नवीन लेखन...

” डोक्याला ताण करून घ्यायचा नाही “

प्रा. विजय पोहनेरकर यांची एक लाईटमुडची खुसखुशीत कविता …… ” डोक्याला ताण करून घ्यायचा नाही ” उगीच गळा काढून बोन्बलायचं नाही अन डोक्याला ताण करून घ्यायचा नाही कामाच्या वेळेस खूप काम करायचं कष्ट करतांना झोकून द्यायचं पण Life कसं मजेत जगायचं ……. फिरा वाटलं फिरायचं लोळा वाटलं लोळायचं सुनंला काय वाटल ? पोट्टे काय म्हणतेल ? […]

बहिणीची एक इच्छा

विसरू नकोस मजला    माझ्या भाऊराया नाते अतूट असते      घे, हे समजुनिया आठव सारे बालपण     कसे गेले खेळांत भांडत होतो, रुसत होतो    सारे केले प्रेमांत ओवाळणीची तुझी सुपारी     ठेवली मी जपुनी आठवण होता तुझी मजला    काढून बघते पेटीतुनी जाणीव  आहे मजला      संसार  जीवनाची कर्तव्ये पडली शिरावरी    तुझाच संसाराची खूप प्रेम दे वाहिनीला    संसार कर सुखाने काढून ठेव अल्पसे प्रेम   देण्या मज त्या साठ्यातुनी वर्षातून  एके दिवशी    बांध राखी प्रेमाची […]

एक तुतारी द्या मज आणुनि

आधुनिक मराठी काव्याचे जनक कृष्णाजी केशव दामले तथा केशवसुत यांचा आज स्मृतीदिन. त्यानिमित्त त्यांची स्मृती जागृत करणारी `तुतारी’ ही त्यांची गाजलेली कविता. […]

आनंदघन

मराठवाडा – बीड परिसरात गत आठ-दहा वर्षानंतरच्या पावसामुळे नद्या वाहू लागल्या आहेत. दुष्काळ हटविण्यासाठी निसर्गाने पुढाकार घेतला. ही रचना त्या रचनाकर्त्यास, निसर्गास अर्पण …. […]

वर्‍हाडातली गाणी – ५

काळा कोळसा झुकझुक पाना पालखीत बसला भुलोजी राणा भुलोजी राण्याचे कायकाय (आ)ले सारे पिंपळ एक पान एक पान दरबारी दुसर पान शेजारी शेजाऱ्याचा डामा डुमा वाजतो तसा वाजू द्या आम्हाला खेळ मांडू द्या खेळात सापडली लगोरी लगोरी गेली वाण्याला वाण्या वाण्या सोपा दे सोपा माझ्या गाईला गाई गाई दुध दे दुध माझ्या बगळ्याला बगळ्या बगळ्या गोंडे […]

तप- शक्ती

तप आणि सत्याची, महान असे शक्ती, वाढवूनी बघा तुम्ही, प्रभूस ती खेचती ।।१।।   तप वाढता तुमचे, झुकेल तो ईश्वर, हतबल होत असे, भक्त जणांसमोर ।।२।।   विश्वाचा तो मालक, दिसत नाही कुणा, प्रयत्न होवूनी व्यर्थ, निराशा येई मना ।।३।।   मिळविण्यास जा तुम्ही, मिळत नसे केव्हां तपशक्ती वाढविता, आपोआप येई तेव्हां ।।४।।   डॉ. भगवान […]

वर्‍हाडातली गाणी – ४

नंदा भावजया दोघी जणी दोघी जणी घरात नाही तिसर कोणी तिसर कोणी शिक्यातल लोणी खाल्ल कोणी तेच खाल्लं वहिनीनी वहिनीनी आता माझे दादा येतील गं येतील गं दादाच्या मांडी वर बसील गं बसील गं दादाची बायको चोट्टी चोट्टी असू दे माझी चोट्टी चोट्टी घे काठी लगाव काठी घरा घराची लक्ष्मी मोठी

लक्ष्मीसूत

आशीर्वाद दे ग आई मजला,  विनवितो मी तुझाच पूत्र  । बाबा माझे नसती हयात,  कोण मजला ह्या जगतात  ।। ‘केशव’ माझे वडील असता,  ‘केवशसूत’  हा ठरतो मी  । तसाच बनता  ‘केशवकुमार’,  मोठे होण्याची युक्ती नामी  ।। जगावयाचे जर मोठ्या नामी,  तूच मजला महान आहे  । ‘लक्ष्मी’  तुझे नाव असता, ‘लक्ष्मीसूत’ होण्यात पाहे  ।।   डॉ. भगवान […]

वर्‍हाडातली गाणी – ३

घरावर घर बत्तीस घर इतका कारागीर कोणाचा भुलोजी च्या राणीचा भूलोजीची राणी भरत होती पाणी धावा धावा कोणी धावतील तिचे दोनी दोनी गेले ताकाला विंचू चावला नाकाला

मातृभूमीच्या शूर जवाना तुला सलाम !

मातृभूमीच्या शूर जवाना स्वातंत्र्या आधी आणि नंतर आमच्यासाठी किती खस्ता खाल्यास याचा इतिहास विसरलो नाही आम्हीं ! मातृभूमीच्या शूर जवाना आप्तांसाठी ऊन, पाऊस, बर्फाच्या वादळात सीमारेषेचे डोळ्यात तेल घालून चोवीस तास राक्षण करतोस ! शत्रूने केलेल्या मातृभूमीवरील भेकड हल्याचे सर्जिकल स्ट्राईकने चोख उत्तर देतोस आपल्या आप्तांचे रक्षणकरण्या वीर मरण पतकरतोस ! मातृभूमीच्या शूर जवाना तुझा जागता […]

1 338 339 340 341 342 437
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..