शिखरावरी बांधली मंदिरे
विचारांच्या उठती लहरी, वलये त्यांची होत असती । सुविचारांची वलये सारी, नभाकडे जात दिसती ।।१।। पवित्र निर्मळ विचारांच्या, तरल अशा लहरी असती । अशुद्ध साऱ्या विचारांची, जड लहरी तळांत राहती ।।२।। फार पूरातन काळी देखील, उकल दिसते या गोष्टीची । पवित्रतेच्या सर्व स्थळांनी, शोधली जागा शिखरावरची ।।३।। डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com