नवीन लेखन...

प्रतीक

भोवतालच्या जगाकडे मी जेव्हा डोळसपणे पहातो मनाचा आरसा माझा मी अलगद उघडतो वाटतो मला आंधळा जगाच्या अधोगतीकडे पाहून घेत असेल डोळे मिटून वाटतो मला एकांध घेत असेल संधी एक डोळा मारुन दाखवत नसेल ना लंगडा जीवनातला अधूरेपणा पृथ्वीवर असता एक डोळा दूजा चंद्रावर रोखून वेध नसेल ना घेत अनंताचा एखादा चकणा पुढे आलेले दात दिसतात गाताना […]

कृष्ण

कृष्ण म्हणजे दिव्यत्व कृष्ण म्हणजे सर्वस्व साक्षात्कार कैवल्याचा कृष्ण म्हणजे सर्वस्व सदगुणांचा समुच्चय सर्वोत्तमी प्रीतीतत्व निर्मल हॄदयस्थ मैत्र कृष्ण म्हणजे सर्वस्व तो राधा, मीरा,सख्यांचा सुदाम्याचा, अर्जुनाचा सर्वांच्याच अंतरातला कृष्ण म्हणजे सर्वस्व दुष्प्रवृत्तिंचा कर्दनकाळ सत्प्रवुत्तिंचा तारणहार पावित्र्य, प्रेम, शुचिता कृष्ण भव्य, दिव्य, देवत्व कृष्ण ! भक्ती, सात्विकता तो नित्य आचरणी यावा मनामनातुनी अवतरावा कृष्ण कृष्ण कृष्ण सर्वस्व […]

मोक्षदायी जलधारा

सरिता ही एक पुण्यप्रदा अखंडित समांतर किनारा ध्यास सागरी समर्पणाचा मोक्षदायीनी ती जलधारा… झुळझुळते संथ अविरत प्रवाह निश्चिंती वाहणारा घेते कवेत, सुखदुःखांना पापक्षालनी ती जलधारा… तमा न पर्वा तिला कशाची फुलवीते, दुतर्फा वसुंधरा नदिकाठ तो सर्वांगी सुंदर राऊळमंदिर गोपुर गाभारा… अध्यात्मी,भक्तीभावरंगला श्रध्येय, मुक्ती गंगाकिनारा… भगीरथाच्या गंगेचे गंगोदक जन्मी आत्मशांतीचा निवारा… –वि.ग.सातपुते .( भावकवी ) 9766544908 रचना […]

ध्यास

मज नाही अजुनही कळले नाते, तुझे नी माझे कसले… परी नित्य ध्यास तुझा अंतरी हेच सत्य, निरागस मनातले… श्वासा श्वासात तूच सांगाती सावलीत रूप तुझे सांडलेले… बैचन करते हे गूढ अनामिक सांगु कुणास, मी हे मनातले… तुही अशीच निःशब्द अबोली मौनातच मन घट्टघट्ट बांधलेले… तुझ्या लोचनीच्या प्रीतभावनां सहजी सांगुनी जाती मनातले… पुण्यपावनी दान, दैवी प्रीतीचे जन्मी, […]

दोन मृत्यू: एक व्यक्तीचा, एक हुद्याचा

बड्या धेंड्याचा देहान्त जाहला, राजकारणी खुर्च्याचा त्राता निवर्तला, जनसागर अवघा शोकसागरात बुडाला अश्रूंचा (कोरड्या) अन् पूर लोटला का कोण जाणे कुणास कसला पत्ताच नव्हता शोक कशाला? शोकग्रस्त जीवांनी गच्च भरले तरीही राजमहाल अपुरे पडले हार वाहिले, पुष्पचक्र अर्पिले तरी बरेच काहीसे अजूनी उरले एकाकी तू असा निजलास का रे कुणी न तुजला वारस का रे शोक […]

सत्य शाश्वताचे

सांज क्षितीजी थबकता रंगले आभाळ भावनांचे शिंपण, अंतरी अमृताचे मनी भास ते अमरत्वाचे… उजळलेली तिन्हीसांजा आविष्कार, कृतार्थतेचे जरी ही गात्रे पांगुळलेली शांत मनात भाव मुक्तीचे… जीव ! स्मृतीत गुंतलेला नाद अंतरी टाळमृदुंगाचे मन, सारे विठ्ठल विठ्ठल संकीर्तनी सत्य शाश्वताचे… यावीण दूजे सुख कोणते अहोभाग्य जन्मोजन्मिचे तोच सावळा एक कृपाळू अंतरंगी सुर मुग्ध पावरीचे… –वि.ग.सातपुते (भावकवी ) […]

सांत्वन

सांगा, सांगा कुठला देवधर्म आता सांगा कुठले सत्य – असत्य आता..।। कुणी सांगावे, ते ऐकावे देवकृपे ते घडते सारे डोळी दिसले तेच पाहिले सांगा काय ज्ञात – अज्ञात आता….। रामकृष्णही जन्मले जगती देवत्वाची ती साक्ष जगती निधर्माचेच ते रक्षणकर्ते सांगा कुणी पाहिला देव तो त्राता….। कुठली प्रीती, कुठली भक्ती सुखसागरी मस्त धुंदित जगावे श्वासात गंधतो स्वार्थभोग […]

सांज रेंगाळलेली

असा एकटाच जीव श्रमलेलेला असह्य वेदनां श्वास कोंडलेला अंतरी कोलाहल अश्रु ओघळलेला उद्वेग भावनांचा विचार बावरलेला मन दिशाहीन आव्हान विवेकाला कसे सावरावे अशांत मनाला भौतिक सुखाचीच आसक्ती जीवाला निर्मळ सुखसौख्यदा त्यजीता षडरिपुला सांज रेंगाळलेली माहोल गहिवरलेला अंती लोचनी सारा गोतावळा…. –वि.ग.सातपुते. (भावकवी) 9766544908 रचना क्र. १९९ १४/८/२०२२

मजुराचे मनोगत

मजूराचे मन कष्ट। कंटकांचे जीवन । कथावे ते कवण । जीवन वैफल्य ॥ १ ॥ जागा ही पाव पाखा । गेला जन्म आखा। येथे का लाज राखा । धडूतही नसे ॥ २ ॥ यंत्राशी सांगे नाते । गरगरणारे पाते। कष्टतो मी स्वहस्ते । त्याले मोल नसे ॥ ३ ॥ करुण हे जीवन। भीषण ते क्रंदन । […]

तिरंगा

केशरी, श्वेत, हरित ध्वज समृद्धी तिरंगा सौखसुखदा भारताची मांगल्य ध्वज तिरंगा…. अस्मिता भारतीयांची ध्वज अभिमानी तिरंगा शौर्यशक्ती, बलिदानाचे सत्य रूपक हा तिरंगा….. ही जन्मभूमी देवतांची साक्ष संस्कृतीची तिरंगा श्वासाश्वासात देशभक्ती रुजवीतो हाच तिरंगा…. जगतवंद्य जगतवंद्य शांतीदूत राष्ट्रध्वज तिरंगा वंदे मातरम, वंदे मातरम मुक्त फड़कवुया तिरंगा…. –वि.ग.सातपुते .(भावकवी) 9766544908 रचना क्र.१९७ १३/८/ २०२२

1 31 32 33 34 35 437
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..