरीबीतूनी डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० Bknagapurkar”Gmail.com
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions