उतरला ईश्वर धरेवरी
उतरला ईश्वर धरेवरी सगुणरूप धारलें परब्रह्मानें पंढरपुरीं ।। वैकुंठींचा प्रभु नारायण करतो जो विश्वाचें पालन, कलियुगात म्हणती विठ्ठल, तो हरी असे द्वापरीं ।। क्षीरसागरा मागे ठेवुन शेषनाग-मंचकास त्यागुन नसे गरुडही, उभा एकला तिष्ठत विटेवरी ।। क्षेत्र पंढरी जरि इवलेसें, हरिस्पर्शें झगमगलें ऐसे – जैसी स्वर्गामधें शोभते नगरी अलकापुरी ।। कृतार्थता ही आम्हां […]