नवीन लेखन...

सूर्योदय

  प्रभात झाली रवी उगवला दाही दिशा उजळल्या रात्रीचा अंधार जावूनी नवीन आशा अंकूरल्या   १   बरसत आहे सूर्यकिरणे पृथ्वीच्या भूतली आनंदाने पुलकित होवून धरणीमाता शहारली   २   निघूनी गेला रात्रीचा गारवा त्याच्या आगमानाने उल्हासीत होवून प्राणी जीवन नाचत राही ऊबेने   ३   पुनरपि आता झाले सुरु चक्र जीवनाचे मिळवू आज काही तरी किरण चमकती आशेचे […]

अणूतील ईश्वर

पदार्थाचे गुण जाणता,  एक गोष्ट दिसून येते, सूक्ष्म भाग अणू असूनी,  त्यांत सुप्त शक्ती असते…१, या शक्तीची तीन रुपे, तीन टोकावर राही, अधिक उणे नी सम,  विद्युतमय प्रवाही….२, हेच तत्त्व निसर्गाचे ,  तीन गुणांनी बनले, उत्पत्ती लय स्थिती,  यांनी सर्वत्र व्यापिले…३, ब्रह्मा विष्णू महेश,  प्रतिकात्मक ही रुपे अणूरेणूच्या भागांत,  समावताती स्वरूपे…४, याच विद्युत शक्तीला,  चेतना म्हणती […]

गर्भातील अभिमंन्यू

  श्रीकृष्ण सांगतो सुभद्रेला, चक्रव्युंहामधली रचना, हुंकार मिळे त्याला, सुभद्रा झोपली असताना ।।१।।   गर्भामधले तेजस्वी बाळ, ऐकत होते सारे काही, जाण आली त्याची कृष्णाला, वळूनी जेव्हा तो पाही ।।२।।   चक्रव्यूहांत शिरावे कसे, हेच कळले अभिमन्यूला, अपूरे ज्ञान मिळोनी, घात तयाचा झाला ।।३।।   गर्भामधला जीव देखील, जागृत केंव्हां होवू शकतो, खरा ज्ञानी तोच असूनी, […]

धन्य ती महाराष्ट्र माऊली !

  धन्य ती महाराष्ट्र माऊली अनेक थोरा जन्म देऊनी पावन तू झाली     //धृ//   ज्ञानाचा तो मुकूटमणी, ग्रंथ रचिला ज्ञानेश्वरी ओवीबद्ध साज प्राकृतीं चढविला, भगवतगीतेवरी तेज चमकूनी सुर्यासम, दाही दिशा उजळली    //१// अनेक थोरा जन्म देऊनी पावन तू झाली   तुकाराम तो संत महान, अभंगाचा राजा हासंत खेळत शिकवली, जीवनातील मजा अभंगाची मधूर सुमने, सर्वत्र तुक्याने […]

कवितेचे मूल्यमापन

काव्य रचनेचा छंद लागूनी,  कविता करू लागलो  । भाव तरंगाना आकार देऊनी,  शब्दांत गुंफू लागलो….१, एका मागूनी दुसरी कविता, रचित मी चाललो वही भरता संग्रहाची, आनंदात गुंग झालो…२, अचानकपणे खंत वाटूनी,  निराशा आली मनी निरर्थक वेळ दवडिला,  हेच समजोनी ….३, बोध मिळूनी कुणीतरी सांगे, मूल्यमापन होईल वेडेपणा वा शहाणपणा,  काळ हाच ठरवील…४, करूनी घेतले तुज कडूनी, […]

सत्व रज तमो गुण

त्रिभाव युक्त जीवन, सत्व रज तमो गुण, स्वभावाची अंगे तीन, सर्वात दिसून येती ।।१।।   कांहीं असे सत्वगुणी, कांहीं असे रजोगुणी, काही मध्ये तमोगुणी दिसे निराळ्या प्रमाणीं ।।२।।   प्रेम, दया, क्षमा, शांति, कांहींचे अंगी वसती, सत्वगुण लक्षणें ती, कांहींत दिसून येती ।।३।।   राग, लोभ, अहंकार, षडरिपू हेच विकार, त्यांतच तो जगणार, तमोगुण वाढवून ।।४।। […]

सगळेच शिकलो काटकसर करायला

या तीन दिवसात सगळेच शिकलो काटकसर करायला. शंभर ची नोट खर्च करायची असते… पण जीवावर येते मोडायला. आता असं वाटतंय शंभर रुपयातही तीन चार दिवस जगणं इतकं काही कठीण नाही. साधेपणाने जगण्याची वेगळीच नवलाई. वरखर्च, टॅक्सी सगळ्यावरच बसलाय आळा, बचतीची या दिवसात सगळीकडेच भरली आहे शाळा. नोटांसोबत बदलले लोकांचे आचार विचार, काळया पैशाचा शेवटही काळाच… आणि […]

भाव जाण तू देवा

कर पडले चरणीं भाव जाण देवा   ।।धृ।।   देह झुकला पुढती लिनतेनें मान वाकती मनाची करूनी एकाग्रता भावनेला वाट देतां अश्रू दाटले नयनी  अंतरीचा दिसे ओलावा    १ कर पडले चरणी   भाव जाण  देवा,   प्रथम येई भावना, जागृत करते मनां मनाचा ताबा देहावरी तेच तुजला प्रणाम करी घे प्रभू जाणूनी   अत:करणातील ठेवा   २ कर पडले चरणी […]

उगवत्या सूर्याला नमस्कार

उगवता सूर्य, नमन करती त्याला, विसरती सारे सुर्यास्ताला    ||धृ|| ऐश्वर्याची झलक, श्रीमंतीचे सुख बिनकष्टाची संपत्ती, लक्ष मिळवण्याती माना डोलावती, डामडोलाला   ||१|| उगवता सूर्य. नमन करती त्याला   प्रथम हवे दाम, तरच होई काम पैशाच्या भोवती, सारेच फिरती पैशाचे गुलाम, मानती पैशाला    ||२|| उगवता सूर्य, नमन करती त्याला   सत्तेची नशा, दाखवी जना आशा स्वतःसी समजे थोर, […]

वर्‍हाडातली गाणी – ९

काळी चंद्रकला नेसू कशी नेसू कssशी जाईच तेल आणू कशी आणू कss शी जाईच तेल आणल आणल सासूबाईच न्हाण झाल वन्साबाईची वेणी झाली मामाजीची शेंडी झाली उरलेलं तेल झाकून ठेवलं रानोबाचा पाय पडला सासूबाई सासूबाई अन्न द्या दुधभात जेवायला द्या आमच उष्ट तुम्ही खा विडा घेऊन खेळायला जा

1 336 337 338 339 340 437
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..