प्रदूषण- (१) – पाऊस- भूत आणि वर्तमान
श्रावणात बरसल्या… अमृत धारा……. पर्यावरणविषयक लघुकाव्ये…. […]
श्रावणात बरसल्या… अमृत धारा……. पर्यावरणविषयक लघुकाव्ये…. […]
सारेच आहे प्रभूमय, अणूपासून ब्रह्मांड होय…१, ब्रह्मांड भाग तो ईश्वराचा, आकाश भाग हा ब्रह्मांडाचा….२, सर्वत्र व्यापले आकाश, न जाणती त्याचे पाश, ….३, वायूचा होवून संचार, जीव जंतू जगविणार….४ वायू असे शक्तीचे रूप, पेटवी तो प्राणदिप….५, प्राण आपल्या अंतरी, तोच असे रूप ईश्वरी….६ जसे शिव आणि शक्ती, तसे प्राण व वायू असती…७, बाहेरची वायू शक्ती, अंतरिच्या प्राणास […]
पांडूरंगाचे दर्शन घेण्या, गेला पंढरपूरी । चुकली नाही कधीही, आषाढी कार्तिक वारी ।। आजपरी शरीर दुबळे साथ देईना । मन तजेले दर्शन घेण्या हट्ट सोडीना ।। आधार घेऊनी आज कुणाचा गेला पंढरपूरी । भरून आले डोळे त्याचे बघता शिखर मंदिरी ।। आशा नव्हती थोडी देखील दर्शन मिळण्या तेथे । अंगणीत जमले भक्त गण नाचत सारे होते […]
चिमण्या आल्या दोन कोठूनी, बांधून गेल्या घरटे । खेळूनी नाचूनी, चिव चिव गाणे गात वाटे ।। झाडावरती उंच बसूनी, रात्र घालवी हलके हलके । दाणा टिपणे पाणी पिणे, स्वछंदाचे घेवूनी झोके ।। संसार चक्र भोवती पडता, गेल्या दोघी त्यातच गुंतूनी । नव पिल्लाच्या सेवेसाठी, घरटे केले काड्या आणूनी ।। पिल्लांना त्या पंख फूटता, उडूनी गेल्या घरटे […]
भाळी नसता कुंकंम तुझ्या गे विरचक्र हे हातीं आले मरणोत्तर हा किताब मळतां मन तुझे कां गहिवरले ? शुर विराची अर्धांगिनी तू युद्धभूमिवर त्यास धाडीले ओवाळूनी निरोप देतां मन तुझे कां गहिवरले ? देश सेवेत कामी यावे ब्रिद त्याचे मनी ठसविले सांगत असतां हेच दुजांना मन तुझे कां गहिवरले ? सुर्वणाक्षरीं वाचून गाथा आदर्शमार्गी पडतील पाऊले […]
ध्यानामधिं राहूं दे दोस्ता, नश्वर ही सगळी मत्ता क्षणार्धात जाईल संपुनी, हातीं जें आहे आत्तां चंचल आहे लक्ष्मी, जाते निसटुन ती कळण्यांआधी कशास मग मागसी गड्या तूं वाढवून महागाईभत्ता ? फक्त ती मजला हवी, बाकी मला कांहीं नको अधिर मी, पुसलें तिला, ‘होशील माझी बायको?’ ‘चालेल’ ऐकुन हर्षलो मी, ती असें वदली पुढें – ‘चालेल मज […]
बेत वारंवार – “हृदयाची व्यथा सांगिन तिला“ पण बसे, जातां पुढे दांतखीळ प्रत्येकदा . मीच हेवा करितसे माझ्या मनाचा सर्वदा दूर सखिपासून मी, तिजजवळ तें असतें सदा . तव मुखा असती दिली उपमा चंद्रम्याची सखे तेज जर असतें तया अवसेसही तुजसारखे . असतीच केली तुसवें तुलना तयाची, साजणी पाहिला नसता कधी जर चंद्रम्यावर डाग मी . […]
आला मान्सून, मान्सून आला सज्ज-सज्ज स्वागताला तुंबलेला नालान् नाला. कचरा-डोंगर गटार-सागर अशक्य उल्लंघन हनुमंताही. रामानें शिवधनू भंगलें. पण, त्याआधीं प्रदूषणानें अर्धवट होतें खाल्लें. त्रिशंकू आहे आजचा माणूस. प्रदूषणाला स्वीकारत नाहीं अन् मारतही नाहीं. विश्वामित्राची प्रतिसृष्टी कुठे आहे, शोधूंया चला. पण सावध! तिथेंही प्रदूषण असेल! व्यास रचणार कसें हें महाभारत ? गणपती लिहिणार कसा ? हा प्रदूषण-विजय […]
शीळ वाजवीतो वेळूमध्ये वारा जसा मुलींना बघून कुणी टारगट पोरगा . – रानोमाळ धावतांना वेग अफाट वार्याचा नांव प्रेयसीचें घेतां जसा हृदयाच्या ठोक्यांचा . – नेतो त्याच्यासंगें वारा ढगांना ओढून जशी युवती सुंदर खेची तरुणांचे मन . – खेळतसे लपंडाव सूर्य मेघांबरोबर दिसे, वात्रट कोणी मारी डोळा, पोरीच्या समोर . – क्षितिजावर नभांत जाई भूमी मिसळून […]
मुंबईतील मराठी माणसांची व्यथा व्यक्त करणारी कवी नायगावकरांची ही कविता प्रत्येकास विचार करायला भाग पाडते – ‘टिळक,तुम्ही चौपाटीवर इथे कशासाठी उभे आहात ? अहो, पाणीपुरी भेळपुरी खाणं हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि आम्ही तो रोज मिळवणारच….. तुमचे डोके ठिकाणावर आहे काय टिळक ? तुम्ही डॉलर मिळवा लोक बघा किती आनंदात बिअरच्या ग्लासासारखे फेसाळलेत तुम्ही स्वदेशी […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions