नवीन लेखन...

हट्टी अनु

एक होती अनु फुलासारखी जणू डोळे फिरवी गर्र गर्र पाऊल टाकी भरभर तिला लागली भूक गडू दिला एक बघितला रिकामा गडू तिला आले रडूं आईने दुध भरले कांठोकांठ ओतले तिला हवय जास्त दूध आहे मस्त रडरड रडली आदळ आपट केली सांडूनी गेला गडू पाठींत बसला मात्र धम्मक लाडू डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

विनम्रता

लीन दिन ती होवून पुढती, झुकली होती त्यावेळी  । हात पुढे आणि नजर खालती, ज्यांत दिसे करूणा सगळी  ।। लाचार बनूनी पोटासाठी, हिंडे वणवण उन्हांत सारी  । वादळ वारा आणिक पाऊस, संगत घेवून फिरे बिचारी  ।। मदतीचा हात दिसे, जागृत होता भूतदया   । जनसामान्यात असती मानवतेतील ही माया  ।। डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

देह मंदीर

शरीर एक साधन,  साध्य करण्या प्रभूला ठेवूनी ती आठवण,  चांगले ठेवा देहाला…१ व्यायाम व आहार,  असतां नियमित सुदृढ ते शरीर,  असते मग बनत…२ सुदृढ असता देह, करावे मनाला शांत टाळत असतां मोह, न येई तो भावनेत…३ षडरिपू हे विकार,  काढा विवेकांनी निर्मळ ठेवा शरीर,  पवित्रता राखूनी…४ देह आहे मंदीर,  गाभारा तो मन आत्मा तो ईश्वर,  आनंद […]

जीवन मार्गातील अडसर

जीवनातील वाटे वरती,  कडेकडेने उभे ठाकले परि वाटसरूंना सारे ते,  यशातील अडसर वाटले…१, वाट चालतां क्रमाक्रमानें,  बाधा आणून वेग रोकती ध्येयावरल्या उच्च स्थळीं,  पोहचण्या आडकाठी करिती…२, षडरिपूचे टप्पे असूनी,  भावनेवर आघांत होतो सरळ मार्गाच्या विचाराला, आकर्षणाचा खेंच बसतो…३, पवित्र निर्मळ भावनेमध्ये,  रंगाच्या त्या छटा उमटती गढूळपणाच्या वातावरणीं,  सारे कांहीं गमवूनी बसती….४, थोडे राहता गाफील तुम्ही,  जाळ्यामध्ये […]

ईश अस्तित्वाची ओढ

उंच उंच जावूनी झाडे चुंबीत होती गगनाला  । चंद्र चांदणे, भव्य पर्वत आणिक नदी नाला  ।। किती आनंद तो मनी जहाला बघूनी निसर्ग शोभा  । गुंग होऊनी नाचू लागलो सुटला चित्त ताबा  ।। सुंदर वाटे रूप आपले बिंब बघता दर्पणी  । पोंच मिळते समाधानाची केवळ अंतर्मनातूनी  ।। पूजा करीता तल्लीन होई मूर्ती बघूनी देवाची  । शक्तीमान […]

निसर्गाची आनंदासाठी मदत

कसे मानूं उपकार निसर्गा तूझे मी उघडोनी जीवन द्वार आलास तूं कामी तुझ्या मोरानें दाखविले नृत्य राघूच्या वाणीनें शिकविले सत्य कोकीळेचे गान सप्तसुरांच्या लहरी चित्रकलेचे ज्ञान इंद्रधनुष्या परि मुंग्याची वारुळे दाखवी वास्तूकला कोळ्याची जाळे शिकवी हस्तकला घारीची भरारी स्वछंद केले मनां मैनेच्या उदरीं  जाणला प्रेमळपणा विजेची चपळता चंचल बनवी धबधब्याची प्रचंडता श्रेष्ठत्व जाणवी निसर्गातील विवीधता देई […]

दैवी देणगी

लुळा पांगळा बसूनी एकटा, गाई सुंदर गाणे  । आवाजातील मधूरता, शिकवी त्याला जगणे  ।। जगतो देह कशासाठी, हातपाय असता पांगळे  । मरण नसता आपले हाती, जगणे हे आले  ।। लुळा असला देह जरी, मन सुदृढ होतेस  । जगण्यासाठी सदैव त्याला, उभारी देत होते  ।। गीत ऐकता जमे भोवती, रसिक जन सारे  । नभास भिडता सुरताना, शब्द […]

नाम घेण्याची वृत्ती दे

सतत नाम घेण्यासाठीं, बुद्धी दे रे मजला आठवण तुझी ठेवण्याची, वृत्ती दे रे मनाला ……।।धृ।। श्वासात प्राण म्हणूनी, अस्तित्व तुझेच जाणी श्वास घेण्याची शक्ती, तुझ्याचमुळे असती जीवनातील चैतन्य, तुजमुळेच मिळते सर्वांना…..१ सतत नाम घेण्यासाठी बुद्धी दे रे मजला अन्नामधले जीवन सत्व, तूच ते महान तत्व सुंदर अशी सृष्टी, बघण्या ते दिली दृष्टी आस्वाद घेण्या जगताचा, जागृत […]

देह बंधन – मुक्ती

बंधन मुक्तीसाठीं असतां,बंधनात ते पाडून टाकी कर्मफळाचे एक अंग ते,टिपतां राही दुसरे बाकी…१, साध्य करण्या जीवन ध्येय,देह लागतो साधन म्हणूनी सद्उपयोग करूनी घेतां,साध्य होईल हे घ्या जाणूनी…२, हिशोब तुमचा चुकून जाता,तोच देह बनतो मारक विनाश करितो मागें लागतां,मिळविण्यास ते ऐहिक सुख….३, बंधन पडते आत्म्याभोंवती,शरिरांतल्या वासने पायी वासनेच्या आहारी जातां,बंधनास ती बळकटी येई…..४, तपसाधनेचे कष्ट करूनी,देह करितो […]

तुझे तुलाच अर्पण !

तुझेच घेऊनी तुलाच द्यावे,भासते ही रीत आगळी उमजत नाही काय करावे,तुझीच असतां सृष्टी सगळी वाहणाऱ्या संथ नदीतील,पाणी घेऊन अर्घ्य देतो सुंदर फुले निसर्गातील,गोळा करुन चरणी अर्पितो अन्न ग्रहण करण्यापूर्वी,नैवेद्य तुजला दाखवितो जगण्याचा तो मार्ग दोखवी,ह्याचीच पोंच आम्ही देतो विचार ठेवूनी पदोपदीं,साऱ्यांचा तूं असशी मालक दुजास देण्यातील आनंद,हाच मिळवित असे एक डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

1 302 303 304 305 306 437
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..