नवीन लेखन...

निवृत्तीच्या उंबरठ्यावर !

कां व्हावे निवृत्त मी ? कुणी सांगतो म्हणूनी निसर्गालाच सांगू द्या वय झाले समजूनी कार्यक्षमता माझ्या मधली मोजमाप हे कुणी करावे ? विकलांग होईल केंव्हा शरीर निसर्गालाच हे ठरवूं द्यावे सहजची जगतो ऐंशी वर्षे संसार सागरी पोहता पोहता स्थिरावले मन विचार करुनीं निवृत्तीची जाणीव येता सर्वासंगे जगता जगता शेवटचा तो श्वास ठरु दे हासत खेळत आनंदाने […]

प्रवाही जीवन

वाहत असते जीवन सारे, वाहणे जीवनाचा गुणधर्म, स्तब्ध राहता जीवन आपले, कसे घडेल हातून कर्म ।।१।। वाहत होते, वाहत आहे, भविष्याते वहात जाईल, सतत चाले ही प्रक्रिया, जीवन करण्यास सफल ।।२।। आजही शास्त्रज्ञ हेच सांगतो, निर्जीव वस्तूसुद्धा प्रवाही, अणूची ती बनली असूनी, प्रचंड हालचाल आत होई ।।३।। अणूत असूनी तीन भाग, अतिशय वेगाने फिरती, केवळ त्यातील […]

प्रेम नाणे

तसेंच वागा इतरजणांशी, वाटत असते ,तुमच्या मनीं   । अपेक्षा करता प्रेमाची, सदैव इतरांकडूनी…१, सहानूभुतीचा शब्द लागतो, दैनंदिनीच्या जीवनीं  । क्षणा क्षणाला भासत असते, जीवन तुमचे अवलंबूनी…२, प्रेम वाटतां इतरांना, परत मिळते तेच तुम्हांला  । प्रेम नाण्याचे मूल्य जाणूनी चलनांत ठेवा हर घडीला…३, याच नाण्यांनीं काम बनते, चटकन सारे बघा कसे  । दोन मनें सांधली जाऊनी, आनंद […]

आधार

वेलींना आधार होता, वृक्ष वाटला दणकट परि बुंधा ज्याचा किडूनी गेला, कोसळणार मग कधीतरी नष्ट करिल तरूवेलींना, धरणीवरती आडवा होता सौंदर्य दिले लताफूलांनी, सारे कांहीं विसरूनी जाता वेलींनो आणि झुडपानों, सोडूनी घ्या आधार पोकळ स्वतंत्रपणे तुम्ही जगण्या , स्वावलंबनाचे टाका पाऊल डॉ. भगवान नागापूरकर संपर्क – ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

संस्कारमय मन

प्रयत्न मनाचा सदैव असे, भरारी घेण्याचा उंच आकाशी तारांगणांना, भेट देण्याचा….१, मनी आस ती राहत असते,  उचलून त्यास न्यावे शिखरावरती जाता क्षणी,  स्थितीरूप घ्यावे…२, प्रयत्नात साथ न मिळता,  खाली कोसळते विचार दबावापुढती त्याचे, काही न चालते…३, विचार संस्काराचे वलय, मनाभोवती फिरे निर्मळ पवित्र मन ते,  अवलंबूनी विचारे…४ डॉ. भगवान नागापूरकर संपर्क – ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

पिंडीतील ब्रह्मांड

विज्ञानाने शोधली,    अणुतील प्रचंड शक्ति प्रथमच जगाला कळली,    अणूंतील उर्जा शक्ती सुक्ष्म असूनी अणु आकार,    सुप्त शक्ति अंगीं प्रचंड उर्जा करी साकार,    फोडतां अणु मध्यभागीं विचार मनीं येई ,    कोठून शक्ति ही आली निर्जीवातील अणूरेणूला,    कशी उर्जा लाभली समजोनी घ्या एक,    निसर्गाची श्रेष्ठता लहान असून देखील,    प्रचंड त्याची योग्यता जीव देहाचे पिंड,   जीवंततेतील सुक्ष्मता बाळगी ते […]

शुद्धीसाठी गुरू

कितीक वेळा धुतला कोळसा,  रंग न बदले त्याचा  । उगाळता झिजून जाई,  परि काळेपणा कायमचा  ।। भट्टीत घालून त्यास जाळता,  घेई रंग लाल कसा  । शुभ्रपणा हा दिसून येतो,  राही न जेंव्हा कोळसा  ।। मलीनता ही मनामधली,  खोल  रूजली असे  । विचारांतील तर्कज्ञान ,  शुद्धीसाठी पुरे नसे  ।। गुरू लागतो अग्नी सारखा,  चित्त शुद्धी करिता  । […]

जीवन एक “जाते”

जात्याच्या पात्यामध्ये, भरडला जाई दाणा  । दोन चाकांत येईल,  मोडेल त्याचा कणा  ।। जीवन मृत्यूची चाके,  सतत फिरत राही  । येई जो मध्ये त्याच्या,  मागे न उरेल काही  ।। मध्यभागी राही स्थिर,  आंस त्यास म्हणती  । वरचे चाक फिरे,  त्याच्या भोवती  ।। आंसाजवळील दाणा,  दूर तो चाकापासूनी  । परिणाम चाकाचा तो होईल,  मग कोठूनी  ।। जन्म […]

बैंक पैसे देत नसल्यामुळे वैतागलेल्या नवर्‍याची गोष्ट

बैंक पैसे देत नसल्यामुळे वैतागलेल्या नव-याने आपल्या पत्नीला लिहिलेली कविता…. (पत्नीने घरखर्चात व डामडौलात काटकसर करावी यासाठी पतीचा हा अट्टाहास) “लाडके” कशासाठी गं तू नवे नवे “कपडे” शिवतेस? अगं.. जुन्या साड्यांमध्ये तर तू “अप्सरा” दिसतेस! ब्यूटी पार्लरच्या चक्रात खरोखर तू पडू नकोस चंद्रासारख्या सुंदर शीतल चेहऱ्याला तू कुठलीही क्रीम लेपू नकोस! अगं सफरचंदासारखे गुटगुटीत गोरे गाल […]

रचली जाते कविता

मिळता मजला बाह्य एकांत, छळते गर्दी विचारांची मन गुंतविण्या कुणी नसता, चलबिचल होते भावनांची…१, शब्द वर्णांचा घेवून आधार, भावना काढी मार्ग आपला आविष्कार घडविण्यासाठी, विचार करितो मदत तिला…२, शब्दांना नटवी थटवी, ध्वनी लहरी नि सूर गेयता अलंकार मिळता अंगी, रचली जाते एक कविता…३   डॉ. भगवान नागापूरकर संपर्क – ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com        

1 331 332 333 334 335 437
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..