नवीन लेखन...

काळाची झडप

डोक्यावरी घिरट्या घालीत,  काळ सदा फिरतो वेळ साधतां योग्य अशी ती,  त्वरित झेपावतो…१ भरले आहे जीवन सारे,   संकटांनी परिपूर्ण घटना घडूनी अघटीत,  होऊन जाते चूर्ण…२ फुलांमधला रस शोषतां,  फूल पाखरू नाचते झाडावरती सरडा बसला,  जाण त्यास नसते…३ आनंदाच्या जल्लोशात कुणी, चालले सहलीला अपघात घडतां उंचावरी,  नष्ट करे सर्वाला…४ खेळी मेळीच्या वातावरणी,  हसत गात नाचते ठसका लागून […]

मेघ गर्व हारण

अंहकाराचा पेटून वणवा,  थैमान घातिले त्या मेघांनी तांडव नृत्यापरि भासली,  पाऊले त्यांची दाही दिशांनी…१, अक्राळ विक्राळ घन दाट,  नी रंग काळाभोर दिसला सूर्यालाही लपवित असता,  गर्वपणाचा भाव चमकला…२, पृथ्वीवरती छाया पसरवूनी,  चाहूल देई आगमनाची तोफेसम गडगडाट करूनी,  चमक दाखवी दिव्यत्वाची…३, मानवप्राणी तसेच जीवाणे,  टक लावती नभाकडे रूप भयानक बघून सारे,  कंपीत त्यांची मने धडधडे…४, त्याच वेळी […]

जीवन मरणाची शर्यत

शोभिवंत घर केले,  आधुनिक बनलो मी विविध वस्तू संग्राहिले, शोभा देण्या आले कामी शिरे व्याघ्र, हरणाची, लटकाविली भिंतीवरी झाडे रंगीत पानांची, कुंडीत शोभती बरी काचेचा मोठा टँक घेऊनी, पाण्याने भरला रंगीत मासे आंत सोडूनी, दिव्यानी प्रकाशिला रंगी बेरंगी आकर्षक मासे, चपळाईने पाण्यांत पोहती नयनाला ते मनोहर भासे, चित्त साऱ्यांचे वेधती खेळून भूक लागली,  हा विचार आला […]

प्रेमाचा उगम

दाखवू नकोस प्रेम तुझे उपरेपणाच्या भावनेने  । तसेच मिळेल परत तुला केवळ वाणीच्या शब्दाने  ।। कंठामधूनी भाष्य निघाले आदळे कर्णपटावरी  । प्रेमाचा बघूनी ओलावा परिणाम होई मनावरी  ।। शब्द निघता हृदयामधूनी झेप घेई हृदयस्थरावरी  । आत्म्याची तळमळ भिडते आत्म्याच्या गाभ्यावरी  ।। खोलवर आणिक जाता ईश्वर बिंदूत विलीन होतो  । सत्याचा शोध लागूनी आनंदाचा पाऊस पडतो  ।। […]

भूतदया जागविली

चिंव चिंव करीत चिमणा चिमणी,खोलीमध्ये माझ्या आली अवती भवती नजर टाकून,माळ्यावरती ती बसली वाचन करण्यात रंगून गेलो,लक्ष्य नव्हते तिकडे आश्चर्य वाटले बघून मजला,काड्या गवताचे तुकडे घरटे बांधण्या रंगून गेली,आणती कडी कचरा मनांत बांधे एकच खुणगांठ,तयार करणे निवारा भंग पावता शांत वातावरण,वैताग आला मला कचरा आणि घरटे काढून,खिडकीतुनी  फेकला काम संपवूनी सांज समयी,घरी परत मी आलो त्याच चिमण्या तसेच घरटे,पाहून चकित झालो पहाट होता चिमण्या उडाल्या,काढून टाकले घरटे असेंच चालले कित्येक दिवस,परी जिद न सोडी ते चार दिवसाची सुटी घालउन,गांवाहून परतलो घरटे बघता संताप येऊन,मुठी  वळवूनी  धावलो घरट्या मधूनी चिमणी उडाली,बसली पंख्यावरती चिव चिव करुनी विनवू लागली,दया दाखवा ती परी मी तर होतो रागामध्ये,चढलो माळ्यावरी मन चरकले बघून अंडी,छोट्या […]

शांततेचा शोध

मनाची शांति । मिळेना कुणा कुठें शोधूं ती । प्रश्न सर्वांना ।। जीवन ध्येय । शांततेसाठीं प्रयत्न होय । त्याच्याच पाठी ।। शांतीचे घर । अंतःकरण नसे बाहेर । कधीं चूकून ।। शत्रू शांतीचा । अशांति असे ठिकाणा त्याचा । बाह्यांत वसे ।। विरोधी दोघे । दूर राहती । वाईट बघे । एकमेकाती ।। अशांत वाटे […]

महिला दिन

आईच्या आईपणाला तिच्यातील बाईपणाला तिने सोसलेल्या नऊ महिन्याच्या कळांना त्यासाठी मिळालेल्या हत्तीच्या बळांना शुभेच्छा शुभेच्छा शुभेच्छा बायको नावाच्या अर्धांगिनीला तिच्यात दडलेल्या कारभारणीला संसारातील तिच्याबरोबरच्या प्रत्येक क्षणाला दोन घर जोडणाऱ्या तिच्या विशेष मनाला शुभेच्छा शुभेच्छा शुभेच्छा सख्या , चुलत , मावस बहिणीला बहिणी सारख्या प्रिय वहिनीला त्यांनी बांधलेल्या प्रत्येक राखीला माहेरी झालेल्या त्यांच्या वजाबाकीला शुभेच्छा शुभेच्छा शुभेच्छा […]

काजळी धरल्या वाती

तेवत होती ज्योत दिव्याची, प्रकाश देवूनी सर्व जनां आनंदी करण्या आनंद वाटे, तगमग दिसे तिच्या मना, शांत जळते केंव्हां तरी,  भडकून उठते कधी कधी फडफड करित मंदावते,  इच्छा दाखवी घेण्या समाधी जगदंबेच्या प्रतिमेवरती,  प्रकाश टाकूनी हास्य टिपते हास्य बघूनी त्या देवीचे,  चरण स्पर्शण्या झेपावते अजाणपणाच्या खेळामधली,  स्वप्न तरंगे दिसूनी येती दिव्यामधले तेल संपता,  काजळी धरल्या दिसे […]

विष्ठा

विष्ठा बघूनी थुंकलो, घाण वाटली मजला, अमंगल संबोधूनी, लाखोली देई तिजला  ।।१।। संतापूनी मजवर , कान उघडणी केली, तुझ्याचमुळें मूर्खा मी, अमंगळ ती ठरली।।२।। आकर्षक रूप माझे, लाडू करंज्यानें युक्त कपाटातूनी काढूनी, केले सारे तूंच फस्त ।।३।। परि मिळतां तुझा तो, अमंगळ सहवास, रूप माझे पालटूनी, मिळे हा नरकवास ।।४।। डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

कलेचे खरे मुल्य

पर्वत शिखरीं जाऊन,खोदून आणली माती कौशल्य पणास लावून,केला मी गणपती   ।।१।। मुर्ती बनली सुरेख,आनंद देई मनां दाम मिळेल ठिक,हीच आली भावना घेऊन गेलो बाजारीं,उल्हासाच्या भरांत कुणी न त्यासी पसंत करी,निराश झालो मनांत बहूत दिवस प्रयत्न केला,कुणी न घेई विकत कंटाळून नेऊन दिला,गणपती मी शाळेत भरले होते भव्य प्रदर्शन,हस्तकला कौशल्याचे नवल वाटले गणपती बघून,दालनातील सुरवातीचे चकीत झालो […]

1 312 313 314 315 316 437
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..