नवीन लेखन...

नवरा माझा नवरा आहे

खरं सांगते बरा आहे नवरा माझा नवरा आहे थोडासा तो कोडगा आहे जणु माझा पोरगा आहे कधी तो माझा पप्पा आहे मनातला नाजूक कप्पा आहे थोडासा तो चिडका आहे पण मायेचा झरा आहे खरं सांगते बरा आहे नवरा माझा नवरा आहे लहानांशी त्याची गट्टी आहे थोडासा तो हट्टी आहे त्याला वाटतं तो धाडसी आहे मला वाटतं तो आळशी आहे थोडासा तो हळवा आहे माझ्या जिवनाचा वारा आहे खरं सांगते बरा आहे नवरा माझा नवरा […]

ज्ञान देणारे सर्वच गुरू

अवतीभोवती सारे तुझ्या,   आहेत गुरू बसलेले जाण तयांची येण्यासाठी,   प्रभूसी मी विनविले  ।। निसर्ग शक्तीच्या सर्व अंगी,   काही तरी असे गुण आपणासची ज्ञान असावे,   घेण्यास ते समजून  ।। उघडे ठेवूनी डोळे तुम्ही,   बघाल जेंव्हां शेजारी काही ना काही ज्ञान मिळते,   वस्तूच्या त्या गुणापरी  ।। सारे सजिव निर्जिव वस्तू,   गुरू सारखे वाटावे तेच आहेत ईश्वरमय,   तुम्हीच  समजावे  […]

माझी विठू माउली

विठु माऊली तू माझी, माझ्या माय बापाचा कैवारी, साऱ्या जगताला तारी, ना थकले करूनी पायवारी…. रथ तूझ्या संसाराचा, चालवी माझी रखुमाई, तूझ्या सोबतीने ती उभी, सौभाग्याचं लेनं लेवूनी…. तुळशीमाळ हार तुझिया गळा, साऱ्या भक्ता तू लावसी लळा, मी तुझ्या अंतरीचे लेकरु, पिकव रे सोनं माझ्या मळा…. – श्वेता संकपाळ.

आमचे साहित्यिक

पुस्तकांच्या वनात शब्दांचा खजिना शोधतात, कुंचला अन् लेखणीद्वारे पंचरत्न लुटतात, अनुभवाची शिदोरी कव्यरुपी माळेत गुंफतात, म्हणे आमचे साहित्यिक खूप भारी लिहितात ! कईक प्रश्नतर यांच्या गजल व चारोळी नेच सुटतात, छोट्याश्या लेखातून हिरे मोती लखलखतात, पॉलिश करण्यासाठी हे पुन्हा साहित्यच वाचतात, म्हणे आमचे साहित्यिक खूप भारी लिहितात! नकळत मानवी हृदयावर अक्षर रत्नांची झालर घालतात, रोजच्या रटाळ […]

सोड मानवा

“सोड मानवा , सोड रे ! हे वागणे आहे लज्जास्पद , तुला पाहूनी असे, लाजेल एखादे श्वापद…! भल्या मोठ्या अपेक्षांची भली मोठी रास रचतोस, गैरसमजुतीची ठिणगी पडताच, प्रेम वृत्ती मागे सरतोस…! सन्मान, सचोटी,आदराचा खोटा सोहळा थाटतोस, तुझा हट्ट हेका मात्र शिरतुरा खोचून सांगतोस…! नतद्रष्ठ बुध्दी तुझी रे, अजाणते समज बाळगतोस, सारासार विचार न करता, बंध नात्यांचे […]

विरह

पहाटेच धुकं नजरेसमोर पसरलेलें, आनंदाचा दवबिंदू अलगद पानावर पहुडलेला, अचानक वादळ आलं, अबोल अजानतं, होत्याचं- नव्हतं करत, सर्व नष्ट करून गेलं! मन कशातच गुंतत नाही, आठवण आठवणींची आठवतही नाही, काल होता आज आहे उद्या असेलही कदाचित, काळासोबत अनमोल ते हास्य खुलणार नाही! सहवास होता,सदोदित साथ देणारा, संयम होता, माझे बोल झेलणारा, जिद्द होती, नितांत प्रेम करण्याची, […]

।। जीवन आहे एक कल्पवृक्ष ।।

जीवन आहे एक कल्पतरु मिळेल ते, जे विचार करुं ही आहे सुवर्ण माती उगवेल ते, जसे पेरती   ।।१।। राग लोभ अहंकार मोठेपण भासविणार दाखवूनी क्षणिक सुख देई पर्वतमय दुःख   ।।२।। दया क्षमा शांति उच्च भावना असती बिंबता हे सद् गुण लाभेल खरे समाधान   ।।३।। घाणीच्या राशी पडती निराशा व दुःखची वसती स्वच्छता व निर्मळ घर तेच […]

तुझ्या अव्यक्ततेमधील व्यक्तता

आपलं कधी असं ठरलं नव्हतं आपण बोलताना हा असा अमुक अमुक विषय काढू तमक्या विषयावर तू तुझं मत मांड हा विषय ऐनवेळीचा विषय म्हणून घेऊया का चर्चेस हा एक इतका महत्वाचा विषय आहे तू तुझे विचार ऐकव आणि मग मी माझे मत मांडते मग तुझ्या वाट्याला एवढी वाक्ये आणि एका वाक्यात अमके एवढेच शब्द बसण्याची मर्यादा […]

शब्द

शब्द  हसवतात शब्द रडवतात …. शब्द शब्दांची सांगड घालत मनात रूजंवतात नवं कोर वाक्य ! शब्द तारतात शब्द मारतात शब्दच तलावरीचे घाव होऊन मन घायाळ करतात ….! शब्द अन् शब्दाचा समजून घेण्याचा भाव बदलला की शब्दच रूसून छळू पहातात ….! शब्द आतड्यांत उकीरडयाचे भक्ष विनतो शब्द शब्दांची रानफुल होऊन मृगजळ बनतो ! शब्द कोवळे घन थरारतो […]

फुंकर

काल कालच्या काळामध्ये, कलून पडला असा कसा? भाव भावनांच्या लगोरिमध्ये, रडत बसला ढसा-ढसा !! भुत-भविष्य तुला न कळती, स्व कुशीत निजलास कसा? कोळ्याच्या जाळ्यात अडकुनी, तडफड करसी, जणु तू मासा !! दवबिंदूंचा पडता सडा अंगणी, तव चुंबन घेता थेट सूर्या, नव ध्येय अन् उम्मेदिने, रूप हिरा चे लाभे तया !! कुंभार तू तुझ्या जीवनाचा, शिल्प घडवण्या […]

1 269 270 271 272 273 437
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..