नवीन लेखन...

डोहाळे जेवण

ओटी भरण आज कौतुकाचे हवे नको काय ते तूच सांगायचे ओटी भरण आज कौतुकाचे ।।धृ।। शालू हिरवा जरतारी काठ चंदनाचा पाट पक्वान्नांचे ताट श्रीखंड खिरीला रंग केसराचे ।।१।। मोगरा अंबोली, दवणा मरवा, रूपाराणीला या, मखरी मिरवा, मुखावरी तेज विलसे गर्भाचे ।।२।। सुगंधित वाळा, उटी चंदनाची हौस पुरवा फळांची फुलांची, डोहाळे जेवण रात-चांदण्यांचे ।।३।। कौसल्येचा राम, देवकीचा […]

नवरात्रीचे नवरंग

नवरंग नवरात्रीचे ! प्रतीक शक्ती-भक्तीचे !! पिवळा रंग सोन्याचा ! शुद्ध तेजस क्षणांचा ! हिरवा रंग सृष्टीचा ! वृध्दी,सुख-समृध्दीचा !! करडा रंग भाग्याचा ! निरामय आरोग्याचा !! केशरी रंग निर्मितिचा ! राजमंगल पताकांचा!! पांढरा रंग शांतीचा ! एकोपा अन मैत्रीचा !! लाल रंग कुंकवाचा ! सर्व मांगल्य मांगल्याचा !! निळा रंग अस्मानाचा ! निर्मळशा हृदयाचा !! […]

जागर देवीचा

शरद ऋतूचे आगमन होता …. झळकत येतो अश्विन मास !! तरुणाईच्या जल्लोषात अन …. थोरांचा तो जागरहाट ! घट बसता नवरात्राचे प्रतिपदा ते नवमीचे !! सज्ज झाली महिषासुरमर्दिनी… असुरांचा वध तो करावया अखंड दीप हे प्रतीक असे ….. शक्ती अन त्या वायूचे !! लहरी त्याच्या दाही दिशातही ….. घननीळा त्या बरसतात ! नवरात्रीचे नऊ रंग हे […]

नातं कसं असावं?

नातं कसं असावं? नातं डब्यासारखं असावं.. उघडल्यावर रुचकर, खमंग आठवणी देणारं आणि त्यांना जपूनही ठेवणारं.. तर कधी नाविन्याला जन्माला घालणारं.. नातं कसं नसावं..? तुझ नि माझं सारखचं रे, असं न म्हणणारं वा माझं सगळ्यांवर सारखाचं प्रेम आहे हे हि न सांगणारं.. नातं कसं असावं? नातं डब्यासारखंचं असावं.. ज्याची झाकणं ज्याची त्यालाचं बसतील असं.. – शिल्पा परांडेकर

सांग दर्पणा कशी मी दिसते

सांग दर्पणा कशी मी दिसते… ममतेचे औदार्य की फक्त आरसपाणी सौंदर्य? मायेची सावली की फक्त शोभेची बाहुली? ल्यायले जेंव्हा मी धैर्य, क्षमा, जिगर, हिम्मत हे अलंकार तरीही नथ, पैंजण, बांगड्या, मंगळसुत्र म्हणजेच ‘मी’ हा नाही का वाटत चमत्कार? का संभ्रम, का नकार? अस्तित्वासाठी किती तुडवायचे अजून निखार? सांग दर्पणा सांग कशी मी दिसते…? सृष्टीचे सगुण रूप […]

काय सांगावे तुला, काय सांगू नये

काय सांगावे तुला, काय सांगू नये या कोड्यात राहिलो आयुष्यभर नेमकं जे सांगायच होतं ते ते सांगायच राहुनच गेल्ं !! जेंव्हा उन्ह सरली, तेंव्हा छत्री उघडली. नको असतांना, सावली अंगावर झेलली. — भास्कर पवार

करीयर

प्लॅनिंग प्लॅनिंग करतांना आयुष्यच जगावयाचच राहुन गेल !! बेरीज कधी जमलीच नाही वजाबाकीच सदैव होत गेली !! वेळेच भान ठेवता ठेवता— वेळच कायमची निघुन गेली !! हंसु हंसु म्हणताना आसवांनीच सरशी केली —– आयुष्याचे आरेखन करता करता बरच काही बरच काही राहुन गेल— बरंच काही —-सारच काही राहुन गेल —-राहुन गेल —– मनासारख जगण्याच राहुन गेल— […]

सोडून साथ सारे साथी निघून गेले – गझल

वृत्त :- आनंदकंद सोडून साथ सारे साथी निघून गेले ठेवून एकट्याला, पक्षी उडून गेले घेऊन शीर हाती सैनिक तुटून पडले ही बातमी मिळाली, शत्रू पळून गेले दुष्काळ कोरडा हा डोळ्यात पूर आले जित्राब पोसलेले भूके मरून गेले. रडणार कोण येथे मरणास रोजच्या या डोळ्यातले तळेही आता सुकून गेले दुनियेस जिंकणारे तोऱ्यात फार आले जिंकायचे सदा पण […]

गोड स्वप्नं 

अजुनही एकांतात कधी तिला आठवते कोवळ्या त्या मनाचे सुंदर गोड स्वप्न ते… त्याला पाहुन तिचं मन झुरलं होतं कळलं नव्हतं तिला पण ह्रुदय हरवलं होतं बसल्या बसल्या बोटानं वहीत रेषा ओढत होती स्वतःच्या नावापुढे त्याच नाव जोडत होती झुरलेल मन तिचं शब्द शोधत होतं भावनां व्यक्त करण्यास बळ शोधत होतं ओठांवरच्या शब्दांना कंठ नाहीच फूटला हळुहळू […]

शनिवारच साहित्य : कविता : मात

साधला मी मध्य आता दोन ध्रुवांच्या मध्ये शोधला आता दुवा मी भाकरी अन भुके मध्ये पाय नरकात माझे हृदय पण स्वर्गात गेले इमान रखण्यासाठीच मी थोडे मला बईमान केले रात्र आली रात्र गेली काळोख ना सरला कधी सूर्य तो दिसतो कसा पाहण्यास नाही अवधी एक सिंहासन असा मी झोपडीतच थाटला मीच राजा झोपडीचा दुःख झाली माझी […]

1 254 255 256 257 258 437
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..