गायक आणि पेय
कौशल ईनामदार एक प्रसिद्ध संगीतकार म्हणतात.. एकदा एक विचार मनात आला. कुणाला वायफळही वाटू शकतो. गायक आणि पेयांमध्ये साधर्म्य शोधायचा प्रयत्न तर कुठला गायक कुठलं पेय असेल..? मुकेश हे लिंबू सरबत आहेत. जरा आंबटसर चव आहे त्यांच्या अनुनासिक आवाजाची. पण ताज्या लिंबू सरबताची चव इतर कशालाही येणे केवळ अशक्य..! मन्ना डे हे दूध आहेत. पौष्टिक आणि […]