नवीन लेखन...

ईश अस्तित्वाची ओढ

उंच उंच जावूनी झाडे चुंबीत होती गगनाला  । चंद्र चांदणे, भव्य पर्वत आणिक नदी नाला  ।। किती आनंद तो मनी जहाला बघूनी निसर्ग शोभा  । गुंग होऊनी नाचू लागलो सुटला चित्त ताबा  ।। सुंदर वाटे रूप आपले बिंब बघता दर्पणी  । पोंच मिळते समाधानाची केवळ अंतर्मनातूनी  ।। पूजा करीता तल्लीन होई मूर्ती बघूनी देवाची  । शक्तीमान […]

निसर्गाची आनंदासाठी मदत

कसे मानूं उपकार निसर्गा तूझे मी उघडोनी जीवन द्वार आलास तूं कामी तुझ्या मोरानें दाखविले नृत्य राघूच्या वाणीनें शिकविले सत्य कोकीळेचे गान सप्तसुरांच्या लहरी चित्रकलेचे ज्ञान इंद्रधनुष्या परि मुंग्याची वारुळे दाखवी वास्तूकला कोळ्याची जाळे शिकवी हस्तकला घारीची भरारी स्वछंद केले मनां मैनेच्या उदरीं  जाणला प्रेमळपणा विजेची चपळता चंचल बनवी धबधब्याची प्रचंडता श्रेष्ठत्व जाणवी निसर्गातील विवीधता देई […]

दैवी देणगी

लुळा पांगळा बसूनी एकटा, गाई सुंदर गाणे  । आवाजातील मधूरता, शिकवी त्याला जगणे  ।। जगतो देह कशासाठी, हातपाय असता पांगळे  । मरण नसता आपले हाती, जगणे हे आले  ।। लुळा असला देह जरी, मन सुदृढ होतेस  । जगण्यासाठी सदैव त्याला, उभारी देत होते  ।। गीत ऐकता जमे भोवती, रसिक जन सारे  । नभास भिडता सुरताना, शब्द […]

नाम घेण्याची वृत्ती दे

सतत नाम घेण्यासाठीं, बुद्धी दे रे मजला आठवण तुझी ठेवण्याची, वृत्ती दे रे मनाला ……।।धृ।। श्वासात प्राण म्हणूनी, अस्तित्व तुझेच जाणी श्वास घेण्याची शक्ती, तुझ्याचमुळे असती जीवनातील चैतन्य, तुजमुळेच मिळते सर्वांना…..१ सतत नाम घेण्यासाठी बुद्धी दे रे मजला अन्नामधले जीवन सत्व, तूच ते महान तत्व सुंदर अशी सृष्टी, बघण्या ते दिली दृष्टी आस्वाद घेण्या जगताचा, जागृत […]

देह बंधन – मुक्ती

बंधन मुक्तीसाठीं असतां,बंधनात ते पाडून टाकी कर्मफळाचे एक अंग ते,टिपतां राही दुसरे बाकी…१, साध्य करण्या जीवन ध्येय,देह लागतो साधन म्हणूनी सद्उपयोग करूनी घेतां,साध्य होईल हे घ्या जाणूनी…२, हिशोब तुमचा चुकून जाता,तोच देह बनतो मारक विनाश करितो मागें लागतां,मिळविण्यास ते ऐहिक सुख….३, बंधन पडते आत्म्याभोंवती,शरिरांतल्या वासने पायी वासनेच्या आहारी जातां,बंधनास ती बळकटी येई…..४, तपसाधनेचे कष्ट करूनी,देह करितो […]

तुझे तुलाच अर्पण !

तुझेच घेऊनी तुलाच द्यावे,भासते ही रीत आगळी उमजत नाही काय करावे,तुझीच असतां सृष्टी सगळी वाहणाऱ्या संथ नदीतील,पाणी घेऊन अर्घ्य देतो सुंदर फुले निसर्गातील,गोळा करुन चरणी अर्पितो अन्न ग्रहण करण्यापूर्वी,नैवेद्य तुजला दाखवितो जगण्याचा तो मार्ग दोखवी,ह्याचीच पोंच आम्ही देतो विचार ठेवूनी पदोपदीं,साऱ्यांचा तूं असशी मालक दुजास देण्यातील आनंद,हाच मिळवित असे एक डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

विरोघांत मुक्ति

भक्ति करुन प्रभूसी मिळवी, दिसले आम्हा ह्या जगती । परि त्याचाच विरोध करुनी, कांही पावन होऊन जाती ।।१।। लंकाधिपती रावण याने, रोष घेतला श्रीरामाचा । जानकीस पळवून नेई, विरोध करण्यास प्रभुचा ।।२।। झाली इसतां आकाशवाणी, कंसास सांगून मृत्यु त्याचा । तुटून पडता देवकीवरी, नाश करण्या त्याच प्रभुचा ।।३।। प्रभी अवताराचे ज्ञान होते, परि विरोध करीत राही […]

वचन

वाणी मधूनी शब्द निघाला,कदर त्याची करीत होते  । मुखावाटे बाहेर पडे जे,वचन त्याला समजत होते  ।। दिले वचन पालन करण्या,सर्वस्व पणाला लावीत होते  । प्राणाची लावून बाजी,किंमत शब्दांची करीत होते  ।। स्वप्नामध्ये दिले वचन,हरिश्चंद्र ते पालन करी  । राज्य गमवूनी सारे आपले,स्मशानी बनला डोंबकरी  ।। प्राण आहूती देई दशरथ,वनी धाडूनी राम प्रभूला  । पालन केले तेच […]

पूजाविधी गाभा

सोडूनी दिली मी पूजाअर्चा,समाधान मज ज्यात न लाभले दैनंदिनीच्या कार्यक्रमातील,एक भाग तो सदैव वाटले बालपणी मज कुणी शिकविले,पूजाअर्चा आन्हकी सारे ठसले नाही मनात कधीही,भक्तीला हे पोषक ठरे पूजाअर्चा ह्या विधीमध्ये,लक्ष आमचे केंद्रीत होते हळदी कुंकू गंध फूले आणि,दीपधूप हे मधूर जळते सुबकतेच्या पाठी लागूनी,यांत्रिकतेसम आम्ही झालो अर्थ ज्याचा कधी न कळला,मंत्र मुखोदगत वदू लागलो वास्तव्य ज्याचे […]

चाळीशी

आयुष्य पुढे धावत असते, वय सारखे वाढत असते, पण…… खरी मजा जगण्याची, चाळीशीनंतर सुरू होते ,,,,, उच्छृंखल आणि समंजसपणा, यामधली मर्यादा कळते, अल्लडपणावर हलकीशी, प्रगल्भतेची झालर चढते, खरी मजा जगण्याची, चाळीशीनंतर सुरू होते,,,,, जगण्याची परिभाषा, थोडी थोडी बदलू लागते, काय हवे अन् काय नको, हे नेमकेपणे कळू लागते, खरी मजा जगण्याची, चाळीशीनंतर सुरू होते,,,,,, मन जोडीदाराचं, […]

1 302 303 304 305 306 437
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..