नवीन लेखन...

आपली पिल्ले

आपली पिल्ले परदेशी शिकायला जातात, अन तिथेच स्थाईक होतात, त्यावर एक सुंदर रचना – (भाग – 1) अरे राजा ये ना नको ग आई नोकरी मला लागू दे डॅालर जरा कमवू दे कर्ज माझे फिटू दे मग मी येईन अरे राजा ये ना नको ग आई गर्दी किती तिथे राहू मी कुठे? घर मला घेऊ दे मग […]

फक्त हिमतीने लढ

ज्याने रचना केली त्याला 1,00,000 वेळा सलाम करतो.. घरटे उडते वादळात बिळा, वारूळात पाणी शिरते कोणती मुंगी ? कोणतं पाखरू ? म्हणून आत्महत्या करते ? प्रतिकुल परिस्थितीत ही वाघ लाचारीने जगत नाही शिकार मिळाली नाही म्हणून कधीच अनूदान मागत नाही घरकुला साठी मुंगी करत नाही अर्ज स्वतःच उभारते वारूळ कोण देतो गृहकर्ज ? हात नाहीत सुगरणी […]

ज्येष्ठ IS THE BEST

आम्ही ना म्हातारे, आम्ही आहोत ‘ज्येष्ठ’ उचलू आम्ही जबाबदारी, आम्ही नाही ‘वेस्ट’ फक्त थोडी लागे आता, मधून आम्हां ‘रेस्ट’ कारण दुखतात आता, हात पाय कधीतरी ‘चेस्ट’ खाण्याचेही शौकिन आम्ही, घेतो सगळ्यांची ‘टेस्ट’ त्यामुळेच घ्याव्या लागतात पँथॉलॉजीच्या ‘टेस्ट’ जीवनातील गोष्टींचीही माहिती आम्हां ‘लेटेस्ट’ तरीही माहीत नाही, उरले आयुष्य किती ‘रेस्ट’ वाट पाहतो त्याची कारण, केव्हांतरी सांगेल तो, […]

प्रेमवेडा …

जर मी तुझ्या प्रेमात पडलो नसतो तर कोठे असलो असतो ? जगातील कोणत्यातरी पैशाच्या उकिरड्यावर गाढवासारखा लोळत असतो… एखाद्या बैलासारखा जगात कोणाच्यातरी सुखासाठी राबत असतो… मदमस्त हत्तीसारखा माझ्याच खोटया अहंकारात फिरत असतो… जगातील निरर्थक सुखे मिळविण्यासाठी निरर्थक भटकत असतो… भविष्याच्या उदरात मी इतक्या सहज शिरलो नसतो… माझ्या जन्माचं रहस्य मी जाणूच शकलो नसतो… जगातील सारी दुःखें […]

पुरुषत्व

रस्त्याने चालताना तिच्या मागून ती वार्‍याची झुळूक होऊन माझ्या मेंदूत शिरताच मला तिच्या सौंदर्याची नशा चढून मी ढकलायला लागताच मला एक पुरुष सावरतो पुरुषी अहंकार नाव असलेला… मग शोधू लागतो माझ्यातील पुरूष तिच्या सौंदर्यात दडलेल्या उणिवा आणि तिच्या कपडयांवर जागोजागी पडलेल्या छिद्रांना ज्या छिद्रांतून तो पाहतो तिला संपूर्ण त्याला ह्वे तसे, मी तिला कधीच विचारत नाही […]

माझा जन्म

माझाच जन्म व्हावा म्ह्णून माझ्या आई-बापाचं मिलन झालेलं नव्हतं… माझ्या जन्माचं कोडं त्यांना आणि मलाही कधी उलगडलं नव्हतं… माझा जन्म आता मला, माझ्या आई-बाबाला आणि जगालाही ओझं ठरलं होतं… मला शक्य असतं तर या जगात जन्माला येणंच मी स्वतःहून नाकारलं असतं… किती बरं झालं असतं या जगात जन्माला येणं न येणं हे आपल्या हातात असतं… © कवी […]

जग

मी म्हणालो जगाला मला फक्त तुझ्यासाठी आणि स्वतःसाठी जगायचयं… जग म्हणालं मला माझ्यासाठी जगं पण टाळं स्वतःसाठी जगायचं… मी बदललो जगाच्या कल्याणासाठी पण आता जगचं मला बदलतयं… जगात बदल घडवणं आता अशक्य आहे कारण जग आता पाषाण झालयं… © कवी – निलेश बामणे

लग्न म्हणजे काय असतं ?

लग्न म्हणजे काय असतं ? एक चुकलेलं गणित असतं कारण तिथे एक आणि एक तीन असतं… लग्न म्हणजे काय असतं ? उगाच त्याग करणं असतं कारण त्यातून काहीतरीमिळवायचं असतं लग्न म्हणजे काय असतं ? दोन जीवांचं मिलन असतं कारण एक अगोदर जाणार हे ठरलेलं असतं लग्न म्हणजे काय असतं ? मोक्षाकडे नेणारं दार असतं कारण ते […]

तू भेटलीस की…

तू भेटलीस की का बेचैन होते वेडे मन माझे… तू भेटलीस की का होतात डोळे ओलेचिंब माझे… तू भेटलीस की का काळीज होते कासाविस माझे… तू भेटलीस की का व्यर्थच भासे हे जीवन माझे… तू भेटलीस की का बेभान होते सारेच ग माझे… © कवी – निलेश बामणे

झोपडी ते टॉवर

माझ्या झोपडीच्या जागी झाला टॉवर अन्‍ वाढली आता माझी पॉवर… लिफ्टने आता मी होणार लिफ्ट गरिबीतून श्रीमंतीत अचानक झालो शिफ्ट… टॉयलेटमधे मी आता बसणार इंग्लिश इंग्रजीबद्दल मनात नाही आता किल्मिश… चुरगळले कपडे आता होणार हद्दपार सुटबुट भरजरी आता अंगावर चढणार… एस.आर.ए. ने केले झोपडपट्टीचे टॉवर मलाही दिले माझ्या स्वप्नातील शॉवर… मुंबई होणार आता झोपडी मुक्त उरलेल्या […]

1 306 307 308 309 310 437
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..