नवीन लेखन...

एकेकाचे भाग्य..!

कुणाच्या पुस्तकात असते मोरपिसाची खूण कुणाच्या आठवणीत असते केवड्याची चूण कुणाच्या रुमालावर रेंगाळते पाखरु कोलनवॉटरचे कुणाच्या गालाला बिलगते रेशीम कुरळ्या बटेचे कुणाच्या ओंजळीत असते करपलेली पानझड कुणाच्या पांजळीत असते हरवलेली पडझड कुणाच्या डोहात असतो आर्ततेचा तरंग कुणाच्या दाहात असतो निरर्थाचा अभंग कुणी समईसारखे प्रसन्न तेवत असते कुणी कापरासारखे जळत असते..!!! सदानंद रेगे..!

वसंत जेथे तेथे सुमने…

वसंत जेथे तेथे सुमने सुमनांपरी ही दोन मने दोन मनांतुन प्रीत दरवळे रंग एक परि गंध वेगळे दोन मनांतुन प्रीत दरवळे बकुळफुलांचे घुंगुर बांधून प्रीत सुगंधा करिते नर्तन नादमधूर या झंकारातून भाव मनीचा तुला मिळे शुभ्र धवल मोगरीची पुष्पमाळ गुंफिते चैत्र पौर्णिमेची सख्या प्रीत वाट पाहते क्षणाक्षणाची आस तुझी लाख युगे मोजिते अंतरीच्या मूर्तीला मी भावफुले […]

निर्लज्ज..

भारत पर्यटनाला आलेली ती विदेशी महिला हातातील चिप्सचे रिकामे पाकीट फेकण्यासाठी अर्धा तास डस्टबिन शोधत फिरली… आणि तिच्याच समोर संत्र्याची सोललेली साल मी बिनधास्त रस्त्यात फेकली… माझ्याकडे रोखलेली तिची ती प्रश्नार्थी नजर पाहिली तरीही मला लाज नाही वाटली…. लाज माझ्या बेगडी स्वच्छतेची…! त्याने बेकायदेशीर काम करण्यासाठी माझ्याकडे सरकवलेलं नोटांचं पाकीट मी हळूच खिशात दाबलं… आणि त्याच्याच […]

प्रेम कुणावरही करावे

‘प्रेम कुणावरही करावे’..ही कुसुमाग्रज यांची ही अत्यंत गाजलेली आणि आपल्याला अंतर्मुख करणारी कविता. प्रेम कुणावर करावं ? कुणावरही करावं प्रेम राधेच्या वत्सल स्तनांवर करावं, कुब्जेच्या विद्रुप कुबडावर करावं, भीष्मद्रोणांच्या थकलेल्या तीर्थरुप चरणांवर करावं, दुर्योधन-कर्णाच्या अभिमानी अपराजित मरणावर करावं। प्रेम कुणावरही करावं। प्रेम सुदामा नावाच्या भटजीवर करावं, अर्जुन नावाच्या राजेन्द्रावर करावं, बासरीतून पाझरणा-यासप्तस्वरांच्या चांदण्यावर करावं, यमुनेचा डोह […]

ममतेतील खंत

भरल्या ह्रदयी ओल्या नयनी निरोप देई देवकी माता भगवंताचे रक्षण करण्या, विनवी वेडी माया ममता.  //धृ//   आकाशवाणीने बोले श्रीहरी देवकीचे तो येईल उदरी संहार करण्या दुष्टजनाचा ईश्र्वर अवतरे ह्या जगता  //१// भगवंताचे रक्षण करण्या, विनवी वेडी माया ममता.   रक्षक सारे निद्रिस्त केले कारागृहाचे दार उघडले मार्ग दिसे वसुदेवाला परि प्रभू शक्तीचे दर्शन धडता  //२ […]

राजकिय स्थितीवर काही चारोळ्या

“नरेंद्रजीं“चे धरून बोट “देवेंद्रजी” पळत आहेत “घड्याळ्या“च्या काट्यांना ते अधूनमधून लोंबकळत आहेत विझली “गांधी” नामाची आँधी उरली थोडी ज”रा हूल” आहे अखिलत्व गमावलेल्या पक्षास “अखिलेशी” यशाची भूल आहे सन्मान बहु पडला पदरात बारा मती ची ही करामत आहे कोणत्याही सत्ता-ऋतूत “शरद” ऋतु ऐन भरात आहे मज तुजसवे घेऊन टाक रे अन् मतदारां पुढे उभा “ठाक रे” […]

Dance रे मोरा, Mango च्या वनात

सेमी ईंग्लिश मिडियम च्या आईने आपल्या मुलाला शिकविलेलि कविता…! Dance रे मोरा, Mangoच्या वनात Dance रे मोरा Dance… ढगांशी wind झुंजला रे.. काळा काळा cotton पिंजला रे.. आता your पाळी, तुला give टाळी..y फुलव पिसाराss Dance.. Dance रे मोरा, Mangoच्या वनात Dance रे मोरा Dance.. झरझर edge झरली रे.. झाडांची leaves भिजली रे.. Rainमध्ये न्हाउ, Something […]

पुरुषाचं दुखणं कुठे कोणाला समजतं?

अनेकदा आपण स्त्रीबद्दल वाचतो पण पुरुषाच दुख कधीच कोणाला समजत नाही.  त्याचे दुख जरी कोणाला समजले तरी त्याच्याविषयी कोणीच बोलत नाही. अशीच प्रत्येक पुरुषाची व्यथा सांगणारी ही कविता.  

शारदेस विनंती

हे शारदे ! रूसलीस कां तू,  माझ्या वरती  । लोप पावली कोठे माझी,  काव्याची स्फूर्ती  ।। दिनरात्रीं तव सेवा केली,  मनोभावें  । कळले नाहीं आज शब्द ओठचे,  कोठे जावे  ।। दिसत होते भाव मजला,  साऱ्या वस्तूमध्यें  । उचंबळूनी जाई मन तेव्हां,  नाचत आनंदे  ।। तेच चांदणे तारे गगनी,  आणिक लता वेली  । पकड येईना टिपण्या सौंदर्य, […]

वळून पहा

उडून गेली दूर दूर तू झेप घेउनी आकाशी बघू लागलो चकीत होऊनी पंखामधली भरारी कशी नाजूक नाजूक पंखाना आधार होता मायेचा चिमुकल्या त्या हालचालींना पायबंध तो भीतीचा क्षणात आले बळ कोठून विसरुनी गेलीस घरटे आपुले बंधन तोडीत प्रेमाचे आकाशासी कवटाळले कधीतरी उडणे, आज उडाली बघण्या साऱ्या जगताला किलबिल करून वळून पहा दाणे भरविल्या चोचीला डॉ. भगवान नागापूरकर संपर्क – ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

1 324 325 326 327 328 437
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..