राम नाम ओठी जपता
राम नाम ओठी जपता रामराया हॄदयी वसतो… करावा रामनामाचा धावा तो सदैव श्वासात नांदतो… राम नाम सागर मोक्षानंदी दुःख वेदनांतुनी सावरतो… राम अवतार विश्वात्म्याचा साऱ्या ब्रह्मांडाला रक्षितो.. तो देवगुणी , सदविचारी सकलांच्या मना उजळीतो.. विध्वंसक तो षडरिपूंचा शाश्वती ब्रह्मांडी नांदतो… जीवन रामनामी सन्मार्गी जाणता जीवा मोक्ष लाभतो.. — वि.ग.सातपुते (भावकवी) 9766544908 रचना क्र. २२९ ८/९/२०२२