नवीन लेखन...

भरताचा जाब

ज्याच्यासाठीं व्याकूळ झाली, उभी अयोध्या नगरी, कां धाडिला राम वनीं ?   कैकयीला भरत विचारी   ।।धृ।। आम्ही बंधू चौघेजण, झालो एका पिंडातून, कसा येईल भाव परका ? असतां एकची जीव, चार शरीरीं कैकयीला भरत विचारी   ।।१।। वचनपूर्ती ब्रीद ज्याचे, आदर्श जीवन रघूवंशाचे, कसली शंका मनांत होती ? पारख ना केलीस, त्या हिऱ्याची परी, कैकयीला भरत विचारी   ।।२।। […]

१७ – दीनदयाळू अतिव कृपाळू

दिनदयाळू अतिव कृपाळू हे श्रीगणराया होउन कनवाळू, बालावर ठेव छत्रछाया ।।   आत्मतुष्ट मी, नीतिभ्रष्ट मी, अति मी गर्विष्ठ स्वार्थपूर्ति मोहिनी चेटकिण, करते आकृष्ट यत्न न केले परमार्थाच्या मर्मा जाणाया ।।   कळत-नकळतां पळत राहिलो मृगजळ पाहुन मी हात रिक्त, विषयासक्ती झाली ना परी कमी उशीर झाल्यावर उमगे –  जीवन गेले वाया ।।   पश्चात्तापीं दग्ध […]

१६ – जीवनपथ सुकर करा

जीवनपथ सुकर करा गणदेवा हो सूखशिखरीं दु:खदरीपासुन न्या हो ।।   गडबडतो धडपडतो मी, पडतो मी बडबडतो कुढतो चिडतो रडतो मी अजुन घडा कच्चा, परिपक्व हवा हो ।।   अंध तरी, वा लोचन बंद करी मी मंदबुद्धि आहे, मदमत्त परी मी अक्षय प्रज्वलित करा ज्ञानदिवा हो ।।   नि:पाता माझ्या मनिंची चंचलता निश्चल मन होइ, नाम […]

मनोगत श्रीगणेशाचे !

|| हरी ॐ || वर्षानुवर्षे अग्रपूजेचा माझा मान, त्याचे नाही कधी चुकले भान! या वर्षी येताना मनात शंका नाना, आनंदाने स्वागत होईल ना?   शेतकरी झाले होते अवर्षणाने हैराण, पीक गेले हातचे शेत झाले वैराण! माझ्याकडे विनंती आर्जव त्यांच्या मनात, आगमनाने बरसूदे पाऊस आमच्या शेतात!   वरुणाला आज्ञा माझ्या बरोबर येण्या, नकळत बरसला बेटा वेड्यावीण्या!   […]

गणपती…

नतमस्तक मी जन्मोजन्मी त्याच्या चरणावरी झोपेतही मी गातो आणि स्मरतोही गणपती…गणपती…गणपती… […]

१४ – मुखीं शुभनाम गणेशाचें

करते वाणी गुणवर्णन शिवगौरीतनयाचें सुखात वा दु:खात मुखीं शुभनाम गणेशाचें ।।   चाचपडत ठेचाळत हें जीवन गेलें वाया आतुर झालो व्याकुळलो मी तुजला भेटाया काया-वाचा-मनें सुरूं आवर्तन नामांचें ।।   सिद्धी-प्रसिद्धीआस नको, कटिबद्ध तुला ध्याया सिद्धीविनायका ये मज अध्यात्मबुद्धि द्याया वृद्धिंगत होतील जीवनीं क्षण आनंदाचे  ।।   शोध संपु दे, गणपतिराया, मजपुढती येई अंत:चक्षू उघडुन आत्मज्ञानबोध […]

१२ – गणराया, आनंदाचें धाम

हे गणराया, गौरीतनया, आनंदाचें धाम हे लंबोदर, करुणाकर, माझा स्वीकरी प्रणाम  ।।   संपते न वाट, होई न पहाट ; मज जाणें पैलथडी आलोक तूंच, तम रोख तूंच, मम ज्ञानचक्षु उघडी मिळतात सुखें, मिटती दु:खें, घेतांच तुझें शुभनाम ।।   आदि ना अंत तुज, एकदंत, तूं विश्वाची शक्ती नाशतोस खल, तूं सुजनां देतोस सकल,  मुक्ती स्वानंऽद […]

११ – तूं नियतीचा अधिपती

तूं सुखकारी, तूं विघ्नारी,  तूं नियतीचा अधिपती हे गुणदाता, पार्वतीसुता, आधार तूंच जगतीं  ।।   जे खलबुद्धी, सरळ ना कधी, तूं ताडसि त्यां दुष्टां पिडतात जनां अन् संतमनां, तूं गाडसि त्या कष्टां तूं प्रेमरूप, करुनास्वरूप, तुजमुळेच सुखदीप्ती  ।।   जोडुन हातां, टेकुन माथा, जनगण तुजला नमती फुंकून शंख, गर्जून मंत्र, जग करी तुझी आरती वाजे डंका, […]

१३ – गजाननाचे मोदक (मुक्तक)

गजाननाचे मोदक (मुक्तक)   गंधार करी अंधार गहन जगिं दूर तव अकार, अद्वैताचा साक्षात्कार सांगतो चंद्र हें, तूं अवकाशाधार तव अनुस्वार, ब्रह्मास देइ आकार । ‘गँ’ मंत्र तुझा, तेजसी-शक्ति-भांडार हें ओंकारा, प्राणांत तुझा हुंकार  ।। – ब)       ‘गंधारा’पुढती तुझ्या, ठेंगणें गगन तव ‘निषादा’पुढे नतमस्तक रवि-उडुगण तव ‘षड्ज’ हाच एकमात्र मेरू अविचल हे ‘गणेश’, देसी तूंच सप्तलोकां […]

झोपलेल्या राशि

तारवटल्या डोळ्यांनी, बदलत रहातो कुशी अंथरुण भर लोळत लोळत, झोपते मेष राशि ।। कधी इथे झोप कधी तिथे, सवय त्याची अशी, खुट्ट होता ताडकन् उठते वृषभ राशि ।। जाडजुड गादी हवी पलंगपोस मऊ ऊशी, राजेशाही थाट, पाय – चेपून घेते, मिथुन राशि ।। दंगा गोंगाट असो किती झोप यांना येते कशी, शांत गाढ माळरानीही घोरते निवांत […]

1 292 293 294 295 296 437
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..