नवीन लेखन...

क्षण भंगूर जीवन

ठसका लागून प्राण जातो, घशांत अडकून काही तरी  । क्षणांत सारा खेळ आटपतो, धडपड केली किती जरी  ।। हृदय जेव्हा बंद पडते, उसंत न मिळे एक क्षणाची  । केवळ तुम्हीं चालत असतां, यात्रा संपते जीवनाची  ।। कांचेचे  भांडे निसटता, तुकडे त्याचे होऊन जाती  । देहाचा काय भरवसा, जेव्हां सांपडे अपघाती  ।। वाढ करण्या शरीराची, पडत असती […]

२६/११ ची ८ वर्षे

ताज हॉटेल जळत होते लाल रक्त गळत होते खरे भक्त साळसकर दूर शासना आळसकर पुन्हा सव्वीस अकरा नको कसाब सारखा छोकरा नको नापाक पाकडे भामटे होते शर्थीने लढणारे कामटे होते तुकारामाने कमाल केली कसाब पकडून धमाल केली लढता -लढता शहीद झाले तेंव्हा आम्हाला माहित झाले नांगरे पाटलांचा विश्वास होता ताज हॉटेलचा अभ्यास होता आत शिरून आतंकी […]

संतुलन

आकाशीं सुर्य तळपला   तेजस्वी त्याची किरणें तप्त करुनी जमिनीला   वाळून टाकी जीवने   ।। नभीं मेघ आच्छादतां    रोकती रविकिरणे तुफान पर्जन्य पडतां   महापूर त्याचा बने   ।। सुटतां भयंकर वारा   निघून जाती ढग प्रचंड वादळाचा मारा   पर्जन्य कसे होईल मग   ।। वादळास अडविती पर्वत   वलय त्याचे रोकूनी सारे करिती मदत   आनंदी करण्या धरणी   ।। एकाची शक्ती बनते    दुसऱ्यास […]

स्वप्न दोष

भंग पावले पाहीजे    स्वप्न माझे रातचे  । तोडणे स्वप्न श्रृंखला   नसे मानवी हातचे  ।। शिथिल गात्र बनती   जाता निद्रेच्या आधीन  । उघडले जाते मग       विचारांचे दालन  ।। किती काळ भरारी घेई   निश्चीत नसे कांही  । विचार चक्र थांबता     स्वप्न दोष तो जाई   ।। रात किड्यानो जागवा    स्वप्नावस्थे मधूनी  । कुकुट कोकीळा येई      मदतीसाठी धावूनी   ।। वाऱ्याची […]

कवीची खंत

भटकतो आहे कवि   विचारांच्या सागरांत वाहात चालला आहे    व्यवहारी जगांत आधार नाही त्याला    पैशाच्या शक्तीचा कुचकामी ठरत आहे    प्रयत्न त्याचा जगण्याचा अर्धपोटी राहात असतो     भाकरीच्या अभावी लिहीत चालला आहे        काव्यरचना प्रभावी उदासपणे बघतो आहे     ” हाऊस फूलची ” पाटी लिहीली होती नाट्यगीते     त्यानेच सर्वासाठी टाळ्यांचा तो कडकडाट       बाहेर ऐकू येई उपाशी होते त्याचे पोट    खिन्नतेने निघून […]

मेणबत्ती

जळत होती मेणबत्ती, मंद मंद प्रकाश देवूनी  । अंधकार भयाण असतां, भोवताली उजेड पाडूनी…१, बुडत्यासाठी काडीचा आधार, अंधारी भासली तशी प्रकाशीं  । असूनी ज्योत मिणमिणती, त्या क्षणी वाटला सूर्य आकाशी….२, वाटत नाहीं मूल्य कुणाला, भरपूर पडल्या प्रकाशाचे  । मेणबत्तीची ज्योत शिकवी, साधे तत्त्व जीवनाचे….३ डॉ. भगवान नागापूरकर संपर्क – ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com    

गर्भावस्थेतील आनंद

जीवनातील परमानंद, केंव्हां लाभतो त्या जीवना ? मातेच्या त्या उदरामध्ये, शांत झोपला असताना ।।१।। असीम ‘आनंद’ अनुभव, घेत असे तो जीवात्मा सोsहं निनाद करूनी, सांगतो मीच परमात्मा ।।२।। आनंदाने नाचू लागतो, मनांत येता केंव्हां तरी, मातेलाही सुखी करती, त्याच्याच आनंदी लहरी ।।३।। पुढे त्याचे प्रयत्न होती, मिळवण्या तोच आनंद सुख, दु:खाच्या चक्रामध्ये, विसरूनी जातो तो नाद […]

सुपरवुमन… सुपरवुमन…

सुपरवुमन सुपरवुमन सुपरवुमन लढते आहे घर-दार पाठी बांधून पोटासाठी पळते आहे पोरे नवरा दूध चहा मधेच आजचा पेपर पहा आले गेले पाव्हणे रावळे सासरे कायम तडकलेले सासू सासरे पिकली पाने डॉक्टरकडे पळते आहे सुपरवुमन सुपरवुमन सुपरवुमन लढते आहे नवरा म्हणतो हसली पाहिजे चौघात उठून दिसली पाहिजे मुले म्हणती आई हवी घ्यायची आहे सॅक नवी बायको आई […]

गीता – जीवनाची एक उकल

रणभूमीवर समर प्रसंगी      मृत्यु असता सामोरी जीवनांची तत्वे सांगती       गीते द्वारे श्रीहरी //धृ// अर्जुन असूनी महारथी         द्विधा झाली मनःस्थिती सगे सोयरे तेथे बघूनी          खालती बसला निराशूनी कसे मारुं मी माझेच सारे        भगवंताला प्रश्न विचारी    //१// जीवनाची तत्वे सांगती गीते द्वारे श्रीहरी कुणीही नाही कुणाचे येथे        नाते गोते क्षणिक भासते सत्ता येथे चालते प्रभुची          खेळणी सारी ठरते […]

पक्षी – मुलातले प्रेम

स्वैर मनानें भरारी घेई,  पक्षी दिसला आकाशीं  । स्वछंदामध्यें विसरला ,  काय चालते पृथ्वीशीं  ।१। एक शिकारी नेम धरूनी,  वेध घेई पक्षाचा  । छेदूनी त्याचा एक पंख,  मार्ग रोखी उडण्याचा  ।२। जायबंदी होवूनी पडला,  जमीनीवरी  । त्वरीत उचलून पक्षाचे,  पाय बांधे शिकारी  ।३। ओढ लागली त्यास घराची,  भेटन्या मुलाला  । आजारी असूनी पुत्र त्याचा,  चिडचिडा तो […]

1 335 336 337 338 339 437
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..