नवीन लेखन...

नियतीचा फटका

(भोपाळ येथे विषारी वायुमुळे एका रात्रीत सहस्त्रावधी लोक मृत्यूमुखी पडले. ४.१२.८४ ची रात्र) एक भयानक रात्र अशी,  सहस्त्रावधींचा घेई बळी  । नियतीच्या खेळामधली, कुणा न समजे ही खेळी  ।। मध्यरात्र  होवून गेली, वातावरण  शांत होते  । गादीवरती पडून सारे, स्वप्ने रंगवीत होते  ।। तोच अचानक विषारी वायू,  पसरला त्या वातावरणी  । हालचालींना वाव न देता,  श्वास […]

आई

कशासवे तुलना करुं गे आई, तव प्रेमाची कां शब्द न सुचतां म्हणू तुजला,    ‘ प्रेमची ‘ वात्सल्याची देवता, करुणा दिसे नसानसातूनी हात फिरवीता ज्याचे वरती, ह्रदय येते उचंबळूनी जेव्हां पडते संकट, आठवण करितो आपली आई विश्वासाचे दोन शब्द,  उभारी त्यासी देई नऊ मास असता उदरीं, शक्ति तेज आणि सत्व देई ते ह्याच ईश्वरी गुण बिजानी, वाढ […]

संशयाचे भूत

हे भूत संशयाचे छळते कसे मनाला  । करीते सदा परि ते दिशाहीन विचारमाला  ।। एकाग्रतेचा घात होई क्षणार्धात तेथे  । डोलायमान होऊनी स्थिती बदलून जाते  ।। गमवी विश्वास जेव्हां प्रभू अस्तित्व शक्तीचा  । कळला न अर्थ त्याला या सत्य जीवनाचा  ।। येता मनी संशय आपलाच ज्या घडीला  । शोकांतिका जीवनाची ठरे त्याच क्षणाला  ।। डॉ. भगवान […]

वर्तमानीच करा

नियोजनाच्या लागून मागें,  भविष्याची आखतो चौकट कल्पकतेच्या आहारी जावून, चालण्या विसरे पावूल वाट….१, अनेक वाटा दिसूनी येती,  भविष्यामधळ्या कल्पकतेला वर्तमान त्या काळाकरिता,  जावे लागते एकाच दिशेला…२, उठूनी करा त्याच क्षणीं ते,  वृत्ति असावी अशीच सदा उद्यांवरती कार्य टाकतां,  मनीं उमटती विचार द्विधा…३, वर्तमान हा निश्चीत असता,  यश लाभते अनेकदा केवळ तुमची बघुनी धडपड,  साथ देईल ईश्वर […]

काळ घेई बळी

जात असता गाडी मधूनी, दुर्घटना ती घडली, अचानकपणे एक दुचाकी, आम्हा पुढे धडकली ।।१।। प्रयत्न होऊनी योग्य असे, थोडक्यात निभावले, वखवखलेल्या काळालाही, निराश व्हावे लागले ।।२।। घिरट्या घालीत काळ आला, झडप घातली त्याने, वेळ आली नव्हती म्हणूनी, बचावलो नशिबाने ।।३।। अपमान झाला होता त्याचा, सुडाने तो पेटला, थोड्याशाच अंतरी जावूनी, दुजाच बळी घेतला ।।४।। डॉ. भगवान […]

जन्म स्वभाव

गोड शब्द बोबडे, लकब मनास आवडे  । शब्दांची भासली जाण,  नव्हते भाषेचे अजुनी ज्ञान   ।। भावनांचा उगम दिसला,  मनी व्यक्त होई हालचालीतूनी  । रागलोभ अहंकारादी गुण,  दिसून येती जन्मापासून  ।। देश-वेष वा जात कुठली,  सर्व गुणांची बिजे दिसली  । हळूहळू बदले बाह्यांग जरी, उपजत गुण राही अंतरी  ।। प्रसंग घडता अवचित ,  बाह्य जगाते विसरत  । […]

माझा मीच गुरू

मीच माझा गुरू,  जे मनी ठरवू विचारांती तेच करू ….।।धृ।। सल्ला घेईन सर्वांचा,  वाटे मज किंमतीचा मनाची कदर करूं…१ मीच माझा गुरु निर्णय असे अनेक,  सारेच असती ठिक निवड एकाची करूं…२ मीच माझा गुरु, इतरांना जे वाटते,  माझ्या सोईचे नसते सोईचा आग्रह धरूं…३ मीच माझा गुरू शेवटीं माझ्या करिता,  गोष्टीची उपयोगिता स्वतःसाठीं योग्य करू…४ मीच माझा […]

पूजा तयारी

रोज सकाळीं प्रात: समयीं,  पूजा करी देवाची  । पूजे मधल्या विधीत,  चूक न होई कधी त्याची  ।। स्नान करोनी नेसूनी सोंवळे,  देव घरांत जाई । भाळी लावूनी गंध टिळा,  मंत्रपाठ गाई  ।। सहयोग देई पत्नी,  पूजा कर्मामध्ये त्याला  । आधींच उठोनी झाडूनी घेई,  स्वच्छ करी देव घराला  ।। करूनी सडा संमार्जन तेथें,  सारवोनी घेई जागा  । देवापुढती […]

दिवस तुझे हे फुगायचॆ

पाडगावकरानी आता ‘दिवस तुझे हे फुलायचे’ याचे विडंबन चाळीशी नंतर ‘दिवस तुझे हे फुगायचॆ’ केलयं. त्या अनाम कवीला सलाम दिवस तुझे हे फ़ुगायचे मोजून मापून जेवायचे ॥ध्रु॥ लाडकी माझी तु राणी नको तु खाऊ गं लोणी पाण्यात लिंबाला पिळायचे मोजून मापून जेवायचे॥१॥ दिवस तुझे….. साजुक तुपाची धार वाढवी calories फ़ार पोटात salad भरायचे मोजून मापून जेवायचे॥२॥ […]

तपसाधनेतील परिक्षा (काव्य स्फूर्ती)

पूजित होतो प्रभूसी,ध्यान एकाग्र करुनी भाव भक्तिने तल्लीन,होत असे भजनी  ।।१।। काव्यस्फूर्ति देऊनी,कवि बनविले मजला शब्दांची फुले गुंफवूनी,कवितेचा हार बनवविला   ।।२।। सुंदर सुचली कविता,आनंदी झाले मन ध्यास मज लागता,गेलो त्यांतच रमून   ।।३।। पुजेमधले लक्ष्य ढळले,काव्याच्या मागे जावूनी भजनांतील चित्त वेधले,तपोभंग तो होऊनी   ।।४।। मधाचे बोट चाटवूनी,मोहात ओढले मजला दूर सारुनी अमृत घट,परिक्षा घेता झाला   ।।५।। अडथळे […]

1 313 314 315 316 317 437
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..