नवीन लेखन...

मला विठ्ठलाचा विरह सोसवेना

अजूनी दिसेना पंढरीचा राणा मला विठ्ठलाचा विरह सोसवेना  ।।   बुवा-साधु-स्वामी यांचे पाय वंदिले मी पुराजी नि पंडित यांचे पंथ धुंडले मी परी विठ्ठलाच्या दारीं कुणी पोंचवेना  ।।   पांडुरंगभेटीपुढती  खुजे सप्तस्वर्ग दुबल मी, दुर्गम दुष्कर नरजीवनमार्ग पदोपदीं सहा रिपूंची रोखतसे सेना ।।   अंधच मी, पाहिन कैसे सुंदर तें ध्यान ? मूढ पुरा , गूढ […]

माझी शाळा

WhatsApp वरुन आलेली कविता  आयते शर्ट ते बी ढगळ, चड्डीला आमच्या मागून ठिगळ!! त्यावर करतो तांब्यानी प्रेस, तयार आमचा शाळेचा ड्रेस!! खताची पिशवी स्कूल बॅग, ओढ्याचं पाणी वाॅटर बॅग!! धोतराचं फडकं आमचं टिफीन, खिशात ठेवुन करतो इन!! करदोडा आमचा असे बेल्ट, लाकडाची चावी होईल का फेल ? मिरचीचा ठेचा लोणच्याचा खार, हाच आमचा पोषण आहार!! रानातला रानमेवा भारी मौज, […]

साद आईची

WhatsApp वरुन आलेली कविता  महिनेमागून महिने, शेवटी वर्ष सरुन जाते वृध्दाश्रमाच्या पायरीवर , वाट तुझी पाहाते भिजून जातो पदर , अन मन रिते राहाते कधी मधी मात्र , तुझी मनीऑर्डर येते पैसे नकोत यावेळी , तूच येऊन जा बाळा मला तुझ्या , घरी घेऊन जा तुझा बा होता तोवर , काळ बरा गेला तुझी आठवण काढत , उघड्या डोळ्यांनी […]

आम्ही मिडलक्लासवाले

दिवस बदलले तरी ‘Middle Class’ जात नाही आणि त्याचं आम्हाला काहीही वाटत नाही. दुधाची साय, तुपाची खरवड तिळाची वडी, पुरणाची पोळी, आईच्या जेवणाची सर पिझ्झाला येत नाही. हॉटेलात गेले तरी मेनूवर ‘दर’ दिसत राही रिक्षा केली तरी मीटरवरून नजर हटत नाही. जीन्स घातली तरी साडीची हौस सुटत नाही. घरातून निघताना आजही पाया पडायला विसरत नाही. शो […]

साक्षीदार

‘घटना’ जेव्हां घडली अघटित  । कुणीही नव्हते शेजारी  ।। कां उगाच रुख रुख वाटते  । दडपण येवूनी उरीं  ।।   जाणून बुजून दुर्लक्ष केले  । नैतिकतेच्या कल्पनेला  ।। एकटाच आहे समजूनी  । स्वार्थी भाव मनी आला  ।।   नीच कृत्य जे घडले हातून  । कुणीतरी बघत होता  ।। सर्वत्र दिशेनें तो व्यापूनी आहे  । हेच सारे […]

आले पावसोजींच्या मना !

  आले लहरी पावसोजींच्या मना सुट्टीत जावे मामाच्या गावा,   फोनवरून झालं बोलणं दिवस ठरला एकदाचा, गाड्या सगळ्या फुल झाल्या पेच पडला तिकिटाचा !   पाऊसोजी म्हणाले आईला काळजी नसावी, आपले आहेना ‘मेघ’ विमान, आई म्हणाली पावसोजीला प्रवास खूप दूरचा, सांभाळून चालव वाहान !   ठेव जवळ जलाचा साठा वाटेत लागली तहान जर जलाचा आहे तुटवडा […]

चाळीशी

आयुष्य पुढे धावत असते, वय सारखे वाढत असते, पण…… खरी मजा जगण्याची, चाळीशीनंतर सुरू होते ,,,,, उच्छृंखल आणि समंजसपणा, यामधली मर्यादा कळते, अल्लडपणावर हलकीशी, प्रगल्भतेची झालर चढते, खरी मजा जगण्याची, चाळीशीनंतर सुरू होते,,,,, जगण्याची परिभाषा, थोडी थोडी बदलू लागते, काय हवे अन् काय नको, हे नेमकेपणे कळू लागते, खरी मजा जगण्याची, चाळीशीनंतर सुरू होते,,,,,, मन जोडीदाराचं, […]

चेतना

ओठावरले गीत माझे,  आज कसे हे रुकून गेले गीतामधले शब्द रूकता,  ओठ कसे हे सुकून गेले….।। धृ ।।   आकाशातील थवे पाहूनी, चंचल माझी नजर झाली भिर भिरणाऱ्या दृष्टी पटावर असंख्य चित्रे उमटूनी गेली चित्र बघूनी नाचे मन जे पाषाणा परी स्थिर कां झाले….१ ओठावरले गीत माझे आज कसे हे रुकून गेले गीतामधले शब्द रूकता ओठ […]

सासरी जाताना

हास्यमुखाने निरोप दे ग, प्रेमाने भरला विसरावी मी ओढ येथली,  जाता सासरला…. ।। धृ ।।   खूप दिले तू प्रेम आजवरी, सदैव ठेवीत पदर शिरी, पंखांना परि शक्ती देवूनी,  सांग मला ग घेण्या भरारी सैल कर तू पाश आपला…१, हास्य मुखाने निरोप दे ग प्रेमाने भरला,   संसारातील धडे देवूनी,  केलीस तयार कष्ट घेवूनी कुठे लोपला आज विश्वास तो, […]

ध्यान

ध्यान कसे लावावे,  मार्ग असे मनोहर सुलभ ते समजावे, त्याचे मिळण्या द्वार…..१ स्वच्छ एक आसन,  शांत जागी असावे मांडी त्यावर घालून,  स्थिर ते बसावे…२ लक्ष्य केंद्रीत करा,  तुमच्या श्वासावरी कसा फिरे वारा,  आत आणि बाहेरी…३ साक्षी तुम्ही बना, श्वासाच्या हालचालीत शांत करिल मना, बघून प्राण ज्योत…४ काहीही न करावे, यालाच म्हणती ध्यान करण्यास तुम्ही जावे,  जाईल […]

1 300 301 302 303 304 437
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..