कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
आले पावसोजींच्या मना !
आले लहरी पावसोजींच्या मना सुट्टीत जावे मामाच्या गावा, फोनवरून झालं बोलणं दिवस ठरला एकदाचा, गाड्या सगळ्या फुल झाल्या पेच पडला तिकिटाचा ! पाऊसोजी म्हणाले आईला काळजी नसावी, आपले आहेना ‘मेघ’ विमान, आई म्हणाली पावसोजीला प्रवास खूप दूरचा, सांभाळून चालव वाहान ! ठेव जवळ जलाचा साठा वाटेत लागली तहान जर जलाचा आहे तुटवडा […]
चाळीशी
आयुष्य पुढे धावत असते, वय सारखे वाढत असते, पण…… खरी मजा जगण्याची, चाळीशीनंतर सुरू होते ,,,,, उच्छृंखल आणि समंजसपणा, यामधली मर्यादा कळते, अल्लडपणावर हलकीशी, प्रगल्भतेची झालर चढते, खरी मजा जगण्याची, चाळीशीनंतर सुरू होते,,,,, जगण्याची परिभाषा, थोडी थोडी बदलू लागते, काय हवे अन् काय नको, हे नेमकेपणे कळू लागते, खरी मजा जगण्याची, चाळीशीनंतर सुरू होते,,,,,, मन जोडीदाराचं, […]
चेतना
ओठावरले गीत माझे, आज कसे हे रुकून गेले गीतामधले शब्द रूकता, ओठ कसे हे सुकून गेले….।। धृ ।। आकाशातील थवे पाहूनी, चंचल माझी नजर झाली भिर भिरणाऱ्या दृष्टी पटावर असंख्य चित्रे उमटूनी गेली चित्र बघूनी नाचे मन जे पाषाणा परी स्थिर कां झाले….१ ओठावरले गीत माझे आज कसे हे रुकून गेले गीतामधले शब्द रूकता ओठ […]
सासरी जाताना
हास्यमुखाने निरोप दे ग, प्रेमाने भरला विसरावी मी ओढ येथली, जाता सासरला…. ।। धृ ।। खूप दिले तू प्रेम आजवरी, सदैव ठेवीत पदर शिरी, पंखांना परि शक्ती देवूनी, सांग मला ग घेण्या भरारी सैल कर तू पाश आपला…१, हास्य मुखाने निरोप दे ग प्रेमाने भरला, संसारातील धडे देवूनी, केलीस तयार कष्ट घेवूनी कुठे लोपला आज विश्वास तो, […]
ध्यान
ध्यान कसे लावावे, मार्ग असे मनोहर सुलभ ते समजावे, त्याचे मिळण्या द्वार…..१ स्वच्छ एक आसन, शांत जागी असावे मांडी त्यावर घालून, स्थिर ते बसावे…२ लक्ष्य केंद्रीत करा, तुमच्या श्वासावरी कसा फिरे वारा, आत आणि बाहेरी…३ साक्षी तुम्ही बना, श्वासाच्या हालचालीत शांत करिल मना, बघून प्राण ज्योत…४ काहीही न करावे, यालाच म्हणती ध्यान करण्यास तुम्ही जावे, जाईल […]
पाऊस आलाय…..भिजून घ्या
पाऊस आलाय…..भिजून घ्या थोडा मातीचा गंध घ्या थोडा मोराचा छंद घ्या उरात भरून आनंद घ्या….. आलाय पाऊस…..भिजून घ्या बघा समुद्र उसळतोय वारा ढगांना घुसळतोय तुम्हीही त्यांच्यात मिसळून घ्या….. आलाय पाऊस…..भिजून घ्या ऑफ़ीस रोजच गाठत असतं काम नेहमीच साठत असतं मनातून भिजावंसं वाटत असतं मनाची हौस पुरवून घ्या….. आलाय पाऊस…..भिजून घ्या सर्दी पडसे रोजचेच….. त्याला औषध तेच […]
वेळेची ढिलाइ कामाची किमया
हपालेल्या निष्ठूर काळा, समाधानी तू कसा होशील बळी घेण्याचे सत्र तुझे ते, केंव्हां बरे तू थांबवशील ?…१, नित्य तुला तें भक्ष्य लागते, वेध घेई तू टिपूनी त्याचा मिस्कीलतेने हासत जातो, गर्व होई तो स्वकृत्याचा….२, अवचित कशी ही भूक वाढली, मात करूनी त्या वेळेवरी सुडानें तूं पेटूनी जावूनी, बळी घेतले गरीबांचे परी….३, काळ येई परि वेळ न […]
आत्मविश्वास
आत्मविश्वास जागृत ठेवूनी, कार्य घेवूनी तडीस नेती । कधीही न राही अवलंबूनी, मदतीसाठी दूजा वरती ।। ईश्वर करीतो मदत तयांना, मदत करी जे आपले आपण । आपल्यातची तो ईश्वर आहे, असते याची जयास जाण ।। विश्वासाने हुरूप येई, जागृत करीती अंतर चेतना । लक्ष्य सारे केंद्रीत होता, यश चमकते प्रयत्नांना ।। डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com
परमार्थ व संसार आहेत एकच
उपास तापास करुनी,शिणवित होतो देहाला भजन पूजन करुनी,पूजीत होतो देवाला कथा किर्तनें ऐकूनी,पुराण मी जाणिले माळ जप जपूनी,प्रभू नामस्मरण केले वेचूनी सुमनें सुंदर,वाही प्रभूचे चरणीं फुलांचे गुंफूनी हार,अर्पण केले कंठमणीं जाऊनी तीर्थ यात्रेत,दर्शन घेतले तीर्थांचे प्रसिद्ध देवालयांत,चरण स्पर्षिले मूर्तीचे मनामध्यें ठेऊन शांती,मूल्यमापन केले जीवनाचे कांहीं न मिळाले हातीं,व्यर्थ दवडिले क्षण वेळेचे संसारातील प्रेम व राग,ह्यातच मन […]