नवीन लेखन...

पाऊस आलाय…..भिजून घ्या

पाऊस आलाय…..भिजून घ्या थोडा मातीचा गंध घ्या थोडा मोराचा छंद घ्या उरात भरून आनंद घ्या….. आलाय पाऊस…..भिजून घ्या बघा समुद्र उसळतोय वारा ढगांना घुसळतोय तुम्हीही त्यांच्यात मिसळून घ्या….. आलाय पाऊस…..भिजून घ्या ऑफ़ीस रोजच गाठत असतं काम नेहमीच साठत असतं मनातून भिजावंसं वाटत असतं मनाची हौस पुरवून घ्या….. आलाय पाऊस…..भिजून घ्या सर्दी पडसे रोजचेच….. त्याला औषध तेच […]

वेळेची ढिलाइ कामाची किमया

हपालेल्या निष्ठूर काळा,  समाधानी तू कसा होशील बळी घेण्याचे सत्र तुझे ते,  केंव्हां बरे तू थांबवशील ?…१, नित्य तुला तें भक्ष्य लागते,  वेध घेई तू टिपूनी त्याचा मिस्कीलतेने हासत जातो, गर्व होई तो स्वकृत्याचा….२, अवचित कशी ही भूक वाढली,  मात करूनी त्या वेळेवरी सुडानें तूं पेटूनी जावूनी,  बळी घेतले गरीबांचे परी….३, काळ येई परि वेळ न […]

आत्मविश्वास

आत्मविश्वास जागृत ठेवूनी, कार्य घेवूनी तडीस नेती  । कधीही न राही अवलंबूनी, मदतीसाठी दूजा वरती  ।। ईश्वर करीतो मदत तयांना, मदत करी जे आपले आपण  । आपल्यातची तो ईश्वर आहे, असते याची जयास जाण  ।। विश्वासाने हुरूप येई, जागृत करीती अंतर चेतना  । लक्ष्य सारे केंद्रीत होता, यश चमकते प्रयत्नांना  ।। डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

परमार्थ व संसार आहेत एकच

उपास तापास करुनी,शिणवित होतो देहाला भजन पूजन करुनी,पूजीत होतो देवाला कथा किर्तनें ऐकूनी,पुराण मी जाणिले माळ जप जपूनी,प्रभू नामस्मरण केले वेचूनी सुमनें सुंदर,वाही प्रभूचे चरणीं फुलांचे गुंफूनी हार,अर्पण केले कंठमणीं जाऊनी तीर्थ यात्रेत,दर्शन घेतले तीर्थांचे प्रसिद्ध देवालयांत,चरण स्पर्षिले मूर्तीचे मनामध्यें ठेऊन शांती,मूल्यमापन केले जीवनाचे कांहीं न मिळाले हातीं,व्यर्थ दवडिले क्षण वेळेचे संसारातील प्रेम व राग,ह्यातच मन […]

सुप्त चेतना

दिव्याची ज्योत पेटली, वात दिसे जळताना जळेना परि वात ती, दिव्यांत तेल असताना, जळत असते तेल, देऊनी प्रकाश सारा आत्मबलीदानाचा दिसे, शोभून तेथे पसारा बागडे मूल आनंदी, तिळा तिळाने वाढते आई-बापाच्या मायेनी, झाड कसे बहरते कष्ट त्याग हे जळती, सुगंध आणिती जीवनी गर्भामधली ही चेतना, जाणतील का कुणी ? डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

इतरांतील लाचारी बघे

शक्तीच्या जोरावरती,  बघतो इतरांत लाचारी विसरून जातो वेड्या,  स्वत:तील न्यूनता खरी ….।।धृ।। पैसे ओढती खोऱ्यानें,  परि शरीर भरले रोगानें श्रीमंतीत वाढली कांहीं,  गरिबाची लाचारी पाही विसरून देह दुर्बलता,  धनाचा अहंकार धरी…१ शक्तीच्या जोरवरती बघतो इतरांत लाचारी शरीर संपदा मिळे,  परि अडते पैशामुळे देहाचा ताठा फार, इतरां तुच्छ लेखणार विवंचना ती पैशाची,  विसरे शरिर सौख्यापरि….२ शक्तीच्या जोरावरती […]

जातीमधील उद्रेक

लाट उसळतां ती क्रोधाची,  बळी घेतले कित्येकाचे हिंसाचाराच्या लाटेमध्यें,  सर्वस्व गमविले कांहींचे…१, फार पूरातन काळीं आम्हीं,  चालत होतो एक दिशेनें कुणीतरी फोडून वाटा तेव्हां, विखरूनी टाकिली कांहीं मने…२, त्याच क्षणाला बिज रूजले,  धर्मामधल्या विषमतेचे ईश्वराकडे त्या जाण्याकरितां,  मार्ग पडती विविधतेचे….३, विविधतेनें संघर्ष आणिला,  भेदभावाची भिंत उभारूनी विवेकाला गाडून टाकले,  उफाळणाऱ्या भावनांनी, चूक कुणाची सजा कुणाला,  कालचक्राची […]

निरोगी देही नामस्मरण

निरोगी असतां तुम्ही, नामस्मरण करा प्रभूचे, ठेवू नका उद्या करीता, महत्व जाणा वेळेचे ।।१।। शरिराच्या नसता व्याधी, राहू शकता आनंदी, आनंदातच होऊ शकते, चित्त एकाग्र ते ।।२।। व्याधीने जरजर होता , चित्त होई अस्थीर, स्थिरतेतत दडला ईश्वर, जाणता येतो होऊनी स्थीर ।।३।। डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

राजमाता कैकयी

अकारण कां नांवे ठेवता सदैव कैकयीला  । चित्त देवूनी समजूनी घ्या तुम्ही राजमातेला   ।।धृ।। जेव्हां दशरथ युद्धास जाई  । कैकयी त्याच्या सेवेत राही  ।। राजनीति अन् युद्धनीति ही  । अवगत झाली सारी तिजला   ।।१।। चित्त देवूनी समजूनी घ्या तुम्हीं राजमातेला नजीकच्या त्या देशामधूनी  । रावणादी असुरी शक्ती वाढूनी  ।। सामान्य जनाला जर्जर करुनी  । हा हाः […]

1 301 302 303 304 305 437
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..