नवीन लेखन...

व्यर्थची यात्रा

जमले होते असंख्य भाविक, जगंदबेच्या दर्शना  । कांहीं तरी मागत होते,  हात जोडूनी चरणा  ।। दयावान ती आहे समजता,  गर्दी होते तिजपाशीं  । कधी न दिले काहींहीं तिजला,  मग ही मागणी कशी ?  ।। जावू नका दर्शनास तिच्या,  रिक्त अशा त्या हाताने  । तिला पाहिजे ताट पूजेचे,  भरलेले भक्ती भावाने  ।। व्यर्थ होवून जाती ते श्रम, […]

हें माणसा !

मानव योनी हीच महान    नको करु हा वृथा अभिमान मानुनी प्राण्यांत श्रेष्ठ    झालास तूं अतिगर्विष्ठ ‘विवेकशक्ति’ असे ज्ञान    हेच ठरविसी परिमाण हाच निर्णय चुकीचा    पाया ठरे गैरसमजाचा उंच आकाशांतून घार    पाही भक्ष्य जमिनीवर तुजला नसे तिक्ष्ण दृष्टी    निसर्गे दिली ती पक्षिसृष्टी तंतुसी काढूनी मुखातूनी   सुंदर विणी जाळे त्यांतूनी कोळी विणतो सुंदर जाळे    वास्तूकला ती कुणा न […]

दोन्हीं दारीं मारामारी

दोन्हीं दारीं मारामारी खानेसुमारी पानसुपारी. खालीवर तागडी जुळली फुगडी हुशारला गडी फुशारला गडी. आतां झाली पक्की आतां मिळेल नक्की लाल-दिव्याची गाडी ! – सुभाष स. नाईक

कुणी भुंकली

कुणी भुंकली कुणी थुंकली कुणी म्हणालं, ‘जंगली’. पण विधानसभा नाहीं भंगली. अखेरीस एकानं केलं वॉक् आऊट, अन्, दुसरी पार्टी ट्रस्ट-व्होट जिंकली – सुभाष स. नाईक

ध्यानस्त शिव

शिव कुणाचे चिंतन करितो ? प्रश्न पडला मनी, तोच तर आहे प्रभू जगाचा काय तयाचे ध्यानी…१, जेव्हां आम्ही चिंतन करितो, ध्यान लावी प्रभूकडे, प्रयत्न करूनी जगास विसरे, लक्ष केंद्रितो त्याजकडे….२, उलट दिशेने शिवाचे चिंतन, चालते जगतासाठीं ध्यानामध्यें स्वतःसी विसरे, लक्ष्य त्याचे इतरासाठीं ….३ डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com    

मुक्तक-दशपदी

झालं इलेक्शन व्होट-कलेक्शन. एक पार्टी हरली एक जिंकली. पण कुठेतरी माशी शिंकली ; आणि, लागली भलत्याच भिडूच्या माथीं, सोनेरी सत्तेची टिकली. – सुभाष स. नाईक

जीवाची राणी लिहिती कहाणी

जीवाची राणी लिहिती कहाणी । गातिया गाणी माझी जीवाची राणी ! गाव त्या राणातली नदीच्या पात्रातली झाडावरच्या पाकळीची । लिहिती कहाणी गतिया गाणी माझी जीवाची राणी ! बागेतील रोपांचे । रोपांच्या कळीची। कळीच्या फुलांची ।फुलांच्या पाकळीची मनातल्या शब्दांशी । शब्दाच्या भावनेशी ।भावनेच्या प्रेमाची !!! लिहितिया कहाणी । गातिया गाणी । माझी जीवाची राणी!!! माझी जीवाची राणी […]

प्रेमाची नाही वेगळी कहाणी

नाही ग मी राजा पण तू आहेस माझी राणी आपल्या प्रेमाची नाही वेगळी अशी कहाणी… सांग मला एकदा काय आहे तुझ्या मनी ? जुन्या त्या आठवणींनी नको डोळ्यात पाणी नको होऊस तू दूःखी थोड्याश्या विरहानी प्रेम नाही होणार कमी जरी ढळेल जवानी आपल्या प्रेमाची नाही वेगळी अशी कहाणी… आपण फक्त जवळ बसावं धुंद करेल रातराणी आयुष्य […]

आयुष्य वाया घालू नका

दवडू नका आयुष्य तुम्ही,  वेळ घालूनी असा तसा, पदरी येई निराशा तुमच्या,  गेला क्षण तो येईल कसा….१, मर्यादेतच जीवन असूनी,  गतीमान ते असते बघा, स्वत: भोवती केंद्रीत होता,  कसे जाणाल इतर जगा….२, इच्छा असते वाया न जावे,  आयुष्य सारे विनाकारण हर घडीला विचार असावा,  इतरांसाठी असते जीवन….३, जेंव्हां तुम्ही सेवा करिता,  इतर मनाचे भाव जाणूनी तेच […]

दशपदी

(मोरोपंतांची क्षमा मागून. अंतिम पंक्ति  त्यांच्याकडून घेतलेली आहे). चुनावीं, मोठी पार्टी म्हणुन् निवडुन् आलो अम्ही सत्ता हातीं घेण्यांसाठी  होती संधी नामी परी, आकडे बहुमताला पडले थोडेसे कमी त्यासाठी कोणां पक्षाची आम्हां हवी होती हमी. विरोधकांची, अपक्ष यांची, म्हणून केली हांजी-हांजी गळास कैसा कोण लागतो, गणितें केली ताजी-ताजी परंतु नाहीं खेळ साधला, सरकार न बनवूं शकलो दात-ओठ […]

1 266 267 268 269 270 437
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..