नवीन लेखन...

वर्‍हाडातली गाणी – १३

यादवरा या राणी रुसून बैसली कैसी सासूरवाशीण सून घरात येना कैसी सासू गेली समजावयाला चला चला सुनबाई अपुल्या घराला मी नाही यायची तुमच्या घराला माझा पाटल्यांचा जोड देते तुम्हाला तुमचा पाटल्यांचा जोड नको मजला मी नाही यायची तुमच्या घराला यादवरा या राणी रुसून बैसली कैसी सासरे गेले समजावयाला चला चला सुनबाई अपुल्या घराला मी नाही यायची […]

आकाशातील कापूस

कपाशीचे  ढीग अगणित विखुरले  दिसती आकाशीं मानव येथें उघडा  असूनी वस्त्र  अपुरें दिसे अंगाशी   ।।१।। कोठे आहे कापड गिरणी वस्त्र जेथें बनत असें दयावान तूं मालक असतां त्रोटक कापड निघे कसे   ।।२।। पाठव तूं तो वस्त्रांचा कोठा लाज  राखण्या मानवाची गरीब बिचारा विवस्त्र तो कीव करावी वाटे त्याची   ।।३।। डॉ. भगवान नागापूरकर संपर्क – ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

वर्‍हाडातली गाणी – १२

कारल्याची बी पेर ग सुनबाई मग जा अपूल्या माहेरा माहेरा कारल्याची बी पेरली हो सासूबाई आता तरी धाडा ना धाडा ना कारल्याला कोंब येऊ दे ग सुनबाई मग जा अपूल्या माहेरा माहेरा कारल्याला कोंब आल हो सासूबाई आता तरी धाडा ना धाडा ना कारल्याला वेल येऊ दे ग सुनबाई मग जा अपूल्या माहेरा माहेरा कारल्याला वेल […]

वर्‍हाडातली गाणी – ११

अक्कण माती चिक्कण माती अशी माती सुरेख बाई जातss ते टाकाव अस जात सुरेख बाई गहू ते वल्वावे असे गहू सुरेख बाई रवा तो पाडावा असा रवा सुरेख बाई करंज्या भराव्या अशा करंज्या सुरेख बाई तबकात ठेवाव्या अस तबक सुरेख बाई शालुनी झाकाव असा शालू सुरेख बाई खेळायला सापडते अस सासर द्वाड बाई कोंडू कोंडू मारीते […]

वर्‍हाडातली गाणी – १०

आमचे मामा व्यापारी व्यापारी तोंडात चिक्कण सुपारी सुपारी सुपारी काही फुटेना फुटेना मामा काही उठेना उठेना सुपारी गेले गडगडत गडगडत मामा आले बडबडत बडबडत सुपारी गेली फुटून फुटून मामा आले उठून उठून

बघून सूर्यपूजा पावन झालो

हांसत  आली सूर्य किरणे झरोक्यातून देव्हारयांत नाव्हू घालूनी जगदंबेला केली किरणांची बरसात पूजा केली किरणांनी जगन्माता देवीची प्रकाश  स्पर्शुनी  चरणाला केली उधळण सुवर्णांची तेजोमय दिसू लागले मुखकमल जगदंबेचे मधुर हास्य केले वदनी पूजन स्वीकारते  सूर्याचे रोज सकाळी प्रात:काळी येउनी पूजा तो करितो भाव भक्तीने दर्शन देउन स्रष्टीवर किरणे उधळतो कोटी कोटी किरणांनी तो देवीची पूजा करितो केवळ त्याची पूजा बघुनी मनी पावन मी होतो डॉ. भगवान नागापूरकर संपर्क – ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

भावना उद्‍वेग

आकाशाला शब्द भिडले, हृदयामधले । भाव मनीचे चेतविता, स्फोटक बनले ।।१।। देह जपतो हृदयाला, सदा सर्व काळी । धडकन त्या हृदयाची, असे आगळी ।।२।। जमे भावना हलके तेथे, एकवटूनी । सुरंग लागता तीच येई, उफाळूनी ।।३।। कंठ दाटता जीव गुदमरे आत । रंग बदलती चेहऱ्यावरले, काही क्षणात ।।४।। उद्‌वेग बघूनी शरीर, कंपीत होते । हृदयातील भाव […]

संदिप खरेंची संयम शिकविणारी कविता…

“मी सुद्धा चुकलो असेन”, एवढं मनात आणा! धनुष्य मग हातातलं, जरा संयमानंच ताणा! बाणच हळू कानात सांगेल, ‘ठेव मला भात्यात! एवढं ऊन, एवढा पाऊस, असणारच की नात्यात!’ वादा जवळ गप्प बसून, संवाद करू, मारू गप्पा! तुटण्या किंवा उसवण्याचा, येणारच नाही टप्पा! तेवढाच क्षण टळल्यावर आकाश होतं साफ! दंव होऊन गारवा देते, तीच गरम गरम वाफ! एक […]

देव माझा रुसत नाही

गुंतवणा-या परंपरा अन् पंचांग मला दिसत नाही, केला उपवास नाही तरी देव माझा रुसत नाही ….. तिथी, वार-मुहुर्ताच्या अडगळीत मी फसत नाही, एक दिसाच्या भक्तीसाठी देव माझा रुसत नाही ……. दलालांच्या जोखडात कधीच ईश्वर बसत नाही, दिला छेद परंपरेला तर देव माझा रुसत नाही ……. तो असतो आमच्यात आम्हालाच पटत नाही, दुध तुपाच्या नैवद्यासाठी देव माझा […]

माझं काय, तुमचं काय,

माझं काय, तुमचं काय, प्रेमात पडलं की असंच व्हायचं !! तिचं बोलणं, तिचं हसणं जवळपास नसूनही जवळ असणं; जिवणीशी खेळ करीत खोटं रुसणं; अचानक स्वप्नात दिसणं ! खटयाळ पावसात चिंब न्हायचं ! माझं काय, तुमचं काय प्रेमात पडलं की असच व्हायचं !! केसांची बट तिने हळूच मागं सारली … डावा हात होता की उजवा हात होता? […]

1 323 324 325 326 327 437
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..