तूच सुगंधा
तुझे नित्य येणे जाणे हळूच वळूनी पाहणे नाही कधी विसरलो तुझे ते लाघवी लाजणे आठव ते सारे सुखद निःशब्दी, प्रीतचांदणे तुझे कटाक्ष सांत्वनी निर्मली तुझे गंधाळणे निष्पाप त्या जाणिवा मनास भुलवुनी जाणे तूंच हसरी कमलिका सालस ते तुझे वागणे अजूनही मी स्मरतो रुप तुझे गोजीरवाणे तू स्मरणगंधी सुगंधा तुझे उमलुनी बहरणे — वि.ग.सातपुते (भावकवी) 9766544908 रचना […]