नवीन लेखन...

सद्‌गुरु

  भटकत जातो वाटसरू , जंगलामधील अज्ञात स्थळी, आंस लागते जाण्याकरिता, दूरवरच्या दिव्या जवळी ।।१।।   मार्ग जाण्याचे अज्ञात असूनी, निराशेने वेळ दवडितो, ध्येय दिसत असून देखील, मार्गामुळे अडून पडतो ।।२।।   अज्ञानाच्या अंधारात , शोधत असतो असेच त्याला मार्गदर्शन सद्‌गुरुचे, न लाभता ध्येय मिळे कुणाला ।।३।।   वाट दाखवी सद्‌गुरु , प्रभूचरणी जाण्याचा, दुवा साधतो […]

मोबाईलचा डायबेटीस

संक्रांतीच्या शुभेच्छा इतक्या वारेमाप झाल्या मोबाईलला माझ्या काळ्या मुंग्या लागल्या किती गोड किती गोड दुर दुरून बोलतात माणसं किती अगदी सहजपणे जवळून दूर जातात माणसं लांबचा वाटतो जवळचा जवळचा काय कायमचा कधीतरी येणाराच सण असतो महत्वाचा शुभेच्छा हव्यात कृतीत नको नुसत्या उक्तीत एकमेकांच्या असावं प्रेमळपणानं संगतीत मेसेज डिलीट करण्यातच अख्खी संक्रांत गेली मोबाईलची शु्गर लेवल मात्र […]

भावशक्तीची देणगी

भावशक्तीची देत देणगी, उपकार तुझे झाले करण्यास तव जवळीक,  कामास तेच आले   जिंकून घेई राधा तुजला,  उत्कठ करुनी प्रेम उचंबळून त्या भावना, साधियले तेच कर्म   भक्तीभावाची करिता बात, ती तर असे आगळी पावन करण्या धाऊन जाती,  सर्व संत मंडळी   भजनांत मिरा रंगली,  ध्यास तुझा घेऊन नाचत गांत राहिली,  केले तुझ पावन   दया […]

काव्यातील गुरु

एकलव्यापरीं शिकलो विद्या,  गुरुद्रोणा विणा  । काव्यामधल्या जाणून घेतल्या,  साऱ्या खाणाखुणा  ।।   शोधू लागलो प्रथम गुरुला,  पद्य रचनेसाठीं  । कुणी न शिकवी कला श्रेष्ठ ही,  राहून माझे पाठी  ।।   उठत होती भाव तरंगे,   अन आकाशी भिडती  । शब्दांनी परि पकड न येता,  निष्टूनी ती जाती  ।।   मार्गदर्शक तो भेटत नाही,  खंत लागे मना […]

श्रीरामाची शिवपूजा

  हरि हराचे पुजन करतो  । दृष्य दिसे बहुत आगळे  ।। प्रभूकडूनी प्रभूची सेवा  । सर्वजणां ही किमया न कळे  ।।   शिवलिंगापुढती ध्यान लावी  । डोळे मिटूनी प्रभू श्रीराम  ।। सुंदर सुबक चित्रामध्ये  । व्यक्त होई ह्रदयातील प्रेम  ।।   श्रीराम प्रभूच्या पूजेवेळीं  । आत्मरुप उजळून आले  ।। शिवलिंगातील रामस्वरुप  । एक होऊनी मग गेले  […]

ईश्वराची बँक

प्रभूंनी बँक काढली    उघडा खाते ठेवा पूंजी आपली    आणा सुख जीवनाते  ।।१।। जेवढे गुंतवाल    मिळेल व्याजा सहित दरा विषयीं     तो आहे अगणित  ।।२।। ही बँकच न्यारी    तुम्हां न दिसेल कोठे धुंडाळूं नका संसारी    होईल दुःख मोठे  ।।३।। पाप पुण्याची ठेव    जमा करिते बँक जसा असेल भाव     तशी देईल सुख दुःख  ।।४।। गरज पडतां धन मिळणे   हे […]

उतरला ईश्वर धरेवरी

उतरला ईश्वर धरेवरी सगुणरूप धारलें परब्रह्मानें पंढरपुरीं  ।।   वैकुंठींचा प्रभु नारायण करतो जो विश्वाचें पालन, कलियुगात म्हणती विठ्ठल, तो हरी असे द्वापरीं  ।।   क्षीरसागरा मागे ठेवुन शेषनाग-मंचकास त्यागुन नसे गरुडही, उभा एकला तिष्ठत विटेवरी  ।।   क्षेत्र पंढरी जरि इवलेसें, हरिस्पर्शें झगमगलें ऐसे – जैसी स्वर्गामधें शोभते नगरी अलकापुरी  ।।   कृतार्थता ही आम्हां […]

आला पाऊस…..

  पावसाची वाट बघता बघता सरी लागल्या कोसळू राने झाली हिरवीगार नद्या लागल्या ओसंडू !   वाऱ्याची थंड झुळूक करी मना आनंद सगळा आळस क्षणात जाई कुठे पळून !   मोरांचे थुईथुई नाचणे सांगत होते आले मेघ दाटून बरसला मनसोक्त हातचे काही न राखून !   घरांच्या छपरावरून वाहणारे पाणी पडत होते पाघोळ्यांनी अंगणात प्रत्येक थेंबाचे […]

दर्पण

चित्र दिसते दर्पणी , जसे असेल तसे, धूळ साचता त्यावरी, अस्पष्ट ते होतसे ।।१।।   दर्पणा परि निर्मळ मन, बागडते सदैव आनंदी, दूषितपणा येई त्याला, भावविचारांनी कधी कधी ।।२।।   निर्मळ ठेवा मन आपले, झटकून द्या लोभ अहंकार, मनाच्या  त्या पवित्रपणाने, जीवन होत असे साकार ।।३।। डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com    

विधी कर्माना सोडा

रूद्राक्षाच्या माळा घालूनी,  भस्म लावीले सर्वांगाला वेषभूषा ती साधू जनाची,  शोभूनी दिसली शरिराला खर्ची घातला बहूत वेळ,  रूप सजविण्या साधूचे एक चित्त तो झाला होता,  देहा भोंवती लक्ष तयाचे शरिरांनी जरी निर्मळ होता,  चंचल वाटले मन त्याचे प्रभू मार्गास महत्त्व देतां,  विसरे तोच चरण प्रभूचे विधी कर्मात वेळ दवडता,  प्रभू सेवेसी राहील काय ? देहाच्या हालचाली […]

1 298 299 300 301 302 437
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..