एक शोषन
शोषून शोषून जमविता, झुरुन झुरुन मरुन जाता पैशांनी भरलेल्या पिशव्या फाटून जातील हाती राहिल ते पिशव्यांचे वस्त्र तुमची आसवे पुसण्यासाठी डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० Bknagapurkar@gmail.com
शोषून शोषून जमविता, झुरुन झुरुन मरुन जाता पैशांनी भरलेल्या पिशव्या फाटून जातील हाती राहिल ते पिशव्यांचे वस्त्र तुमची आसवे पुसण्यासाठी डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० Bknagapurkar@gmail.com
जेव्हा दुजाचे नुकसान होते, उत्सुक दिसे कुणी स्वभावाची ही विकृती जाणता, खंत वाटली मनी बागेमध्ये फिरत असता, फूल तोडतो अकारण सुगंध त्याचा क्षणीक घेवूनी, देतो ते फेकून हाती देता सुंदर खेळणी, तोड मोड करिते लहान बालक खेळण्यापेक्षा, तोडण्यात दंग होते लय पावणे प्रतिक शिवाचे, ईश्वरी असतो गुण ‘नष्ट करणे’ निसर्ग स्वभाव, हे घ्या तुम्ही जाणून. […]
राधे, आठवाचे आसु कागं डोळ्याशी झरती त्या दुष्ट कान्ह्यासाठी साऱ्या गोपिका झुरती त्याची निराळी विरक्ती सारी आगळीच तऱ्हा तुझी सय का न येई का तो गोपिकांचा सारा? का गं राधे तो माधव क्रूर स्मितातून हासे तुझ्या डोळ्यात आसवं त्याच्या विरहाचे ठसे सांग त्याला का न येई कधी कधी तुझी सय का न तुझिया डोळ्यांचा कधी तो […]
पूर्वीच ते घर कसं जायचं अगदी गजबजून गप्पांच्या त्या मैफलीत आठवणी यायच्या धावून. आता कसं सर्व काही शांत अन् निवांत आहे पण, आठवणींच्या आठवणींने मन थोडसं अशांत आहे. पूर्वी आठवणी कशा अगदी मनमोकळ्या हसत सवय नव्हती त्यांना अन् नव्हत्या कधी रुसत. आठवणी पूर्वी कशा रहायच्या सदैव बोलत कुजबूजतात कधिमधी आणि बसतात आता झूरत. भिजतात काही आठवणी […]
कधी तू ‘शिक्षक ‘असतेस , तर कधी तू ‘शिक्षा ‘ असतेस ! कधी तू खूप ‘दूरची’ भासतेस, तर कधी तू ‘जवळची’ असतेस! बरेचदा तू ‘आई ‘असतेस, पण प्रसंगी तू ‘बाप’ होतेस ! कधी तू ‘असतानाही’ नसतेस, तर कधी ‘नसतानाही’ असतेस ! मला हवी तशी ‘तू’ कधीच नसतेस, म्हणून मग तू फक्त ‘बायको’ होऊन रहातेस ! कधी […]
कवि होणें सुलभ असावे रसिक होण्यापरि जिवंत ठेविती कवितेला हीच मंडळी खरी ।।१।। भावनेचे उठतां वादळ व्यक्त होई शब्दानीं भाव शब्दांचा हार दिसतो काव्य ते बनूनी ।।२।। भाव येणे सहज गुण तो मानवी मनाचा परि बंदिस्त त्याला करणे खेळ हा कवीचा ।।३।। शब्द पिंजरा नि भाव पक्षी ओळखी को रसिक कवि मनाशीं ‘स्व’ भावांचे करी […]
जेव्हां मी म्हणतो माझे, सोय माझी असते त्यांत, देह जगविण्या कामीं, प्रयत्न हे सारे होतात….१, देह वाटते साधन, प्रभूकडे त्या जाण्याचे, त्यासी ठेवतां चांगले, होते चिंतन तयाचे…..२ भजन करा प्रभूचे, सूख देवूनी देहाला परि केवळ सुखासाठीं, विसरूं नका हो त्याला……३, देह चांगला म्हणजे, ऐश आरामीं नसावे, ती एक सोय असूनी, त्यांने प्रभू मिळवावे…..४ […]
मरूनी पडला एक प्राणी, जंगलामधल्या नदी किनारी । कोल्ही कुत्री आणि गिधाडे, ताव मारती त्या देहावरी ।।१।। एके काळी हेच जनावर , जगले इतर जीवांवरी । आज गमवूनी प्राण आपला, तोच दुजाची बने भाकरी ।।२।। निसर्गाचे चक्र कसे हे , चालत असते सदैव वेगे ।। एक मारूनी जगवी दुजाला, हीच त्याची विशेष अंगे ।।३।। डॉ. […]
कुठे शोधू तुला, ध्यास लागला मनी वाटे मजला, तू बसलास लपुनी इंद्र धनुष्याचे रंग, आकर्षक वाटती बघण्यात दंग, लक्ष वेधुनी घेती ओढ्याची झुळझुळ, पडे कानावरी ऐकून नाद मंजुळ, मना वेडे करी फुलातील गंध, तल्लीन करी मना होऊनी मी धुंद, विसरे सर्वाना फळातील रस, देई मधुर स्वाद उल्हासी मनाला, देऊनी आनंद वाऱ्याची झुळूक, रोमांचकारी […]
चैतन्य तुझ्या हृदयीचे सदैव असेच राहू दे खोडकरपणा तव मनीचा सदैव असाच राहू दे । वार्धक्याची जाणीव नच व्हावी तुजला कधीही मजवरचा प्रेमवर्षाव सखे सदैव असाच राहू दे । आता भांडण नच कोणाशी ना वैर आहे आपुले एकमेकावरील प्रेमाची साथ सदैव टिकून राहू दे । तुजवरील प्रेमाने मी रचिल्यात कैक कविता जरी त्या कवितेतील रचनांचा कैफ […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions