नवीन लेखन...

सत्य दृष्टांत

कुठुनशी येते नित्य कविता मलाच माझे कळतच नाही झुळझुळते वास्तव शब्दांचे कसे ते मजला कळत नाही निर्बंधी मी क्षण टिपतो सारे मनशब्दां बांध घालित नाही सत्य दृष्टांता स्वछंदी गुंफितो इमले कल्पनांचे रचित नाही भावनांच्या त्या शब्दफुलांवर मी अन्याय कधी करीत नाही शब्दशब्द, दानच दयाघनाचे मी अलगद वेचणे सोडित नाही शब्दभावनांच्या अथांग सागरी मी डूंबायाचे कधी सोडित […]

नैराश्य

मी निराश झालो आहे ।। खाचखळग्यांतून, दगडधोंड्यातून पराभवाच्या अपमानातून शल्य मनातले मनातच ठेवून त्यातून वाट शोधत आहे ॥ मी निराश झालो आहे ॥ १ ॥ आत्मविश्वास तो गडबडे ताबा अन् मनावरचा उडे येथेच अडकून घोडे पडे दुःख चावरे त्याचे मला आहे ॥ मी निराश झालो आहे ॥ २ ॥ प्रवास माझा पहाटे धवल यशाच्या धुक्याचे पटल […]

सार्थक

जगती जन्म हा हिशेब गतजन्मांचा प्रारब्धभोग पुर्वसंचिताचे….. कधी सुखदा, कधी दुःख वेदनां हेच खेळ सारे मूक साहण्याचे…. पराधीनता जगती सकल जीवाजीवांची अनामिका हाती दोर कठपुतळीचे….. दैवी प्रीतभावनां भाग्य ते भाळीचे वात्सल्य अमृती कृपासिंधु मातेचे…. तोच कृपाळू एक सत्य ! शाश्वताचे त्याला नित्य स्मरावे हे सार्थक जीवनाचे…. –वि.ग.सातपुते.( भावकवी ) 9766544908 रचना क्र.१९० ६/८/२०२२

सांजवात

लोचनी सांजवात आठवांची झाली व्याकुळ कावरी बावरी… तव निर्मली रूपात मी हरवलो सांगना कसा परतु मी माघारी… तुच लाविलास जीवास जीव ओथंबुनी, ओघळतेस अंतरी… आत्म्यास जाणवतो स्पर्श तुझा हे सत्य मौनी कवटाळीतो उरि… हुरहुर ती, हरएक क्षण सोबती जगविते लोभस संध्याकिनारी… होता नि:शब्द , वादळ अंतरीचे मग हॄदयी, घुमते हरिची बासुरी… — वि.ग.सातपुते (भावकवी) 9766544908 रचना […]

भिज नां पाऊसात

भिज नां जराशी नखशिखांत मना नाहूदे चिंबचिंब पाऊसात… हा ऋतुच बहरलेल्या प्रीतीचा ओलेती ये भावनांच्या मिठित… निर्मळ स्पर्शात चैतन्य आगळे ब्रह्मानंदाची, साक्ष त्या सुखात… निसर्गाचे, अविष्कार पांघरावे भिजुनी रिमझिमल्या सरिसरित… ही कोजागिरी, चंद्र चांदण्यांची कोजागर, कोजागर मनांमनात… — वि.ग.सातपुते (भावकवी) 9766544908 रचना क्र. २५३ ९/१०/२०२२

आत्मरंग

सप्तसुरांनी ब्रह्मांड वेढिले शब्दही आले नाचत नाचत… चंद्रफुलांची उधळण झाली निळ्यासावळ्या गगनात… भावफुलांना ठावुक नव्हते मनांतील हे आत्मरंग सात… शब्द कोणते, भावरंग कोणते हृदयी, प्रीती कुणाची गात… आळविता गीतात सुरांना गंधर्वाची तान अवकाशात… प्रभु तुजपुढे लावियली मी गाभारी निरांजनी फुलवात… आता उजळू दे मनगाभारा भावनांच्या निष्पाप मंदिरात… — वि.ग.सातपुते (भावकवी) 9766544908 रचना क्र. २५१ ८/१०/२०२२

उद्ध्वस्त मने

दुर्दैवाचा नाद निनादे झाकोळून ये आता निराश माझे मन हे गाते मरणाच्या गाथा मरण आहे मिसळून जेथे आयुष्याशी एखाद्या कुणी धराव्या कशास आशा अप्राप्याच्या एखाद्या ॥ १ ॥ मरणास माझ्या मीच जातो हात पसरोनी सामोरा उपेक्षिताचा निर्वाणसोहळा, साक्षीला मी अन् एक कोपरा मनात माझ्या धडपडून आसू जमवू पहातो ओंजळभर गीत माझे तुलाच लिहिले मृत मना हे […]

आत्मानंद

जगुनीया झाले सारे काही आता मागणे काहीच नाही… कसले सुख, कसले दुःख संवेदना काहीच उरली नाही… प्रारब्ध संचिती जन्म लाभला भोगायचे काही राहिले नाही… उरलेले क्षण आनंदात जगावे आता कुणाला दुःखवू नाही… लौकिक , भौतिक नश्वर सारे सोबत कधीच काही येत नाही… आत्मानंद ! केवळ मन:शांती याविण दूजे सुंदर सत्य नाही… — वि.ग.सातपुते (भावकवी) 9766544908 रचना […]

वैफल्य

निरर्थक शब्दांची दाटी, का होते कुणास ठाऊक काहीच कळत नाही सजवलेली शय्या, ताटी का होते कुणास ठाऊक काहीच कळत नाही ॥ १ ॥ मनातले उमटत नाही कुणास ठाऊक का म्हणून सुटा पसारा जुळतच नाही कुणास ठाऊक का म्हणून ॥२ ॥ वेड्यागत हव्यास का हा सामान्यतेहून दूर जाण्याचा धडपडूनही जेव्हा फसतो प्रयत्न हिमालयाला छेदण्याचा ॥ ३ ॥ […]

मती गुंग होते

कधी कधी मती गुंग होते माणुस कधी कळत नाही भेटीसाठी कुणी उताविळ तर कुणी, बोलतही नाही….। बंद दरवाजे, बंद खिडक्या कोण शेजारी कळत नाही मी आणि फक्त कुटुंब माझे संसारी दुसरे कुणीच नाही….। संवादही सारे खूंटले आता प्रेमवात्सल्यही जगले नाही व्यवहारी, जग हे झाले सारे कुणा कुणाची फिकिर नाही….। सुसंस्काराची सुकली माती ओल, कुठेच झिरपत नाही […]

1 26 27 28 29 30 437
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..