नवीन लेखन...

“माणूस” म्हणून….!

मी “बाबासाहेबांवर” काही लिहिले.. लाेकांनी मला फोन करून विचारले “तुम्ही बौध्द किंवा दलित आहात का…?” मी आपल्या ” शिवछत्रपतींवर”काही लिहिले.. लाेकांनी मला फोन करून विचारले “तुम्ही मराठा आहात का…?” […]

खरे ग्रह

तुमचे जीवन अवलंबूनी, ग्रहराशीच्या दशेवरती तेच होई जीवनी तुमच्या, जसे ग्रहमंडळ फिरती…१, मित्र मंडळी सगे सोयरे, शत्रू असोत वा प्रेमाचे, जीवनातल्या हालचालीवरी, परिणाम ते होई सर्वांचे…२, हेच सर्व ते ग्रह असूनी, सतत स्थान ते बदलती परिस्थिती बघूनी तुमची, वागण्यात तो फरक करती…३ अपयशाला कारणीभूत तो, असतो कुणीतरी नजीकचा राहू-केतू शनि वा मंगळ, ग्रहमान बनतो त्या घडीचा…४, […]

जीवन मृत्यू खेळ

सर्व दिशांनी घेरूनी येतो, मृत्यू तुमचे जवळीं सही सलामत निसटून जाणें, हीच कला आगळी….१, भक्ष्य त्याचे बनून जाणें, चुकत नाही कुणा, काळाची ती भूक असूनी,  माहीत असते सर्वांना….२, अविरत चालू लपंडाव ,  जगण्या मरण्याचा शेवट हा जरी निश्चीत असला,  हक्क तुम्हां खेळण्याचा….३, खेळती काही तन्मयतेने,  रिझविती इतरजणां, खेळामधले नांव करूनी, आदर्श ठरती जीवनां….४ डॉ. भगवान नागापूरकर […]

चिमणीची निद्रा मोड

चिंगी ‘पहाट झाली, चिव चिवते चिमणी उमज येईना, उठविले तिजला कोणी…..१, आई आहे कां ? जी उठवी शाळेसाठी, गुदगुदल्या करूनी कुरवाळिते हळूंच पाठी….२, घड्याळ उठवी घण घण करूनी नाद घरट्यामधुनी, नाही ऐकला असा निनाद.’..३,   चिमणी – ‘ उषाराणी  येते, साऱ्यांची आई बनूनी प्रेमानें मोडी झोंप, नाजूक करकमलांनी…..४, घड्याळ आमचे, दवबिंदू पडतां पानावरूनी चाळविती निद्रा, टपटप […]

आला ! आला रे पाऊस !

आला  !   आला रे पाऊस ! धरणीला मीलनाची आंस    //धृ// गेली होती तापूनी      रखरखली सारी, अंग जाता वाळूनी     भेगा पडती शरीरी  ।। थकली ती सोसूनी     उकाड्याचे चार मास आला  !   आला रे पाऊस ! धरणीला असे मीलनाची आंस    ।।१।। पाणी गेले आटूनी     नदी नाले कोरडे, पहाटेच्या दवातूनी   झाडे जगती थोडे  ।। गेली हरळी जळूनी   बीजे टाकूनी […]

पेराल तसे उगवते

रुजविता बियाणें अंकूर फुटती असतील दाणे जसे तेच उगवती पेरता आनंद आनंदचि मिळे प्रेमाची बियाणें प्रेम आणी सगळे शिवीगाळ करुनी आदर येई कसा शत्रुत्त्वासंगे नसे मैत्रीचा ठसा घृणा दाखवूनी कसे येई प्रेम क्रोधाच्या मोलाचे शांती नसे दाम पेरावे तसें उगवतें नियम हा निसर्गाचा सुख दुःखाला कारण स्वभाव ज्याचा त्याचा डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com     […]

दृष्टी बदल

नवा चित्रपट बघण्या गेलो, कुटुंबासह चित्र मंदिरी चित्रगृह ते भरले असतां, प्रवेश मिळाला कसातरी….१, चित्रपट तो बघत असतां, आश्चर्य वाटले जल्लोशाचे टाळ्या, शिट्या देवून प्रेक्षक, कौतूक करी नटनट्यांचे….२ वास्तवतेला सोडूनी, रटाळपणे वाहत होते, वैताग येवूनी त्या चित्राचा, सोडून आलो मधेच मी ते….३, घरी येवूनी शांत जाहलो, आठवू लागलो बालपण अशीच होती छायाचित्रे, ज्यांत आमचे रमले मन….४ […]

जीवन ध्येय

प्रभूची लीला न्यारी विश्वाचा तो खेळ करी कुणी न जाणले तयापरी हीच त्याची महिमा ।।१।। जवळ असूनी दूर ठेवितो आलिंगुनी पर भासवितो विचित्र त्याचा खेळ चालतो कोणी न समजे त्यासी ।।२।। मोठे मोठे विद्वान त्यांत कांहीं संतजन अध्यात्म्याचे ज्ञान घेऊन विश्लेषण करिती प्रभूचे ।।३।। कांहीं असती नास्तिक कांही  असती आस्तिक त्यांत कांही ज्ञानी मस्तक चर्चा करिती […]

दु:खी अनूभवी

दु:ख जाणण्या दु:खी व्हावे,  या परि अनूभव दुजा कोणता सत्य समजण्या कामी न येई,  तेथ कुणाची कल्पकता धगधगणारे अंगारे हे,  जाळती जेथे काळीज शब्दांचे फुंकार घालूनी,  येईल कधी का समज मर्मा वरती घाव बसता,  सत्य येते उफाळूनी चेहऱ्यावरले रंग निराळे,  हलके हलके जाती मिटूनी त्या दुःखीताला जाणीव असते,  जीवनामधली निराशा कशी झेप घेवूनी समरस होतो,  इतर […]

मुंगी

मग्न राही सतत आपल्याच कामीं अन्नासाठी तूं फिरे दाही दिशानी जमवितेस कणकण एकत्र करुनी दूर द्दष्टीचा स्वभाव दिला तुज कुणी सुंदर तुझी वास्तूकला वारुळ केले छान सहस्त्रांच्या संखे राहतेस आनंदानं कष्ट करण्याचा गुण दाखवी साऱ्याना कष्टाला पर्याय नसे ह्या जीवना डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com      

1 291 292 293 294 295 437
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..