सांगाती
सरूनी गेले जीवन सारे उरल्या केवळ गतस्मृती जिथे जावे, तिथे तिथे वाटते तुच आहे सांगाती अजुनी उभा तोच पिंपळ सांगतो गं तुझ्याच स्मृती सरितेची शांत झुळझुळ तीरावरती तेवती ज्योती वाळूत ठसल्या पाऊलांतुनी छुमछुम छंदी पैंजणे नादती भास, तुझाच होई अनावर वाटते आहेस तू सदा सोबती ऋणानुबंध सारे प्रीतभारले स्पंदनी झरते लाघवी प्रीती आत्मानंद हा खरा जीवाला […]