वाटते फार अपमानितासारखे
वाटते फार अपमानितासारखे वागवे शहर विस्थापितासारखे रोषणाई प्रखर लखलखे रात्रभर हिंडते चांदणे शापितासारखे वाढले जसजसे वय, उमगले तसे – राहिले बालपण संचितासारखे नागवी भूक धर्माप्रमाणे जणू लाघवी पोर अन् प्रेषितासारखे काम झाल्यावरी मी घरी पोचतो, जेवतो, झोपतो आश्रितासारखे पूल चोखाळतो वेगळी वाट अन् पाहतो काठ प्रस्थापितासारखे ॐकार जोशी