अबोलता
तुझी अबोलताही बोलून जाते बरेच काही तुला उगाच वाटते मला काही कळत नाही मी तुला कधी तसा कळलोच नाही तुला विसरून मी कधी जगलोच नाही तुझ्यापासून तसा दूर मी कधीच गेलो नाही माझ्या हृद्यातील तुझी जागा कधी रिकामी झालीच नाही आता बोलली नाहीस तू तर जमणार नाही तुझ्या माझ्या मिलनाची आशा मग उरणारच नाही ©निलेश बामणे