छत्रपतीचा जयजयकार
मराठदेशाच्या मातीचा गर्जा जयजयकार मराठियांच्या छत्रपतीचा गर्जा जयजयकार ।। उन्नत दुर्गम सह्यकड्यांचा निबिड वनें, बेलाग गडांचा जलदुर्गांच्या दृढ पंक्तीचा गर्जा जयजयकार ।। मराठियांच्या छत्रपतीचा गर्जा जयजयकार ।। चपळ, वायुसम घोडदळांचा शूर मावळ्यांच्या टोळ्यांचा गनिमी काव्याच्या क्लृप्तीचा गर्जा जयजयकार ।। मराठियांच्या छत्रपतीचा गर्जा जयजयकार ।। अतूट बुरुजांच्या रांगांचा लखलख पात्यांच्या खड्गांचा ढालीसम निधड्या छातीचा गर्जा जयजयकार ।। […]