नवीन लेखन...

तू…

तू दूर गेल्यावरच तुझी आठवण येते जितके अंतर वाढते तितकेच प्रेम वाढते तू जवळ असताना मनात काहीच नसते पण लांब असताना सारेच चलबिचल असते तुझ्या माझ्यात काहीच कधी सारखे नसते तरी तुझे सारे काही मला आवडते माझे मन जपण्यासाठी तू आटापिटा करतेस सारे समजून उमजूनही बोलणे टाळतेस प्रेमात पडायला काय लागते हे सांगतेस पण प्रेम व्यक्त […]

आपले प्रेम …

बऱ्याचदा वाटलं तुला सांगावं माझं तुझ्यावर प्रेम आहे ? पण तुझे ? न सुटलेले कोडे आहे ? तू जमीन तर मी आभाळ आहे… आपल्या मिळण्यासाठी मी क्षितिजाच्या शोधात आहे … तसे एक क्षितिज आता सापडलेही आहे… पण जितके त्याच्या जवळ जावे तितके ते दूर जाते आहे… माझ्या हृदयाचे आभाळ चांदण्यांनी व्यापले आहे… मनात एक चंद्र ही […]

कविता…

एका तासात केलेली कविता…लोकांना आवडते एका दिवसात केलेली कविता…डोक्यावरून जाते एका महिन्यात केलेली कविता…कविता वाटते एका वर्षात केलेली कविता…कविताच नसते एका आयुष्यात केलेली कविता…जीवन असते एका तासात केलेली कविता…मला आवडते एका दिवसात केलेली कविता तिला आवडते एका महिन्यात केलेली कविता…त्यांना आवडते एका वर्षात केलेली कविता…कवितेलाच आवडते एका आयुष्यात केलेली कविता…मृत्यूला आवडते मृत्यूला आवडणारी कविता प्रेम कविताच […]

तुझ्यासाठी ग फक्त तुझ्यासाठी

तुझ्यासाठी ग फक्त तुझ्यासाठी माझ्या मेंदूला कंप सुटतात हृदयात वेदना रोज होतात… तुझ्यासाठी ग फक्त तुझ्यासाठी माझे डोळे अश्रूंनी ओलावतात माझी स्वप्ने सारी भंगतात… तुझ्यासाठी ग फक्त तुझ्यासाठी माझे दिवस वाया जातात माझे विचार स्वैर होतात… तुझ्यासाठी ग फक्त तुझ्यासाठी माझ्या क्षणांचे तास होतात माझ्या जगण्याचे बारा वाजतात कवी – निलेश बामणे ( एन. डी.)

प्रेमात काय पडायचं ?

प्रेमात काय पडायचं ? कोणालातरी प्रेमात पाडण्यात मजा असते प्रेमात काय मरायचं ? कोणालातरी प्रेमात उचलण्यात मजा असते प्रेमात काय झुरायच ? कोणालातरी प्रेमात झुरविण्यात मजा असते प्रेमात काय रडायचं ? कोणालातरी प्रेमात हसविण्यात मजा असते प्रेमात काय मिळवायचं ? कोणालातरी प्रेमात देण्यात मजा असते प्रेमात काय सोडायचं ? कोणालातरी प्रेमात गुंतविण्यात मजा असते प्रेमात काय […]

प्रेम …

तू कधीच नाही माझ्या माझे हृदय तुझ्या प्रेमात पडले तू स्वछंद बागडत राहिलीस ते विनाकारण झुरत राहिले … तू नाही माझ्यावर मी तुझ्यावर प्रेम केले तू गालात गोड हसत माझ्या मनाला भुलविले … तू नाही दगाबाज दगाबाज मीच आहे तुझ्यासारख्या कित्येकींना मी दुखावले आहे… आठवतात ते सारे क्षण त्यांच्या सोबत प्रेमाचे आणि तुझ्यावरील माझे प्रेम मला […]

खरा आस्तिक

नास्तिक असूनी श्रद्धा नव्हती, ईश्वराचे ठायीं विज्ञानाची कास धरुनी ती, भटकत तो जायी // चार पुस्तके वाचूनी त्याचे,  तर्कज्ञान वाढले दृष्य अदृष्य तत्वांमधले , भेद जाणवले // नसेल त्याचे आस्तित्व कसे , तर्काला सोडूनी समजूनी ह्याला “अंध विश्वास” , देई फेटाळूनी // आधुनिक होते विचार त्याचे,  कलाकार तो होता पृथ्वीवरील घटणाना परि ,  योग म्हणत होता […]

तू – मी

तू जग तुझी स्वप्ने मी जगतो माझ्या स्वप्नात तू फक्त आंनद मिळव मी जगतो माझ्या आनंदात तू मिळव सारी सुखे मी जगतो माझ्या सुखात तू जग तुझ्या विश्वात मी रमतो माझ्या जगात तू मिळव तुझे प्रेम मी जगतो तुझ्या प्रेमात तू जग फक्त तुझ्यासाठी मी जगतो तुझ्या जगण्यात तू फक्त माझी नाहीस मी नाही आता माझ्यात […]

अबोलता

तुझी अबोलताही बोलून जाते बरेच काही तुला उगाच वाटते मला काही कळत नाही मी तुला कधी तसा कळलोच नाही तुला विसरून मी कधी जगलोच नाही तुझ्यापासून तसा दूर मी कधीच गेलो नाही माझ्या हृद्यातील तुझी जागा कधी रिकामी झालीच नाही आता बोलली नाहीस तू तर जमणार नाही तुझ्या माझ्या मिलनाची आशा मग उरणारच नाही ©निलेश बामणे

अज्ञानात सुख असते…

जगाला कधीच न पडणारी कोडी मला पडलीच नसती … ती कोडी सोडविण्यात माझ्या आयुष्याची वर्षे खर्ची पडलीच नसती… भूत भविष्य वर्तमानाची भुते माझ्या मानगुटीवर कधी बसलीच नसती… देवाच्या अस्तित्वाचा शोध घेण्याची गरज मला वेड्यागत भासलीच नसती… माझी नजर फक्त सुखावर असती तर दुःखाची धग मला कधी लागलीच नसती … प्रेमातील वासना आणि वासनेतील मुक्ती शोधली नसती […]

1 308 309 310 311 312 437
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..