नवीन लेखन...

पुण्ण्याचा साठा

खिशांत माझ्या पडली होती, सुटी नाणी काही, वस्तूंची ती खरेदी करण्या, सर्व बाजार पाही ।।१।। सराफ्याच्या दुकानी दिसला, एक हिऱ्याचा हार, डोळे माझे चमकूनी गेले, फिरती गरगर ।।२।। दाम विक्रीचे जाणूनी घेता, हताश मी झालो, हातातील धनाचे मोजमाप, करू मी न शकलो ।।३।। दोन वेळची पूजा करूनी, जप माळ जपती, खूप साचले पुण्य आपले, हे कांहीं […]

श्रावण सरी….!!

|| हरी ॐ || आल्या आल्या श्रावण सरी, अवचित करिती चिंब परी ! उन पावसाच्या खेळ हा, सप्तरंगी पडदया आड हा ! रत्यांवर हिरव्या पानांचा सडा, दिसतो जसा हिरवा सरडा ! सख्या निघाल्या खेळाया ह्या, जमवून बाहुलीचे लग्न त्या ! रानीवनी मुक्त हिंडती ! लग्नासाठी जागा निवडती ! जंगलातील रस्ता निसरडा ! तरी नसे मना मुरडा […]

मी तिथेच तुमची वाट पाहतोय…

त्याने तेव्हाही कंबरेवरचे हात काढले नव्हते, तो आजही कंबरेवरचा हात उगारत नाहीये.. अन् हात जोडणाऱ्यांची गर्दी मात्र दिवसेंदिवस वाढत आहे.. तो तेव्हाही विटेवरून उतरला नव्हता, तो आजही विटेवरून उतरत नाहीये.. अन् पायी चालून वारी गाजवणाऱ्या भाबड्या मनाचा आकांत मात्र दिवसेंदिवस वाढत आहे.. त्याने तेव्हाही गार्‍हाणी ऐकली नव्हती तो आजही गार्‍हाणी ऐकत नाहीये.. अन् माळकरी टोपीवाल्यांची आषाढी […]

जुळे

दोघे मिळून आलां हातात घेऊन हात हाताळूनी परिस्थितीला करण्या त्यावर मात दोघांची मिळूनी शक्ति दुप्पट होत असे सहभागी होतां, युक्ति यशाची खात्री दिसे एकाच तेजाची तुम्ही बाळे बरोबरीने आलां जगती रवि-किरण होऊन जुळे प्रकाशमान बनती ओळखुनी जीवन धोके यशाच्या मार्गांत गाडीची बनूनी चाके सतत रहा वेगांत एकाचे पाठी जाता दुसरा यश अल्पची मिळे एकत्र मिळूनी काम […]

सत्तरीचा ढोल

स्वातंत्त्र्यदिनानिमित्त ढम ढमा ढम ढोल वाजवा ढोल ढम ढमा गा सत्तरीचे बोल ।।   ढम ढमा सत्तरी हेंच अत्तर हिनें मनांवर केला हल्लाबोल ।।   ढम ढमा ढम सत्तेचाळिसला देशाला स्वातंत्र्य मिळे अनमोल ।।   ढम ढमा त्या स्वातंत्र्यासाठी कितिकांनी प्राणांचें दिधलें मोल  ।।   ढम ढमा ढम दशकांनी दो-तीन आणिबाणिची अंधारी झांकोळ  ।।   ढम […]

घोषणा

स्वातंत्र्यदिनानिमित्त स्वतंत्र-भारत सत्तरीचा अन् मीही सत्तरीचा दोघांचें वय एकच .   १   मी म्हातारा झालो पण देशाचें लोकतंत्र अजून बाल्यावस्थेतच आहे. हजारो वर्षांच्या इतिहासात सत्तर वर्षें ती काय !   २   माझ्यासारख्या अनेकांना हा देश पुरून उरेल. माझ्यासारख्या अनेकांना गाडून, ‘पुरून’, हा देश उरेल ?   ३   आम्ही तर देशासाठी कांहीं पुण्यकर्म केलें नाहीं म्हणा […]

फिरते राधा धुंडित मधुवन

( कृष्णजन्माष्टमी व गोपालकाला यानिमित्त) आतुर होउन, शोधित मोहन, फिरते राधा धुंडित मधुवन पडतां कानीं वेणूवादन, भान हरपलें, मोहरलें मन  ।। केशकलापीं पुष्पें गंधित धुंद नाचते वेणी मंडित पदिचें नूपुर कटी मेखला करिंचे कंकण करती गायन ।। चंद्रकोर उजळिते ललाटा नथ ऐटीनें चुंबी ओठां हलतें हलकें, हलतां झळके, कानीं झुलणारे आभूषण   ।। काजळ खुलवी नयन टपोरे […]

ऊठ ऊठ रे शामसुंदरा

(कृष्णजन्माष्टमीनिमित्त) ऊठ ऊठ रे शामसुंदरा, लपली कधिच निशा अरुणकिरणकंचनकुसुमांनी सजली पूर्वदिशा   ।। कधिच प्रहर रात्रीचा सरला नच लवलेश तमाचा उरला दिवाकराची द्याया वर्दी, आली कधिच उषा  ।। कधीपासुनी अवतीभंवती वृक्षलतांवर खग चिंवचिंवती कधीच तेजस स्पर्श जाहला गोवर्धनकळसा ।। कमलदलीं मधुकर गुणगुणती गोठ्यांमधिं घंटा किणकिणती गात अंगणीं सडा शिंपती सस्मित गोपस्नुषा  ।। पय प्राशत गोपबाल सारे दुग्धपान […]

CKP न्ची दुनियाच गोल

ईकडुन नाते , तिकडुन नाते , बर्याच ठीकाणी साटे लोटे| CKP न्ची दुनियाच गोल, नेहेमी असतो नात्यांचा झोल ! ताम्हणे,नागले , सुळे ,बेंद्रे, काही देखणे, काही शेम्बडे | मुली मात्र सुंदर सुडौल , CKP न्ची दुनियाच गोल, नेहेमी असतो नात्यांचा झोल ! कालची भाची, आजची सुन, भाचाच आणला जावई म्हणुन | हलका फुलका घरचा माहौल , […]

मध्य रेल्वे माझं नाव

मध्य रेल्वे माझं नाव वय माझं शंभरवर, काय सांगू बाबांनो आता कशी लागली मला घरघर… इंग्रजांच्या काळात खूप होती माझी बडदास्त फेऱ्याही होत्या कमी अन् माणसंही नव्हती जास्त… रुळावरून धडधडत आले की लोक मला घाबरायचे एक भोंगा वाजवताच दूर दूर पळायचे… पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सगळंच तंत्र बदललं शहरांचा झाला विस्तार माझं महत्त्व वाढलं… मी खूप खुशीत […]

1 294 295 296 297 298 437
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..